18 मार्च 2019 चं राशीफळ , मीन राशीच्या लोकांचे प्रमोशन होण्याची शक्यता

18 मार्च 2019 चं राशीफळ , मीन राशीच्या लोकांचे प्रमोशन होण्याची शक्यता

 


मेष : वरीष्ठ नाराज होतील


आज आपले कामात लक्ष लागत नसल्याने आपल्या हातून कामात चुका होण्याचा दिवस आहे. त्यामुळे वरीष्ठाच्या नाराजीचा सामना करावा लागेल. स्त्रीयांसाठी आजचा दिवस समजुतदाराचा असेल. कुठल्याही परिस्थितीत त्या आज समजुतदारपणा दाखविणार आहेत. शत्रुला नामोहरम करण्याची संधी आज तुम्हाला मिळू शकते.


कुंभ : कागदपत्रे सांभाळा


आज तुम्हाला आपली महत्त्वाची कागदपत्रे तपासण्याचा व ते सांभाळून ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तेव्हाच गरजेच्यावेळी शोधाशोध न होता ते तुमच्या कामी येऊ शकतील. सौ बका एक लिखा ही गोष्ट पाळण्यावर भर द्या. घर आज गजबजलेले असेल. कारण घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज दिवसभर आनंदाचे आल्हाददायी वातावरण असेल.


मीन : बढती मिळेल


आज सुयोग्य कर्मचा-यांना बढती मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. साखरेचे खाणार त्याला देव देणार आहे. हे लक्षात घेऊन डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून आज तुम्हाला दिवसभर राहावे लागेल. अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण राहणार आहात. भाग्याची साथ मिळण्यासाठी आधी परिश्रम करावी लागतील.


वृषभ : सावधानता बाळगा


व्यावसायिकांनी आज थोडी सावधानता बाळगावी. विशेषत: आज जर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतवणूक करत असाल, ती काळजीपूर्वक व नियमानुसारच करावी. कुणावरही विसंबून राहू नका. निराशा पदरी पडू शकते. यश मिळविण्यासाठी पर्यायी साधन तयार ठेवा. कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.


मिथुन : जोड व्यवसायाचा विचार


प्रगती करण्यासाठी आज तुम्ही जोड व्यवसायाचा विचार करणार आहात. मात्र ते करीत असतांना हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये हे लक्षात ठेवा. भाग्याने तुमची परिक्षा घ्यायचं ठरविलेलं आहे. त्यामुळे आधी परिश्रम नंतरच भाग्याची साथ मिळेल. म्हणून आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. सायंकाळपर्यंत एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होऊ शकतो.


कर्क : काळजी घ्या


आज तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचा सल्ला देण्यात येत आहे. धावपळीमध्ये आरोग्याचं तंत्र बिघडणार नाही, याची काळजी घ्या. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. मित्रांची मदत प्राप्त होईल किंवा त्यांच्या सोबत तुम्ही एखाद्या गोष्टीचे नियोजन करु शकाल. कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.


सिंह : सुर्वाता येतील


मुलांकडून आज तुम्हाला सुर्वाता प्राप्त होतील. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका. आपल्या व्यस्त अशा दिनचर्येमध्ये कामातून थोडा आरामासाठी नक्की काढा. तुम्हाला त्याची गरज आहे. त्यामुळे शारीरीक व मानसिक शांतता मिळेल. सर्व जबाबदा-या आज तुम्ही आनंदाने पार पाडणार आहात.


कन्या : खेळात सहभाग


मुले-मुली आज मैदानी खेळांमध्ये सहभाग घेतील. त्यात त्यांना यशही मिळू शकतं. शत्रुपासून आज तुम्हाला सावध राहावं लागू शकतं. थोडीशीही बेफिकीरी आज तुमचं नुकसान करु शकते. एखाद्या संकटांवर आज तुम्ही धैर्याने मात करणार आहात. त्यामुळे आत्मविश्वासवाढीस लागेल.


तूळ : सामाजिक कार्यात सहभाग


आज संततीचा तुम्हाला अभिमान वाटेल. कारण आज ते सामाजिक कार्यात सहभाग घेणार आहेत. त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन नक्की द्या. दिवसभरात तणाव जाणवत असेल तर तो घालविण्यासाठी संगीत ऐका. मानसिक शांतता लाभेल. खेळाडूंसाठी आजचा दिवस यशदायक व अनुकूल असा आहे.


वृश्चिक : व्यवसायात यश


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. व्यवसायात आज दैदिप्यमान असं यश मिळू शकतं. ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना किंवा अपेक्षाही ठेवली नसेल अशी गोष्ट आज प्राप्त होऊ शकते. आज थोडं तुम्हाला उदार व्हावं लागणार आहे. शक्य झाल्यास यथाशक्ती दान नक्की करा. एखाद्या गोष्टीवर आज विनाकारण संताप येईल.


धनु : काळजी घ्या


पोटाचे विकार असल्यांना आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आज विकार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठले पथ्य सांगितलेले असतील तर आज त्याचे अगदी तंतोतंत पालन करा. कोणताही निर्णय घेतांना तो विचारपूर्वकच घ्या. सावधानता बाळगा. समोर आलेल्या संकटावर आज मात करु शकाल.


मकर : अनुकूल वातावरण


आज विशेषत: बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल असं वातावरण आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा व त्यात मिळणा-या संधीचा योग्य लाभ करुन घ्या. आज फुकटच्या गप्पा-टप्पा नकोत. नाही तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी तुमची अवस्था होईल. संवाद साधतांना मोजक्या शब्दात अचुक संवाद साधा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद