13 मार्च 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आज प्रवासाचा योग

13 मार्च 2019 चं राशीफळ,  कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आज प्रवासाचा योग

मेष : व्यवसायात गोंधळ


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चिंतेचा आहे. कारण आज व्यवसायात गोंधळ उडणार आहे. त्यामुळे सावध राहून आपले नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. लहान भावंडांची काळजी घ्या, त्यांची विचारपुस करा. कदाचित तुमच्या मदतीची, मार्गदर्शनाची त्यांना आवश्यकता असू शकते. कुणाशीही बोलतांना अचूक संवाद साधा.


कुंभ : प्रवासाचा आनंद


आज तुमचे प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास तुम्ही जोडीदारासोबत करणार असल्यामुळे त्याचा आनंद द्विगुणीत होईल. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. त्यामुळे अतिआत्मविश्वास नको. तो नुकसान करु शकतो. शॉपिंग करण्यापूर्वी आज थोडा विचार करा. अवास्तव खर्च होणार नाही, याची काळजी घ्या.


मीन : गैरसमज होईल


आज छोट्याशा गोष्टीवरुन वाद होऊन जोडीदाराविषयी गैरसमज तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा. कृती करण्यापूर्वी विचार करा. म्हणजे संबंध दुरावणार नाहीत. तडका फडकी शेरेबाजी आज कुणावर नको. शब्दांवर नियंत्रण ठेवा. उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.


वृषभ : जोड व्यवसायाचा विचार


प्रगतीच्या दृष्टीकोनातून आज तुम्ही जोड व्यवसायाचा विचार करणार आहात. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे योग्य नाही. म्हणून विचारपूर्वकच निर्णय घ्या. मार्ग सापडत नाही म्हणून शांत बसू नका. चालायला लागा. भाग्याची साथ तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्नांनी परमे·ााराची प्राप्त होत असते. म्हणून प्रयत्न करीत राहा.


मिथुन : कामे पूर्ण होतील


आज तुमच्यासाठी आनंदाचा म्हणजे महत्त्वपूर्ण कामे पूर्ण होण्याचा दिवस आहे. विशेषत: अधिकारी वर्गाच्या हातात एखादे काम अडकलेले असेल आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. नाही तर हत्ती गेला नि शेपूट राहीले अशी अवस्था होईल. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. भाग्य आज संधी देत आहे, मनसोक्त जगून घ्या.


कर्क : लालसा नको


आयुष्यात झटपट मिळालेली कुठलीच गोष्ट फार काळ टिकत नाही. म्हणून झटपट पैसे मिळविण्याच्या मार्गाला लागू नका. पुढच्याच ठेस मागचा शहाणा, त्यामुळे अनुभवावरुन बोध घेण्याचा प्रयत्न करा. वरकरणी कनवाळू आणि आतून कठोर अशा द्विस्वभावी लोकांपासून सावध राहा. ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.


सिंह : कंटाळा कराल


आज कंटाळ्यामुळे तुमाचा कामे टाळण्याकडे कल राहिल. विशेषत: विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही वास्तूवर आनंदात खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. भविष्यात मोठा फायदा होणार असेल तर आज होणा-या लहान नुकसानामध्ये अडकू नका. त्याला गुंतवणूक समजा.


कन्या : आशीर्वाद मिळवा


आज गुरुंचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळवा. त्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. आज एखाद्याबद्दल तुमच्या मनात गैरसमज निर्माण होऊन संबंध दुरावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. एखाद्या कामाला वेळ जास्त लागू शकतो. म्हणून हतबल होऊ नका. प्रयत्न करीत राहा. यश नक्की मिळेल.


तूळ : व्यायाम करा


तनासह मनही सुदृढ राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी व्यायाम करण्यासाठी वेळ काढा व त्याची सवय लावून घ्या. आज तुमचे प्रवासाचेही योग असून प्रवासातून तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. आज विनाकारण संतापही येऊ शकतो. म्हणून गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या.


वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या


रक्तदाबाचा त्रास अलेल्यांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्रास वाढू शकतो. कुठल्याच गोष्टीची जास्त चिंता करु नका. तर चिंतन करण्यावर भर द्या. नवीन मार्ग सापडतील. आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनस्वी आनंद प्राप्त होईल. भाग्य तुमची परिक्षा घेत असल्यामुळे कठोर परिश्रमानंतरच यशाचा आनंद मिळू शकेल.


धनु : पथ्य पाळा


आधी पोटाबा मग विठोबा अशी अवस्था असेल. मात्र तुम्हाला जर आहाराविषयीचे पथ्य सांगितलेले असतील तर आज ते तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. नाही तर त्रास होऊ शकतो. लेखक व कवी मंडळींसाठी आजचा दिवस आनंदायी ठरु शकतो. कारण त्यांच्या लेखन कार्याला आज यश मिळण्याचे योग आहेत.


मकर : वडिलांशी संघर्ष


आज तुमचा वडीलांशी संघर्ष होऊ शकतो. म्हणून शांत राहून वाद वाढणार नाही, याची काळजी घ्या. घरामध्ये सुसंवाद वाढवा. एखाद्या आस्किमक आनंद आज तुम्हाला सायंकाळपर्यंत मिळू शकतो. त्याचे स्वागत करण्यासाठी सजग राहा. तुम्ही कनवाळू स्वभावाचे असाल तर सावधना लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र