होलिकोत्सव: मुंबईत होणार मसूद अझर आणि पबजी गेमचं होलिकादहन

होलिकोत्सव: मुंबईत होणार मसूद अझर आणि पबजी गेमचं होलिकादहन

वसंत ऋुतूची चाहूल म्हणजेच नव्याची चाहूल आणि जुन्या वाईट गोष्टींचे दहन करणारा सण म्हणजे होलिकोत्सव. होळीनंतर लगेच गुडीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाची सुरूवात होते. त्यामुळे होळीला सर्व जुन्या वाईट आणि अनिष्ट गोष्टींचे दहन करण्याची पद्धत आहे. होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी जुनी लाकडे, शेण, गवत यांची होळी केली जाते. मात्र यंदा मुंबईतील वरळी येथे एका आगळ्या-वेगळ्या होळीचं दहन केलं जाणार आहे. नव्याचं स्वागत आणि अनिष्टावर मात करण्यासाठी मुंबईकरांनी हे क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. आज  वरळीमध्ये आज ‘जैश ए महमंद’ चा म्होरक्या मसूद अझरचा पुतळा आणि पबजी गेमचं होळीमध्ये दहन केलं जाणार आहे. होळीच्या माध्यमातून या दोन वाईट आणि अनिष्ट गोष्टी नष्ट करण्याचा मुंबईकरांचा प्रयत्न असणार आहे. मुंबईतील वीर नेताजी क्रीडा मंडळ मसूद अझरचा पुतळा होळीमध्ये जाळणार आहेत तर वरळी कोळीवाड्यातील दोन भावांनी पबजी गेमच्या भयानक परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी पबजी इफिजी गेमची होळी तयार केली आहे.


holi 1


पुलवामा हल्याच्या निषेधार्थ मसूद अझरच्या पुतळ्याचे दहन


सध्या देशातील वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय देशबांधवांच्या अंगात दहशतवादाविरूद्ध विरश्री संचारली आहे. प्रत्येकाला आपल्या देशासाठी आपण काहीतरी करावे असं वाटत  असतं. याच भावनेतून वरळीतील वीर नेताजी क्रीडा मंडळाने यंदा एका आधुनिक होळीचं आजोजन केलं आहे. या मंडळाने पुलवामा हल्ल्याचा मास्टर मांईड आणि पाकीस्तानच्या ‘जैश ए महमंद’ चा म्होरक्या मसूद अझरचा पुतळा होळीमध्ये जाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याच्या पुतळ्याची  राय़फल हातात असलेली एक आक्राळ - विक्राळ होळी उभारली आहे. या होळीमध्ये हा पुतळा जाळून मुंबईकर पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार आहेत.अनिष्टावर इष्टाने केलेली मात


सध्या पबजी गेमने तरूणाईला जणू वेडच लावले आहे. या गेमच्या आहारी गेल्यामुळे अनेक तरूणांचे फार नुकसान होत आहे. तरूणांचा उत्साह या गेममुळे चुकीच्या वळणावर जात आहे. म्हणूनच मुंबईतील वरळी बीडीटी चाळीतील दोन तरूणांनी याबाबत जनजागृतीचा विडा उचलला आहे. अमर आणि आशिष विठ्ठल या दोन भावांनी यंदा पबजी गेमचं होलिकादहन करण्याची महत्त्वाची योजना केली आहे. यासाठी त्यांनी पबजी गेमवर आधारित पाच फूट उंचीची होळी तयार केली आहे. या होली दहनावर पबजी द सर्जिकल स्ट्राईक असं लिहिलं आहे. हा गेम तरूणाईच्या मनातून काढून टाकण्यासाठी या दोघांनी हा निर्णय घेतला आहे. या होळीवर त्यांनी पबजी गेममुळे होणारे तोटे देखील लिहिले आहेत. लहानांपासून - थोरांपर्यंत सर्वांसाठीच ही होळी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. त्यामुळे यावर्षी केवळ होळी मजा म्हणून नाही तर समाजासाठी काहीतरी करायला हवं या भावनेतून हे होलिकादहन करण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे.  रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी


DIY: रंगपंचमीसाठी बनवा नैसर्गिक रंग जे तुम्हाला देतील नैसर्गिक ग्लो


अभिषेकमुळे करणने रंगपंचमी खेळणे केले बंद, रिअॅलिटी शो दरम्यान कबुली


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम