12 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांसाठी आज व्यापारात यश देणारा दिवस

12 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांसाठी आज व्यापारात यश देणारा दिवस

 


मेष : व्यापार सुखद


व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी आज सावध राहून मिळणा-या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. तनासह मन सुदृढ राखण्यासाठी वेळोवेळी व्यायाम करण्यासाठी वेळ काढा व त्याची सवय लावून घ्या. आज तुम्ही वास्तुवर आनंदाचे खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल.


कुंभ : जेष्ठ नागरीकांना आजार


जेष्ठ नागरीकांना आज आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यांचा आजार आज वाढू शकतो. जुणी दुखणी तोंड वर काढू शकतात. बेसावध राहू नका. अब पछताये क्या होत जब चिडिया चुग गई खेत याची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे. दिव्यातील राक्षस तुमच्यापुढे हात जोडून उभा आहे. संधीचा लाभ घ्या.


मीन : जोडीदाराशी मनमुटाव


छोट्याशा गोष्टीवरुन वाद होऊन आज जोडीदराशी मनमुटाव होऊ शकतो. घरोघरी मातीच्याच चुली असतात. त्यामुळे वाद वाढवू नका. शांत राहा. मनात कुणाविषयी वैरभावना असेल तर तिचा त्याग करा. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये. दिवसाची सुरुवात ध्यानधारणेने करा. दिवस अतिशयम उत्तम जाईल.


वृषभ : नफ्याकडे लक्ष द्या


कधी कधी स्वार्थी व्हावं लागतं. आज विशेषत: व्यावसायिकांनी स्वार्थी होऊन आपल्या लक्ष दिलं पाहिजे. सासरच्या मंडळींशी वादाची शक्यता आहे. उतावळेपणा न करता वाद वाढणार नाही, याची काळजी घ्या. कुणावरही टिका टिप्पणी अजिबात करु नका. तुमच्यासाठी आज ते योग्य होणार नाही.


मिथुन : कागदपत्रांना जपा


आपली महत्त्वाची कागदपत्रे जागेवर सुरक्षित आहेत की नाही याची आज खात्री करुन घ्या व त्यांना जपून ठेवा. कुटुंबवत्सवल लोकांना आज आर्थिक लाभ होऊन शकतो. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. टिका किंवा तक्रार करण्यामध्ये वेळ घालवत बसू नका. जे पदरात पडतंय ते पवित्र मानून घ्या.


कर्क : बढती मिळेल


नोकरदार मंडळींसाठी आज आनंदाचा दिवस आहे. कारण तुम्ही जर बढती मिळण्यास प्राप्त असाल तर आज बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढेल. संबंध सुदृढ करण्याची ही संधी सोडू नका. स्वत:च्या भराभराटीवर लक्ष द्या. मात्र थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात असू द्या.


सिंह : अभ्यासात लक्ष द्या


विद्यार्थ्यांना आज आपले संपूर्ण लक्ष अभ्यासात देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण मन भरकटण्याची शक्यता आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही, हे लक्षात असू द्या. वास्तुतून आज तुम्हाला लाभ मिळू शकतो. लहान फाद्यासाठी मोठं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. ऐकावे जनाचे करावे मनाचे.


कन्या : चिकाटी कायम ठेवा


भाग्य तुमची परिक्षा घेत असल्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही अपेक्षित यश प्राप्त होत नाही आहे. त्यामुळे हतबल होऊन नका. चिकाटी कायम ठेवून प्रयत्न करीत राहा. हाती घेतलेले अपूर्ण काम पूर्ण कर­ण्यावर भर द्या. आज तुम्ही तुमच्या शत्रुंना पराभुत करु शकाल. त्याचा मनस्वी आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. योग्यतेला सुयोग्य आज तुम्ही प्राप्त करुन देऊ शकाल.


तूळ : आरोग्य चांगले राहिल


आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी ताजगीचा अनुभव देणारा व उत्साहाने भरलेला असेल. आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. आज प्रवासाचेही योग असून त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवास टाळेलाच बरा. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी तुम्ही आज एकांत शोधणार आहात. चिंतन करण्यावर भर द्या.


वृश्चिक : अन्नबाधा होईल


आज तुम्हाला अन्नबाधेचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पथ्य पाळण्यावर भर द्या. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने आज तुम्हाला मानसिक सुखशांतीचा अनुभव मिळणार आहे. आज तुमच्या मानसन्मान वाढ होऊ शकते. संबंध अधिक दृढ होऊ शकतात.


धनु : आरोग्याची काळजी घ्या


आज तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दे­ण्यात येत आहे. कारण आज तुमचे आरोग्य गरम गरम राहू शकतं. दिवसभर कणकण जाणवणार आहे. प्रयत्न करुनही यश मिळत नसेल तर कर्मात बदल करा. प्रयत्नांच्या दिशेमध्ये बदल करा. भाग्यही आपोआप बदलेल. स्वत:चाच हेका न रेटता थोडी लवचिकता वाढवा.


मकर : संततीकडून आनंद


आज तुमची संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यामुळे तुम्हाला त्यांचा अभिमान वाटून आनंदाची प्राप्ती होईल. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण राहणार आहात. सत्याची कास सोडू नका. आपला मार्ग चुकीचा तर नाही ना? याची खात्री करुन घ्या. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र