22 मार्च 2019 चं राशीफळ, मीन राशीसाठी आजचा दिवस यशाचा

22 मार्च 2019 चं राशीफळ,  मीन राशीसाठी आजचा दिवस यशाचा

मेष : व्यवसायाची संधी


आपण सुरु करण्याचा विचार करीत असाल तर आजचा दिवस आपल्यासाठी लाभाचा आहे. कारण आज आपल्यासाठी व्यवसायाची संधी चालून येणार आहे. आज आपले भांवडांशी मतभेद होऊ शकतात. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करावा. जबाबदा-या टाळण्याकडे आज आपला कल राहू शकतो.


कुंभ : तपासणी करुन घ्या


आज विशेषत: मधुमेह असणा-यांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यांनी आपल्या साखरेची तपासणी आज करुन घ्यायला हवी. तणाव जाणवत असल्यास संगीत ऐकण्यावर भर द्या. मनाला आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक ठेवा. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चिंता करण्यापेक्षा चिंतनावर भर द्या.


मीन : आशीर्वाद मिळवा


गुरूविना गती नाही, असे म्हटले जाते. आपल्या गुरुंच्या आशीर्वादाची नितांत आवश्यकता आहे. गुरुंच्या सानिध्यात जावून त्यांचे मार्गदर्शन व ­आशीर्वाद मिळवा. अतिआत्मविश्वास हा घातक असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणून वास्तविकता समजून घ्या. यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या.


वृषभ : कामे पूर्ण होतील


अधिकारी वर्गाच्या हातात आपले एखादे काम अपूर्ण असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. नाही तर हत्ती गेला नि शेपूट राहिले, याचा अनुभव येईल. आज आपल्याला अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. त्यामुळे चिंता वाढू शकते. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये. म्हणून कुणाशी वैर भावना असेल तर आज तीचा त्याग करा.


मिथुन : चिकाटी ठेवा


भाग्य आपली परिक्षा घेत असल्याने कामाला उशीर होऊ शकतो. म्हणून चिकाटी कायम ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा. आज आपल्याला वास्तुतून लाभ होण्याचे योग आहेत. मन विचलित झाल्यास कामात लक्ष लागणार नाही. त्यामुळे कामे अडकून पडण्याची आहे. म्हणून कामाची गती वाढवा.


कर्क : आशीर्वाद मिळवा


आपल्याला गुरुंचे आशीर्वाद प्राप्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे गुरुंच्या सानिध्यात जा. त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळवा. आज आपण प्रवास करु शकतात. त्यातुन आपल्याला नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता असल्याने प्रवासाचा आनंद द्विगुणीत होईल. बचतीचा मार्ग स्विकारावा. त्यातच आपला लाभ आहे.


सिंह : आनंदी वातावरण


आज आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असेल. कारण आज आपल्या घरात आनंददायी वातावरण राहणार आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी असल्याने त्यांच्यात सहभागी होऊन तो आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करा. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका साधनावर अवलंबून राहू नका. अब पछताये क्या होत जब चिडिया चुग गई खेत. म्हणून पर्यायी साधने तयार करण्याचा प्रयत्न करा.


कन्या : गैरसमज होईल


सत्य समजून न घेता तत्काळ कुणाविषयी कुठला समज करुन घेणे कधी कधी वाईट ठरु शकते. आज आपला जोडीदाराविषयी गैरसमज होऊ शकतो. घरोघरी मातीच्या चुली. त्यामुळे गैरसमज वाढणार नाही, याची काळजी घ्या. वरीष्ठांना निश्चित आपल्यापेक्षा ज्ञान अधिक असते. म्हणून त्यांचा सल्ला अवश्य घ्या. वेळ मिळत आहे, त्यामुळे आज मनसोक्त जगुन घ्या.


तूळ : भावंडांची काळजी घ्या


आज लहान भावंडांची विचारपुस करा. त्यांची खुशाली जाणून घ्या, त्यांची काळजी घ्या. कदाचित त्यांना तुमच्या मदतीची गरज असू शकते. वरकरणी कनवाळू व आतून कठोर अशा द्विस्वभावी व्यक्तींपासून सावध राहा. त्यांच्यापासून तुम्हाला नुकसान पोहचू शकते. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधु नका. वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक : शितयुद्ध लांब ठेवा


आज तुम्हाला आपल्या घरात लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपल्या घरात जर शितयुद्ध सुरु असेल तर त्याला वेळीच थांबवि­ण्यासाठी प्रयत्न करा. आज आपले प्रवासाचेही योग असून तो सुखाचा व आनंददायी होऊ शकतो. त्यामुळे मनाला ताजेतवाने वाटेल. आज कुणाच्याही व्यंगावर चुकूनही हसू नका.


धनु : आशीर्वाद मिळतील


आपल्याला वडीलांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळणार आहेत. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घ्या. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खांचा भागाकार करावा लागतो. म्हणजे वाईट गोष्टींना सोडून चांगल्याचा ध्यास मनी धरा. नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा. आज वरीष्ठांचा सल्ला आपल्या खूप कामी येईल. म्हणूून तो घ्यायला विसरु नका.


मकर : तणाव जाणवले


आज विशेषत: स्त्रियांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपल्या गोष्टी करण्यामध्ये वेळ घालवा. कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. म्हणजे त्रास होणार नाही. इतरांसाठी आज मनसोक्त वेळ मिळत असल्याने मनसोक्त जगुन घ्या. आयुष्याचा पुरेपुरे आनंद आज आपण उपभोगु शकाल. मात्र काही प्रसंगी अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामनाही करावा लागू शकतो.


राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद