घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी 'करा हे' उपाय (Tips To Avoid Sweaty Smell)

Tips To Avoid Sweaty Smell

कामानिमित्त ट्रेन, बस किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहनातून गर्दीतून कित्येकजण प्रवास करतात.या गर्दीत एखाद्याच्या काखेतून घामाचा दुर्गंध आला तर आपल्याला अगदीच असह्य होऊन जाते. काहींच्या घामाला इतका दुर्गंध असतो की, त्यांच्या आजूबाजुला उभे राहण्याची इच्छाही आपल्याला होत नाही. इतरांच्या घामाचा वास आला की, आपण आपल्या अंगाला इतका घाण वास तर येत नाही ना? हे आपण लगेचच तपासायला जातो.घामाच्या दुर्गंधीबाबत लोक तुम्हाला थेट सांगत नाही तर ते तुम्हाला टाळतात. तुमच्यासोबत जास्त वेळ उभे राहणे टाळतात. तुम्ही डिओने कितीही आंघोळ केली तरी तुमच्या घामाचा वास काही केल्या कमी होत नाही. घाम येणे ही नैसर्गिक प्रकिया आहे. पण घामाला दुर्गंधी येणे हे नैसर्गिंक नाही त्याचीही काही कारणे आहेत. तुमच्या घामाला दुर्गंधी येते का? जर तुमच्या घामालाही असह्य अशी दुर्गंधी येत असेल तर मग तुम्ही आमच्या या सोप्या टीप्स नक्कीच फॉलो करा.


सगळ्यात आधी घामाची दुर्गंधी का येते त्याची कारणे जाणून घेऊया (Reason Why Sweat Smells In Marathi) 


शारीरिक स्वच्छता (Physical Hygiene)


दुर्गंधी म्हटली की, आपल्याला अस्वच्छता आठवते. अनेकांना कावळ्याची आंघोळ करायला आवडते. ते बाथरुममध्ये जातात कधी येतात कधी कळत नाही. अशा झटपट आंघोळीमुळे शरीर स्वच्छ होत नाही. तुम्ही लावत असलेला साबणही तुमच्या शरीरावरुन जात नाही. तुमच्या साबणाचा सुगंध चांगला असला तरी तो तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवू शकत नाही.त्यामुळे शारीरिक स्वच्छता ही सगळ्यात आधी महत्वाची आहे.


Physical Hygiene


आहार (Diet)


अनेकांना केवळ स्वच्छता हे घामाच्या दुर्गंधीचे कारण वाटत असेल तर ते अगदी चुकीचे आहे.तुमच्या आहारावर तुमच्या घामाचा वास अवलंबून असतो. जर तुम्ही मसालेदार पदार्थ, कांदा, लसूण,कॉफी,चहा यांचे अधिक सेवन करत असाल तर तुमच्या घामाचा वास हा उग्र असतो. घामाला उग्र  येण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे. काही जणांना कच्चा कांदा खायची सवय असते. शिवाय जेवणातही ते कांदा,लसूण यांचा खूप वापर करतात. त्यांच्या तोंडातून घाणेरडा वास येतोच पण त्यांच्या अंगातून उत्सर्जित होणाऱ्या घामालाही वास येतो. 


काखेतील केस (Hair In Glass)


अनेकांना अंडरआर्म्स शेव्ह करण्याचा खूप कंटाळा असतो. जर तुमच्या अंडरआर्म्समधील केसांची ग्रोथ खूप असेल तर तुम्ही शेव्हिंग, वॅक्सिंग करायलाच पाहिजे. कारण काखेतील केसही घामाचे कारण असू शकते. बऱ्याचदा तुम्ही एसीतून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला घाम येतो. परत एसीत आल्यानंतर तुमचा घाम सुकतो. जर तुमच्या अंडरआर्म्समध्ये केस असतील तर तो घाम तुमच्या काखेत तसाच राहतो आणि मग तुमच्या घामाला अधिक दुर्गंधी येते. 


armpit hairs


औषधांचे सेवन (Drug Intake)


मधुमेह, थॉयरॉईड, ब्लडप्रेशर, मेंदुच्या समस्या आणि हार्माेन्ससंबधीची औषधे तुम्ही घेत असाल तरी देखील तुम्हाला खूप घाम येऊ शकतो.औषधांमुळे या घामाला दुर्गंधी येते. कारण काही औषधांचे डोस इतके स्ट्राँग असतात की, त्यामुळेही तुमच्या घामाला दुर्गंधी येऊ शकते.


ओल्या कपड्यांचा वापर (Use Of Wet Clothes)


घाईघाईत ओले कपडे घातल्यानंतरही घामाला दर्प येतो.  कारण घाम आणि ओले कपडे यामुळे देखील तुमच्या घामाला वास येऊ शकतो. विशेषत: ओले सॉक्स, ओले इनरवेअर घालण्याची सवय अनेकांना असते. ओले कपडे अंगावर सुकतील, असे वाटत राहते. पण तसे होत नाही. ओल्या कपड्यांमुळे तुम्हाला कालांतराने स्किन अॅलर्जी होऊ शकतात. कारण घाम शरीरावर सुकल्यानंतर त्यमुळे शरीरावर केस तोड झाल्यानंतर जशा पुळ्या येतात तशा पुल्या देखील येऊ शकतात.


wet sock


अशी घालवता येईल घामाची दुर्गंधी (How To Stop Sweating)


 लेमन स्प्रे (Lemon Spray)


लिंबू हे सहज उपलब्ध असते. एका स्प्रे बॉटलमध्ये लिंबाचा रस काढून घ्या. लिंबाच्या रसाच्या दुप्पट पाणी त्यात घाला. स्प्रे बॉटल शेक करुन ते पाणी तुमच्या अंडरआर्म्स आणि जास्त घाम येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा. हे पाणी शरीरावर सुकू द्या आणि मग तुम्ही आंघोळीला जा. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. शिवाय जंतू रोखण्याचे गुणधर्म असतात. लिंबाचे पाणी हे नैसर्गिक बॉडी स्प्रे आहे. लिंबाचा सुगंध तर चांगला आहेच शिवाय त्यामध्ये जंतू रोखण्याचीही क्षमता आहे.


lemon odor


अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)


अॅपल सायडर व्हिनेगरचे अनेक फायदे आहेत. घामासाठीही अॅपल सायडर व्हिनेगर कामाचे असते. कापसाचा बोळा व्हिनेगरमध्ये बुडवून तुम्हाला ज्या ठिकाणी घाम येतो. तेथे व्हिनेगर लावायचे आहे. ते लावल्यानंतर तुम्ही आंघोळ केली तरी चालेल. तुम्हाला कालांतराने फरक झालेला जाणवेल. तुमच्या घामाचे प्रमाण कमी होईल.शिवाय घामाची दुर्गंधीही कमी होईल. (अॅपल सायडर व्हिनेगर सगळ्यांच्याच त्वचेला सूट होईल असे नाही. त्यामुळे तुम्ही आधी व्हिनेगर तुमच्या हातावर ट्राय करुन पाहा.जर तुम्हाला व्हिनेगर तुमच्या त्वचेला सूट होत नाही असे वाटत असेल तर मग हा प्रयोग करु नका)


अँटी बॅक्टेरीअल साबणाची निवड (Anti Bacterial Soap)


सुंगधी साबणापेक्षा तुम्ही अँडी बॅक्टेरीअल साबणाची निवड करणे गरजेचे असते. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर अशांनी अँटी बॅक्टेरीअल साबणाचीच निवड करायला हवी. अनेकांना अँटी बॅक्टेरीअल साबणापेक्षा सुवासिक साबण अधिक आवडत असतात. पण तुमच्या घाम येणाऱ्या शरीराला सुवासिक साबणापेक्षा जास्त गरज असते स्वच्छतेची त्यामुळे जाहिरातीतील सुवासाला भुलण्यापेक्षा तुम्ही चांगला अँटी बॅक्टेरीअल साबण निवडा.तुम्हाला तुमचा घाम कमी झालेला किंवा घामाचा वास कमी झालेला लगेच जाणवणार नाही. साधारण आठवडाभरानंतर तुम्हाला हा फरक जाणवायला लागेल. 


antibacterial soap


अँडिपरस्परंट की डिओड्रंट (Anti Depressant Deodrant)


अनेकांना काखेत स्प्रे मारायची सवय असते. पण घामाचा वास येऊ नये यासाठी अँडिपरस्परंट चांगले की डिओड्रंट याचा गोंधळ होतो. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्ही अँटीपरस्परंटची निवड करायला हवी. त्यामुळे कमी केमिकल्स असलेले अँटिपरस्परंट निवडा त्यामुळे तुम्हाला कमी घाम येतो. शिवाय घामाला वासही येत नाही. उत्तम प्रतीचे अँटिपरस्परंट निवडा. 


घामांचे डाग टाळण्यासाठी (To Prevent Sweating)


अनेकांना इतका घाम येतो की, त्यांना आलेल्या घामाचे डाग पडतात. काखेतील भाग पिवळा आणि कालांतराने काळा होऊ लागतो. कपडे काळे होऊ लागतात. अशांनी घामासाठी मिळणारे पॅडस वापरावे. तुमचे कपडे खराब होणार नाही. हे पॅड तुम्हाला तुमच्या कपड्यांना लावायचे असतात. त्यामुळे ते फार कर्म्फटेबल असतात. तुमचे पांढरे शुभ्र कपडे तुम्हाला खराब करायचे नसतील तर तुम्ही या पॅडचा वापर करु शकता.


sweatpads


POPXO Recommendations -


Sirona Under Arm Sweat Pads for Men and Women  (90 Rs/ 3 Pads)


Pee Safe Disposable Underarm Folded Sweat Pads ( 3 Rs/ 3 Pads))


काखेची स्वच्छता (Cleaning The Glass)


वर सांगितल्याप्रमाणे काखा स्वच्छ नसतील तर तुमच्या घामाला खूप वास येऊ शकतो. त्यामुळे आंघोळ करताना काखेला साबण लावून काख स्वच्छ करुन घ्या. काखेतील मळ तसाच साचून राहिला तर तुमच्या काखेतील त्वचाही हळुहळु काळवंडू लागते. त्यामुळे अंडरआर्म्सची तुमच्या चेहऱ्याप्रमाणेच काळजी घेतली तर उत्तम.. आठवड्यातून एकदा स्क्रब म्हणून साखर आणि मध चोळा.


डॉक्टरांचा सल्ला घ्या (Consult A Doctor)


घाम  येणे ही नैसर्गिक प्रकिया आहे. पण जर तुम्हाला खूपच घाम येत असेल तर तुम्हाला कोणता तरी आजार असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.तुमच्या घामाला खूपच वास येत असेल,  घामामुळे तुमचे कपडे खराब होत असतील तर आम्ही दिलेल्या टीप्स फॉलो केल्यानंतरही फरक पडत नसेल तर मग तुम्ही डॉक्टरांकडे जायलाच हवे. याकडे दुर्लक्ष करता कामा नये.