26 मार्च 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ

26 मार्च 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ

मेष : गोंधळ उडेल


आज विशेषत: सरकारी कर्मचा-यांनी सावधनता बाळगावी. कारण आज आपला थोडा गोंधळ उडणार आहे. आपल्या हातून चुकीचे काम होणार नाही याची काळजी घ्यावी. भावडांशी मदभेद होऊ शकतात. टाळी एका हाताने वाजत नाही, हे लक्षात घेऊन सामंजस्याची भुमिका घ्या. आज विनाकारण संताप येऊ शकतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा.


कुंभ : ताण वाढेल


आज विशेषत: बँक कर्मचा-यांचा ताण वाढू शकतो. मात्र आपले काम आपल्यालाच पूर्ण करावे लागेल. ही सत्यता लक्षात घेऊन ताणापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. शत्रुंपासून आज आपल्याला अत्यंत सावध राहावे लागेल. आज आपल्याकडे भरपुर वेळ आहे. त्याचा सदुपयोग करुन घेण्याचा प्रयत्न करा.


मीन : सावध राहा


आपण जर भागीदारीत व्यवसाय, व्यापार करीत असाल तर आज आपल्याला सांभाळून राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते. जोडीराशी आज मनमुटाव होण्याची शक्यता आहे. घरोघरी मातीच्या चुली असतात. म्हणून सामंजस्याची भुमिका घ्या. मनस्वास्थ बिघडविणा-या घटना आज घडू शकतात.


वृषभ : राजमार्ग सापडेल


आज आपल्यासाठी अत्यंत लाभाचा दिवस आहे. आज आपल्याला यश मिळवून देणारा राजमार्ग सापडू शकतो. फक्त येणारी संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपण सामाजचं देणं लागतो, हे लक्षात घेऊन आज यथाशक्ती दोन्ही हातांनी देण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत संयम आणि सामंजस्याने वागण्यावर भर द्या.


मिथुन : अपचनाचा त्रास


आज आपल्याला आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण आज आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो. मिळविण्यासोबतच देण्याचाही प्रयत्न करा. देण्यातला आनंद तुम्हाला मनशांती प्रदान करु शकतो. महत्त्वाकांक्षापूर्तीचा आजचा दिवस आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा.


कर्क : संततीला यश


आज आपल्याला संततीकडून सुर्वाता कानी येऊ शकतात. आज त्यांना यश मिळू शकतं. त्यांचे कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. प्रयत्न करुनही जर यश मिळत नसेल तर कर्मात बदल करुन पाहा. भाग्याची साथ निश्चित मिळू शकते. कोणताही निर्णय घेतांना अत्यंत सावधपणे घ्या. घाई गडबडीत घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरु शकतो.


सिंह : धाडस नको


व्यवसायामध्ये धाडस करणे आवश्यक असले तरी व्यावसायिकांनी आज कोणतेही धाडस करायला नको. त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्या. आजच्या दिवसाची आखणी नियोजबद्ध पद्धतीने करा व त्यानुसारच कामे करण्याचा प्रयत्न करा. सायंकाळ पर्यंत एखादा आकस्मिक आनंद प्राप्त होऊ शकतो.


कन्या : मार्गदर्शन मिळेल


आज तुम्हाला वडीलांकडून मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घेण्याचा प्रयत्न करा. मात्र आज भावडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. टाळी एका हाताने वाजत नसल्याने वाद वाढवू नका. सामंजस्याची भुमिका घ्या. कोणताही निर्णय घेतांना अत्यंत सावधानता बाळगा.


तूळ : नाराजी ओढवाल


आज आपल्यावर बॉस नाराज होण्याची शक्यता आहे. कामामध्ये मन लागणा नाही. मन विचलित होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यातही तणाव वाढू शकतो. सामंजस्याची भुमिका घ्या. नाही तर भांड्याला भांड लागून ­आवाज होणारच आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागू शकतात. म्हणून प्रयत्न वाढवून बघा.


वृश्चिक : अनुकूल ग्रहमान


आज विशेषत: छोट्या व्यावसायिकांच्या दृष्टीने लाभाचा दिवस आहे. आज अनुकूल असे ग्रहमान असल्यामुळे मिळणा-या संधीकडे लक्ष द्या. सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी आपली अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या. अपूर्ण असलेली कामे लक्षपूर्वक पूर्ण करा.


धनु : पाहुण्यांची वर्दळ


आज आपल्या घरात पाहु­ण्यांची वर्दळ राहणार आहे. नवीन ओळखी होतील. संबंध अधिक दृढ होण्याचे आज योग आहेत. त्यामुळे त्याचा फायदा करुन घ्या. आधी परिश्रम नंतरच आपल्याला भाग्याची साथ लाभणार आहे. त्यामुळे स्वत:वर, आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा व प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. निर्णय घेण्याआधी वरीष्ठांचा सल्ला घ्यायला विसरु नका.


मकर : साथ लाभेल


प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक जोडीदार असतो. त्याची साथ फार मोलाची असते. आपल्याला जोडीदाराकडून अशीच साथ लाभणार आहे. मात्र आपल्या घरात जर शितयुद्ध सुरु असेल तर घरात वेळीच लक्ष घालून ते थांबविण्याचा प्रयत्न करा. परिश्रम घेऊनही यश मिळत नसेल तर प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल.


राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद