14 मार्च 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना आज प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता

14 मार्च 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना आज प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता

मेष : खर्चाकडे लक्ष ठेवा


अंथरुन पाहून पाय पसरायला हवे. आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार नाही, याची काळजी घेत खर्चाकडे आज आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. कुटुंबातील कोणताही निर्णय आज घेत असाल तर तो विचारपूर्वक, सर्वांना सोबत घेऊन धैर्याने घ्यावा. फुकटच्या गप्पा-टप्पा आज नको. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी आपली अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या.


कुंभ : जोडीदाराचा प्रभाव


आज दिवसभर तुम्ही जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार आहात. उचलली जीभ लावली टाळ्याला असं आज करु नका. कोणाशीही बोलतांना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. मुद्देसुदच बोला. दिवसाची सुरुवात ध्यान धारणेने करा व रोज त्याची सवय लावून घ्या.


मीन : संसारीक सुखात वाढ


आज वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या संसारीक सुखात वाढ होईल. अतिविचार हे घातक व भिती निर्माण करणारे असतात. भित्या पोटी ब्रम्हराक्षस असतो. म्हणून भितीला दूर सारुन चिंतन करण्यावर भर द्या. घरातून बाहेर निघतांना आईचे आशीर्वाद घेऊनच निघा.


वृषभ : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला हवेत. वैवाहिक आयुष्यातील विविध रंग तुम्हाला आज अनुभवायला मिळू शकतात. संसारीक सुखात वाढ होईल. कोणतीही कृती किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्याचा तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. नाही तर चुक होऊ शकते.


मिथुन : विचारपूर्वक निर्णय घ्या


आज विशेषत: सरकारी कर्मचा-यांनी आज कोणाताही निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्यावा. आपल्या हातून कोणतीही चुक होणार नाही, याची काळजी घ्यावी. मानसिक सुखशांतीच्या वातावरणाचा तुम्ही अनुभव करु शकाल. घरात आनंदाचे वातावरण राहिल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पर्यायी साधने तयार करुन ठेवा. एकावर विसंबून राहू नका.


कर्क : संधीचा लाभ घ्या


नोकरदार मंडळींसह व्यावसायिकांसाठीही आज अनांदाचा दिवस आहे. कारण दोन्ही क्षेत्रांमध्ये आज संधी उपलब्ध होणार आहेत. त्यांचा योग्य तो लाभ घ्यावा. देश तसा वेश यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. भाग्य परिक्षा घेत असल्याने आधी परिश्रम नंतरच यश मिळणार आहे. स्वत:वर विश्वास ठेवून जोखीम पत्करा.


सिंह : विद्यार्थ्यांना यश


आज विद्यार्थ्यांसाठी यशदायक असा आहे. विशेषत: स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा­-या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तुमचे शत्रु वरचढ होऊ शकतात. दोघांचे भांडण तिस-याला लाभ अशी अवस्था होईल. म्हणून सावध राहा. एखादे महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवा.


कन्या : आशीर्वाद मिळवावे


आज गुरुंचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळविण्याचा सल्ला तुम्हाला दे­ण्यात येत आहे. त्याची तुम्हाला नितांत गरज आहे. एखाद्या मोठ्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडाल. देव तारी त्याला कोण मारी याचा अनुभव कराल. भुतकाळातील एखाद्या आनंदायी घटनेचा आनंद आज पुन्हा अनुभवायला मिळेल.


तूळ : जंक फूड टाळा


जंक फूड हे आरोग्यासाठी अपयाकारकच असतात. आज तरी ते अजिबातच नको. अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. वाहन सावकाश चालवा. वाहतुकीचे नियम पाळा. कुठे तातडीने पोहचायचे असेल तर लवकर निघा. आजचा दिवस तुमचा कार्यात व्यस्ततेचा राहणार आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या.


वृश्चिक : त्रास वाढेल


आज विशेषत: ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यांचा त्रास वाढू शकतो. आहारावर नियंत्रण ठेवून दिलेली पथ्य पाळा. आज तुम्ही आत्मविश्वासाचे परिपूर्ण राहणार आहात. तेव्हा कामे पूर्ण करुन घ्या. प्रयत्न करुनही यश मिळेत नसेल तर प्रयत्नांची दिशा बदलून पाहा.


धनु : मुलांकडून अपेक्षा नकोच


आज मुलं तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही आहेत. त्यामुळे आज त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नका. कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती होऊ शकते. त्यामुळे आपल्या संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सहन करावेच लागेल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.


मकर : मार्गदर्शन मिळेल


आज तुम्हाला वडीलांकहून मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घेण्याचा प्रयत्न करा. कोणाशीही बोलतांना तोलून-मापूनच बोला. आधी केलेल्या मूर्खपणाची फळे आज वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे आलीया भोगासी असावे सादर, म्हणून त्यांना सामोरे जा. अनुभवावरुन शिकण्याचा प्रयत्न करा.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम