21 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांसाठी आज केलेली गुंतवणूक फायदेशीर

21 मार्च 2019 चं राशीफळ,  मेष राशीच्या लोकांसाठी आज केलेली गुंतवणूक फायदेशीर

मेष : गुंतवणूक फायदेशीर


आपल्या मनात गुंतवणूक करायचा विचार सुरु असेल तर आजचा दिवस त्यासाठी फायदेशीर आहे. आज आज गुंतवणूक करायला हरकत नाही. ओळखीच्या लोकांबरोबर सामंजस्य वाढण्याचे योग आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा लाभ घेऊन संबंध सुदृढ करण्यावर भर द्या. एखाद्या कामाला वेळ जास्त लागू शकतो. प्रयत्न करत राहा.


कुंभ : त्रास वाढेल


आज विशेषत: मधुमेह असणा-यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपला त्रास आज वाढू शकतो. एखादे काम अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढवा. आज यश नक्की मिळू शकतं. पूर्वी केलेल्या एखाद्या कामाचे आज कौतुक होऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल.


मीन : सोशल मीडिया घातक
सोशल मीडिया, टीव्ही यांचा अती वापर घातक ठरु शकतो. विशेषत: विद्याथ्र्यांना यापासून लांब राहण्याचा सल्ला आज देण्यात येत आहे. अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. मित्रांकडून आज लाभ मिळू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्नांवरील निर्णय आज नको. त्यांच्या शक्यतोवर लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा.


वृषभ : विद्यार्थ्यांना लाभ


आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे. त्यांचा आभ्यासाकडे कल वाढणार आहे. एखादे महत्त्वपूर्ण काम बाकी असेल तर आज ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवायला हरकत नाही. आपल्याला यश नक्की मिळेल. भाग्याने आपली परिक्षा घ्यायचे ठरविलेले आहे. त्यामुळे यश मिळवायचे असेल तर आधी परिश्रम करावे लागतील. तेव्हा यश मिळेल.


मिथुन : आरोग्य चांगले


आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुदृढ राहणार आहे. दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहणार आहात. सकारात्मक विचार ठेवून तुम्ही त्याचा लाभ चांगल्या प्रकारे घेऊ शकता. कोणतेही काम करण्यापूर्वी थोडा विचार नक्की करा. सरळ निर्णय घेऊ नका. आज नवीन विचार मनात येऊ शकता. त्यामुळे मन थोडे विचलित राहील.


कर्क : व्यायाम करा


शरीर सुदृढ राखण्यासाठी वेळोवेळी व्यायाम करा व त्याची सवय लावून घ्या. सकाळी लवकर उठून फिरायला जा. थोरा-मोठ्यांच्या सल्ल्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तो न चुकता घ्या. घरात मंगलकार्य जुळून येण्याचे योग आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न वाढवायला हवेत. घरात आनंदाचे वातावरण असेल.


सिंह : उधारी येईल
आपली कुणाकडे उधारी अडकलेली असेल आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण उधारीचा पैसा वसूल करण्यात आज आपल्याला यश मिळू शकतं. बचतीचा मार्ग स्विकारण्याचा सल्ला आज आपल्याला देण्यात येत आहे. आज थोडीही बेशिस्त राहू नका. नुकसान होऊन एक ना धड भराभर चिंध्या याची अनुभूती मिळू शकते.


कन्या : सावध राहा


आज विशेषत: सरकारी कर्मचा-यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. महत्त्वाचा कुठला निर्णय विचारपूर्वकच घ्या. घाई गडबडीत कुळलेच काम आज नको. पळसाला पाने तीनच असतात. सत्यचा स्विकार करण्याची मानसिकता करुन ठेवा. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधण्यात कुठलेच शहाणपण नाही. त्यामुळे कल्पनाविश्वात रमू नका.


तूळ : कंटाळा कराल
आज विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल. मन इतर गोष्टीत रमलेले असेल. मात्र रोजचा अभ्यास त्याच दिवशी करायला हवा. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे धाडस करण्याची संधी सोडू नका. कलाकारांसाठी आजचा दिवस यशदायक आहे. यश मिळण्यासोबतच आज आपल्या लौकिकातही भर पडू शकते.


वृश्चिक : सहकार्य व खर्चही
आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. मात्र आज तुमचा भरपुर खर्चही होणार आहे. जो तुम्ही आनंदाने करणार आहात. आज प्रवासाचेही योग असून त्यात नुकसान होण्याचा संभव आहे. त्यामुळे काळजी घ्या. सावध राहा. नाही तर नंतर पश्चाताप करावा लागेल.


धनु : कष्टांचे सार्थक होईल
घेतलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत, याची अनुभूती तुम्हाला मिळू शकते. कारण आज आधी घेतलेल्या कष्टांचे सार्थक होऊ शकते. स्वत:च्या भरभराटीवर लक्ष द्या. थेंबे थेंबे तळे साचे, हे लक्षात घ्यावे. आज कुणावरही टिका टिप्पणी करु नका. शब्दांवर नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या.


मकर : पाहुणे येतील
अतीथी देवो भव: सांगणारी आपली संस्कृती आहे. आज आपल्या घरात पाहुण्यांची वर्दळ राहू शकते. त्यांचे योग्य आदरातिथ्य करा. कुणाच्याही व्यंगावर हसणे कधीही वाईटच. आज तर अजिबात नको. अतिविचार हे घातक असतात. भित्यापोटी ब्रम्हसारक्षस असतो. अतिविचारातून भिती व चिंता वाढते. म्हणून विचार सोडून चिंतन करण्यावर भर द्या.


राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद