15 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांनी ठेवावे आज खर्चावर नियंत्रण

15 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांनी ठेवावे आज खर्चावर नियंत्रण

मेष : खर्चावर नियंत्रण ठेवा


अंथरुण पाहुनच पाय पसरायचे असतात. आपले उत्पन्न व खर्च यांच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक गणिते बिघडू शकतात. घरात थोडं लक्ष द्या. घरात जर शितयुद्ध सरु असेल तर वाद वाढण्याआधी ते थांबवा. तणाव वाटत असेल संगित ऐकून तो लाघविण्याचा प्रयत्न करा. मनाला शांतीचा अनुभव येईल.


कुंभ : जोडीदाराचे सहकार्य


आज तुमच्या घरात आनंदी आनंद राहणार आहे. कारण आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. मात्र त्यासह खर्चही वाढणार आहे, जो तुम्ही आनंदात करणार आहात. आज थोडीही बेशिस्त नको. नाही तर एक ना धड भराभरा चिंध्या याचा अनुभव येईल. कोणाशीही बोलतांना अचुक संवाद साधा.


मीन : मानसिक तणाव


आज विशेषत: स्त्रियांना मानसिक तणाव जाणवेल. म्हणून आपल्या आवडत्या गोष्टीत मन रमवि­ण्याचा प्रयत्न करा. आज कुणावरही विसंबून राहू नका. निराशा होऊ शकते. स्वत: करण्यावर भर द्या. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास वाढवा.


वृषभ : व्यवसायात यश


आजचा दिवस व्यावसायिकांसाठी अत्यंत आनंदाचा आहे. कारण आज व्यवसायात त्यांना घवघवीत असं यश प्राप्त होऊ शकतं. इच्छा व अपेक्षेपेक्षा जास्त मिळविण्याचा आजचा दिवस असेल. सासुरवाडीकडून आज तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परीवारांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आज कुणाच्याही व्यंगावर हसू नका.


मिथुन : गोंधळ उडेल


आज तुम्ही थोडे गोंधळेले असाल. विशेषत: सरकारी कर्मचा-यांनी आज काळजी घ्यायची आहे. कोणताही निर्णय घेतांना आपल्या हातून चुक होणार नाही, याची काळजी घ्या. आज तुमच्या नवीन ओळखी होऊ शकतात. त्यांना सकारात्मकता व आत्मविश्वासाने सामोरे जा.


कर्क : आर्थिक ओढताण


आज तुम्हाला आर्थिक ओढताणीचा सामना करावा, लागू शकतो. आपले उत्पन्न व खर्च यांच्या नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. नाही तर चणे आहे तर दात नाही आणि दात आहेत तर चणे नाहीत अशी अवस्था होईल. प्रेमविरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. प्रेयसीशी संपर्क आज होऊ शकतो. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करण्यावर भर द्या.


सिंह : सोशल मीडिया घातक


ध्येयापासून आपलं लक्ष भरकटवण्यामध्ये आज सोशल मीडिया आघाडीवर आहे. विद्याथ्र्यांसाठी तर सोशल मीडिया घातकच आहे. त्यामुळे त्यांनी यापासून लांब राहायला हवे. आज तुमचे शत्रु पराभुत होणार आहे. त्याचा मनस्वी आनंद तुम्हास प्राप्त होईल. कुठल्याच गोष्टीची चिंता करीत बसू नका. चिंतन करण्यावर भर द्या.


कन्या : आरोग्याकडे लक्ष द्या


आज तुम्हाला आपल्या आरोग्याकडे लक्ष दे­ण्याचा सल्ला देण्यात येत आहे. छोटी दुखणीही त्रासदायक ठरु शकतात. जीवनात सर्वकाही आपल्यालाच मिळेल हा अट्टहास चुकीचा आहे. सैतानालाही त्याचा वाया द्यायचा असतो. म्हणून जे पदरात पडतंय ते पवित्र मानून घ्या. कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.


तूळ : अपचनाचा त्रास


आज तुम्हाला अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या मोठ्या संकटातून सुखरुपणे बाहेर पडल्यामुळे आपल्यावर ईश्वराचे आशीर्वाद असल्याची भावना मनात दाटून येईल.


वृश्चिक : संधीवात वाढेल


संधीवाताचा त्रास असलेल्यांनी असलेल्यांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्रास वाढू शकतो. आहारावर नियंत्रण ठेवून पथ्य पाळा. इच्छित कार्याला अपेक्षेपेक्षा जास्त उशिर होईल. म्हणून निराश होऊ नका. प्रयत्न करीत राहा. मनस्वास्थ बिघडविणारी एखादी घटना घडू शकते. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल.


धनु : संततीला यश


आज तुमच्या संततीला यश मिळणार असल्याने तुम्ही आनंदात असाल. त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. आज आत्मविश्वास मात्र कमी राहणार आहे. त्यामुळे आज कोणताच महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. महत्वाची सर्व कामे उद्यावर ढकला. सायंकाळपर्यंत एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होऊ शकतो.


मकर : संपत्तीचा वाद मिटेल


तुमच्या घरात संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटू शकतो. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. गरज पडल्यास तडजोडीचे धोरण स्विकारा. आज दिवसभर आळस अंगात घुसलेला राहिल. त्यामुळे कामे टाळण्याकडे तुमचा कल राहिल. तरीही जे महत्वपूर्ण कामे करावीच लागतील. नाही तर नंतर पश्चाताप होईल.लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद