16 मार्च 2019 चं राशीफळ, आज मेष, कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घेण्याची गरज

16 मार्च 2019 चं राशीफळ,  आज मेष, कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घेण्याची गरज

मेष : अन्नबाधेचा त्रास


आज तुम्हाला अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून पथ्य पाळण्यावर भर द्या. आरोग्याची काळजी घ्या. वडीलांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान फायद्यासाठी मोठं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. ऐकावे जनाचे करावे मनाचे ही भूमिका आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे.


कुंभ : काळजी घ्या


आज आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा दिवस आहे. विशेषत: ज्यांना रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आपला त्रास वाढणार नाही, याची काळजी घ्या. इच्छित कार्याला उशिर होईल. म्हणून प्रयत्न न सोडता आपली मनस्थिती बिघडणार नाही, याकडे लक्ष ठेवा. सासरकडून आपल्याला एखाद्या गोष्टीचे आमंत्रण आज प्राप्त होऊ शकते.


मीन : ताण वाढेल


आज विशेषत: बँकेत जे लोक कामाला आहेत, त्यांचा ताण वाढणार आहे. त्याचा परिणाम आपल्या कामावर होणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या विषयी गैरसमज आज होऊ शकतो. तुमचा स्वभाव वरकरणी कठोर मात्र आतून कनवाळू असल्याने आज संवेदनशीलता वाढलेली असेल. एखाद्याची मदत आज करु शकाल.


वृषभ : संघर्ष होईल


मनाविरुद्ध घडणा-या घटनांचा आजचा दिवस असेल. त्यात मुख्यत: वडीलांशी संघर्ष होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. वाद होणार नाही, याची काळजी घ्या. वैवाहिक आयुष्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. भांड्याला भांड लागल्यास आवाज होणारच, म्हणून जोडीदाराला समजून घेण्याची भूमिका घ्या. घडून गेलेल्या एखाद्या आनंददायी घटनेचा आज पुन्हा आनंद प्राप्त होऊ शकतो.


मिथुन : प्रवासाचा आनंद


आज तुमचे प्रवासाचे योग आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्या प्रवासात तुम्हाला जोडीदाराची संगत लाभल्याने त्याचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो. मोठ्या भावाला हानी पोहचण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आता वाट्याला येऊ शकतात. आलिया भोगासी असावे सादर,म्हणून मनाची तयारी करुन ठेवा.


कर्क : गोंधळ उडेल


आजचा दिवस तुमच्यासाठी गडबड गोंधळाचा असेल. विशेषत: व्यावसायिकांनी आज काळजी घ्यायची आहे. व्यवसायात गोंधळ उडून आपले नुकसान होणार नाही, याकडे लक्ष द्या. नाही तर दोघांचे भांडण तिस-याला लाभ, अशी अवस्था होईल. मनस्थिती विचलित राहणार आहे. त्यामुळे ध्यान धारणा करुन मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा.


सिंह : अभ्यासात यश


विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशदायी असून त्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहणार आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सहन करावेच लागेल. आज तुमचा वडिलांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून सामजंस्याशी भुमिका घेणे कधीही चांगले. एखाद्या कामाला वेळ जास्त लागेल.


कन्या : कौतुक होईल


आज तुमचा आत्मविश्वास गगणाला भिडलेला असेल. कारण आज घरातून तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकतं. त्यातही वडीलांकडून तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळू शकते. भाग्य आपल्यासोबत असून परमेश्वराची आपल्यावर कृपा असल्याची भावना मनात दाटून येईल. आजचा दिवस छान असल्याने कामे उरकण्यावर भर द्या.


तूळ : आर्थिक ओेढताण


नियोजन विस्कटले की त्याचा मुख्य परिणाम हा आर्थिक नियोजनावर होत असतो. आज तुम्हाला आर्थिक ओढताण जाणवेल. दात आहेत तर चणे नाहीत आणि चने आहेत तर दात नाहीत, याचा अनुभव येईल. मात्र आध्यात्मिक गोष्टींमध्ये सहभागी झाल्यास मनाला आनंद प्राप्त होऊ शकतो. आयुष्याबद्दल चितंन कर­ण्यासाठी एकांतांची आवश्यकता भासेल.


वृश्चिक : मार्गदर्शन मिळेल


आज तुम्हाला वडीलांकडून आशीर्वाद व मार्गदर्शन मिळण्याचा दिवस आहे. त्याचा आपल्या कामात उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न करा. कल्पक व सर्जनशील कार्यात प्रगतीचे योग असल्याने आपल्या संकल्पानांना मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. काही प्राप्त करायचे असेल तर सहन करण्याची मानसिक ठेवा. इतरांना सल्ला देतांना सांभाळून राहा.


धनु : व्यावसायिकांना लाभ


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून विशेषत: बांधकाम व्यावसायिक व रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. अतिविचार घातक असल्याने चिंता करीत बसण्यापेक्षा चिंतनावर भर द्या. भित्यापोटी ब्रम्हराक्षक असतो, हे लक्षात घ्या. आपल्या अधिकारांमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे.


मकर : संधीचा लाभ घ्या


नोकरीसह आज व्यवसायातही संधी मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे नोकरदार मंडळींसह व्यावसायिकांनीही आज जागृत राहून संधीचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करावेत. जसा देश तसा वेश राखण्याचा प्रयत्न करा. कुणाविषयी वैरभावना मनात असेल, तर आज तिचा त्याग करा. पाण्याच राहून माशाशी वैर धरु नये. अनुभवातून शहापण आज प्राप्त होईल.


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम