20 मार्च 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस

20 मार्च 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस

मेष : अपचनाचा त्रास


आज तुम्हाला आपल्या ­आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषत: जर तुम्हाला आहाराविषयी कुठली पथ्य सांगितलेली असतील, तर आज ती तंतोतंत पाळा. कारण आज तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. घरात आज प्रसन्नतापूर्ण वातावरण राहिल. कुठल्याच गोष्टीं चिंता आज करु नका. चिंतन करण्यावर भर द्या.


कुंभ : जंक फूड टाळा


जंक फूड आरोग्यासाठी कधीही हानिकारकच असतात. आज तर ते अजिबातच नको. शक्य तितके व्रत वैकल्याचे पालन करा. आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमविण्याचा प्रयत्न करा. त्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवा. यश मिळू शकतं.


मीन : विद्यार्थ्यांना यश


आज विशेषत: स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस असून त्यात यश प्राप्त होऊ शकतं. आज दिवसभर तुम्ही मानसिक सुख शांतीचा अनुभव कराल. त्यामळे मनाला प्रसन्नता वाटेल. आज तुमचा कार्यात व्यस्त राहण्याचा दिवस आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्नशील राहा.


वृषभ : गोंधळात पडाल


आज तुम्ही गोंधळात पडू शकतात. सरकारी कर्मचा-यांना आज याचा विशेष त्रास होईल. त्यामुळे सावध राहा. आपल्या हातून चुक होणार नाही किंवा चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही, याची काळजी घ्या. अनामिक शत्रु अनामिकपणे सामोरा येऊन तुमचा विरोध करु शकतो. त्यांच्यापासून सावध राहा. आज आपल्या योग्यतेला योग्य अशी उंची प्राप्त होऊ शकते.


मिथुन : अनुकूल वातावरण


कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला अनुकूल असं वातावरण आहे. व्यावसायिकांसाठी तर आजचा दिवस उत्तम असा आहे. म्हणून मिळणा-या संधींवर लक्ष ठेवा व लाभ घेण्यासाठी तयार राहा. आज तुम्ही तोलून मोलूनच बोलणे योग्य राहिल. आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. काही प्रसंगात मानसन्मानात वाढ होऊ शकते.


कर्क : अभ्यासात लक्ष द्या


आज खास करुन महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण मन विचलित होऊन अभ्यासावर दुर्लक्ष होऊ शकतं. आपले उत्पन्न व खर्च यांचा योग्य ताळमेळ बसवून अनावश्यक खर्चाला कात्री लावा. अंथरुन पाहून पाय पसरावे. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालविणार आहात.


सिंह : व्यायाम करा


व्यायाम करण्यासाठी वेळ काढण्याचा सल्ला आपल्याला आज देण्यात येत आहे. रोजच्या जीवनात व्यायामाची सवय लावून घ्या. त्याची तुम्हाला गरज आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकाच साधनावर अवलंबून न राहता पर्यायी साधने तयार करण्याचा व त्याचा लाभ घे­ण्याचा प्रयत्न करा. नवीन वास्तू खरेदी करण्याचे योग आहेत.


कन्या : संपत्तीचा वाद मिटेल


आपल्या परिवारात जर संपत्तीला घेऊन वाद सुरु असेल तर तो आज मिटण्याचे योग आहेत. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. वरकरणी कनवाळू व आतून कठोर अशा द्विस्वभावी लोकांपासून सावध राहा. कोणाशीही बोलतांना मुद्देसुद बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असं आज करु नका. योग्य सुसंवाद साधा.


तूळ : मोह टाळा


आज विशेषत: गृहिणींना खरेदीचा मोह टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. खर्च करण्याआधी आपले आर्थिक नियोजन तपासून बघा. ते कोलमडणार नाही याची काळजी घ्या. जीवनामध्ये कुठलाच धोक न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो, ही बाब लक्षात घेऊन हिम्मत करुन, योग्य नियोजन करुन धोका पत्करायला हरकत नाही.


वृश्चिक : वैवाहिक आयुष्य सुरेख


आज वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. ते कायमस्वरुपी तसेच राहावे, यासाठी प्रयत्न करा. आज प्रिय व्यक्तींसोबत आपल्या गाठीभेटी होऊ शकतील. त्यामुळे एकूनच आज आपल्यासाठी दिवसभर आनंदाचे वातावरण राहिल. मात्र कुणावर विसंबून राहू नका.


धनु : आरोग्याची काळजी घ्या


आज जेष्ठ नागरीकांना आज आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दे­ण्यात येत आहे. किरकोळ आजारही त्रासदायक ठरु शकतात. आज आपल्या नवीन ओळखी होतील. त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा. कोणताही निर्णय घेतांना तळ्यात मळ्यात अशा अवस्थेत राहू नका. विचारपूर्वकच निर्णय घ्या.


मकर : काळजी घ्या


आज आपल्या हाता-पायांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. दुर्लक्ष करु नका. आज योग्य व महत्त्वाचं अपूर्ण असलेलं काम कोणतं त्यांना महत्त्व देऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मार्ग सापडत नसेल तर हतबल होऊ बसण्यापेक्षा चालायला सुरुवात केलेली चांगली. प्रयत्नांनीच परमेश्वराची प्राप्ती होते, हे लक्षात घ्या.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद


राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)