17 मार्च 2019 चं राशीफळ, धनु राशीच्या लोकांना आज आनंदवार्ता समजतील

17 मार्च 2019 चं राशीफळ, धनु राशीच्या लोकांना आज आनंदवार्ता समजतील

मेष : लाभाचा दिवस


आजचा दिवस व्यापार व व्यावसायासाठी सुखद असा आहे. त्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबवत्सल लोकांनाही लाभ होण्याचे योग आज आहेत. त्यामुळे परिवारामध्ये आनंदी आनंद राहू शकतो. भाग्याने आपली परिक्षा घ्यायचे ठरविले आहे. त्यामुळे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून परिश्रम करीत राहा. त्यानंतरच भाग्याची साथ मिळेल.


कुंभ : नफ्याकडे लक्ष ठेवा


आज तुम्हाला थोडं स्वार्थी व्हावं लागेल. आपला फायदा किंवा नफा कशात आहे यावर लक्ष ठेवून स्वार्थ साधुन घ्या. नाही तर दैव देते आणि कर्म नेते याची अनुभूति प्राप्त होऊ शकते. आत्मविश्वास आज थोडा कमी राहिल. म्हणून कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. सायंकाळपर्यंत आत्मविश्वास  वाढविणारी घटना घडू शकेल.


मीन : अनुकूल ग्रहमान


विशेषत: छोट्या व्यावसायिकांसाठी आज अनुकूल ग्रहमान आहे. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करायला चुकू नका. जोडीदाराशी गोडी गुलाबीने वागण्याचा प्रयत्न करा. घरात शांतता व आनंद प्रस्तापित करण्यावर भर द्या. चार दिवस सासुचे व चार दिवस सुनेचे असतात, हे लक्षात घ्या. भविष्यात होणा-या मोठ्या फायद्यासाठी आज लहान नुकसान झाले तरी चालेल.


वृषभ : धाडस नको


धाडस करणे चांगली बाब असली तरी आज कोणतेही धाडस करु नका. विशेषत: व्यावसायिकांनी मोठे धाडस किंवा मोठा निर्णय आज घेऊ नये. आज तुमचे शत्रू पराभूत होऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल. काही गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय वि·ाास ठेऊ नका. फसगत होऊ शकते.


मिथुन : भाग्याची साथ


आज जे आपले काम आहे, त्यात श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करा. कारण आज आपल्याला भाग्याची साथ प्राप्त होऊन जेही कराल त्यात यश मिळू शकतं. आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होणार असल्याने मनस्वी आनंदाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. घरातून बाहेर पडतांना आईचे आशीर्वाद घेऊन निघा.


कर्क : त्रास वाढेल


आज विशेषत: सांधेदुखीचा त्रास असलेल्यानंी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. कारण आपल्या त्रासामध्ये वाढ होऊ शकते. लेखक व कवी मंडळींसाठी आजचा दिवस यशदायक असून लेखन कार्यात प्रगती होऊन नावलौकिकातही भर पडू शकते. प्रयत्न करणा-यांना यश नक्की मिळतं हे लक्षात ठेवा.


सिंह : आरोग्याची काळजी घ्या


आज आपली प्रकृती थोडी नरम-गरम राहण्याची शक्यता आहे. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. कुणावरही तडका-फडकी शेरेबाजी करु नका. संबंधामध्ये दरी पडण्याची शक्यता आहे. उपवर वधु-वरांसाठी स्थळे येण्याची आज शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल.


कन्या : पथ्य पाळा


आपल्याला आहाराचे कुठले पथ्य सांगितलेले असतील तर आज ते तंतोतंत पाळण्यावर भर द्या. नाही तर त्रासमध्ये वाढ होऊ शकते. मात्र आधी पटोबा मग विठोबा करण्यावर भर असू द्या. बोलतांना अचुक संवाद साधा. आपल्या बोलण्याने कोणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. कुणालाही फुकटचा सल्ला दे­ण्याच्या भानगडीत पडू नका.


तूळ : संधीवात वाढेल


संधीवाताचा त्रास असलेल्यांनी आज आपला त्रास वाढणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. एखाद्या मोठ्या संकटातून आज सुखरुपणे बाहेर पडू शकाल. त्यामुळे परमे·ाराची आपल्यावर असिम कृपा असल्याची भावना आज मनामध्ये दाटून येईल. खेळाडूंसाठी आजचा दिवस विशेष प्राविण्य मिळविण्याचा असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करा.


वृश्चिक : खर्चाकडे लक्ष ठेवा


अंथरुन पाहूनच पाय पसरायला हवेत. आज आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनस्वी आनंद प्राप्त होईल. मानसिक शांतेता अनुभव त्यातून करु शकाल. आज कानाचे दुखणे वाढण्याची शक्यता आहे. म्हणून काळजी घ्या. दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका.


धनु : सुर्वाता येतील


नोकरदार मंडळीसह व्यावसायिकांसाठीही आजचा दिवस आनंददायी आहे. कारण आज तुमच्यसाठी सुर्वाता येण्याचे योग आहेत. तेव्हा आनंदाच्या प्राप्तीसाठी सज्ज राहा. जीवनामध्ये प्रत्यके गोष्ट फक्त आपल्यालाच मिळेल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तशा अपेक्षेने लक्ष विचलित होऊ शकतं. उन्हापासून सावध राहा. त्रास होऊ शकतो.


मकर : लालसा नको


एखाद्या गोष्टीची लालसा किंवा हव्यास ठेवणे वाईट असते. पैशांची तर अजिबात नको. झटपट पैसे मिळवि­ण्याच्या मागे लागून मार्ग चुकणार नाही, याची काळजी घ्या. इतरांच्या अनुभवावरुन शहाणे होण्याचा आजचा दिवस आहे. यश प्राप्त होत नसेल तर कर्मात बदल करुन पाहा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद