27 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना होणार धनलाभ

27 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना होणार धनलाभ

मेष : अर्थसहाय्य मिळेल


व्यवसायिक वृद्धीसाठी आपण जर अर्थसहाय्य घेण्याच्या प्रयत्नांमध्ये असाल तर आज आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. याशिवाय आपल्याला आज वडील बंधुंकडूनही आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. आज दिवस अतिशय उत्तम असल्याने कुठल्याही वादविवादात शक्यतोवर अडकू नका.


कुंभ : जंक फूड टाळा


जंक फूड हे आरोग्यासाठी कधीही हानिकारकच असातत. आज तर त्यांचे अजिबात करु नका. नाही तर त्रास होऊ शकतो. आज तुमचे शत्रू वरचढ होऊ शकतात. त्यामुळे आत्मश्वासाचे खच्चीकरण होऊ शकते. हतबलता मनात येईल. त्यापासून परावृत्त होण्यासाठी आपल्यातली लवचिकता थोडी वाढवा.


मीन : वाद होण्याची शक्यता


सासु-सुनेचा वाद कुठल्याच घराला सुटलेला नाही. भांड्याला भांड लागलं तर आवाज होणारच आहे. मात्र सामंजस्याची भुमिका घेऊन आपण त्याची तीव्रता कमी करु शकतो. यश मिळविण्यासाठी कुणावरही विसंबून राहू नका. नाही तर घात होऊ शकतो. स्वत:ची लढाई ही स्वत:लाच लढावी लागू शकते. स्वत:मधील लवचिकता थोडी वाढवा.


वृषभ : संधीवात वाढेल


संधीवाताचा त्रास असलेल्यांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. कारण आपला त्रास आज वाढू शकतो. आज आपले प्रवासाचेही योग असून त्यात नवीन ओळखी होऊ शकतात. त्यामुळे प्रवास सार्थकी लागल्याचे समाधान लाभेल. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदी राहण्याचा आहे. त्याचा लाभ करुन घ्या.


मिथुन : व्यायाम करा


रोज सकाळी फिरायला जाणे व व्यायामासाठी वेळ काढणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. त्यामुळे ते न चुकता करा. मित्रांबरोबर असलेले गैरसमज दूर होऊ शकतात. त्यामुळे सकारात्मकता ठेवून झाले गेले विसरुन जाण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्या. गरज पडल्यास वरीष्ठांचा, तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरु नका.


कर्क : संपत्तीचा वाद मिळेल


आपल्या घरात जर पैतृक संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. तडजोडीचे धोरण स्विकारा. लाभ होईल. वडीलांचेही आशीर्वाद आज आपल्या मिळू शकतात. आजचा दिवस आपल्यासाठी नवीन संकेतांनी भरलेला आहे. त्यांना वेळीच ओळखून कार्याची दिशा ठरवा


सिंह : सुर्वाता कानी येईल


आज आपल्या घरात आनंदी आनंद असेल. कारण आज मुलांकडून आपल्याला सुर्वाता कानी येऊ शकतात. स्त्रीया आज अधिक समजुदरीने वागण्याचा प्रयत्न करतील. सगळ्यांना सांभाळून घेण्याला प्राथमिकता देतील. कामाच्या व्यापात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. दगदग सहन होणार नाही.


कन्या : कौतुक होईल


आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा व आत्मविश्वास वाढविणारा दिवस असेल. कारण आज वरीष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. घेतलेले परिश्रम सार्थकी लागल्याची भावना मनात दाटुन येईल. दररोज न चुकता दारापुढील तुळशीला पाणी घाला. आजचा दिवस सर्व दृष्टीने उत्तम आहे. लाभासाठी ग्रहमान अनुकूल असे आहेत.


तूळ : अपेक्षित गोष्टी साध्य


मुलांच्या बाबतीत आपण ज्या गोष्टींची अपेक्षा केलेली असेल त्या आज साध्य होऊ शकतात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. मुलांना प्रोत्साहन द्याल. कुठल्याही गोष्टीवरील अतिविचार हे घातक असतात. त्यातून मनात भिती निर्माण होते व भित्यापोटी ब्रम्हराक्षस असतो. म्हणून चिंतन करण्यावर भर द्या. सरकारी कामात यश मिळेल.


वृश्चिक : आशीर्वाद मिळवावेत


गुरु व जेष्ठांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळविण्याचा आपणास आज सल्ला देण्यात येत आहे. त्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. त्यातुन तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. आज थोडीही बेशिस्त नको. नाही तर एक ना धड भराभर चिंध्या, याचा अनुभव येईल. महत्त्वाकांक्षी योजना आज राबवू शकाल. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल.


धनु : लेखन कार्यात यश


लेखक, कवी मंडळींसाठी आजचा दिवस आनंद व यशदायी आहे. कारण आज त्यांच्या लेखन कार्याला यश मिळू शकते. सोबतच लौकिकातही भर पडेल. जोडीदारा सोबत आज तुम्ही प्रवासाचा आनंद घेणार आहात. मात्र कामे टाळण्याकडे लक्ष राहिल. आळस अंगात घुसलेला असेल. न कत्र्याचा वार शनिवार हे लक्षात असू द्यावे.


मकर : तणाव वाढेल


गृह कलहाचा आजचा दिवस असेल. पती-पत्नीच्या संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन तणाव वाढू शकतो. हे सर्व गैरसमजुतीतून होईल. त्यामुळे तणाव वेळीच कमी करण्याचा प्रयत्न करा. घरोघरी मातीच्याच चुली असतात. हे लक्षात घ्या. घरात शांती राहिली तर आज फार छान वेळ आहे. त्यामुळे मनसोक्त जगुन घ्या. परिवारा सोबत वेळ घालवा.