29 मार्च 2019 राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

29 मार्च 2019 राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

मेष : लालसा नको


जीवनात लालसा मोठा घात करु शकते. लालसा मनी धरुन झटपट पैसे मिळविण्याच्या मार्गाला लागू नका. जीवना योग्य पद्धीतेने झटपट काहीच मिळत नाही. म्हणून आपला मार्ग चुकीचा तर नाही ना याची खात्री करुन घ्या. शाळेतल्या मित्र-मैत्रीणीची आठवण मनात येईल. जुन्या आठवणीत तुम्ही रममान व्हाल. मानसन्मान वाढ होईल.


कुंभ : अभ्यासात रुची


विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठीही आजचा दिवस आनंदाचा आहे. कारण विद्याथ्र्यांचा आज अभ्यासाकडे कल वाढणार आहे. आज तुम्ही वास्तूवर आनंदात खर्च करणार आहात. सोबतच आज तुम्ही नवीन वस्तूचीही खरेदी करणार आहात. त्यामुळे घरातही प्रसन्नता राहिल. थोडक्यात आजचा दिवस सर्वच दृष्टीने लाभदायी आहे. त्याचा लाभ करुन घ्या.


मीन : व्यवसायात यश


व्यावसायिकांसाठी आज दैदिप्यमान यश मिळवि­ण्याचा दिवस आहे. अपेक्षेपेक्षा आज जास्त मिळू शकतं. त्यामुळे संधीचा पूर्ण लाभ घ्यायला विसरु नका. जेवढं शक्य आहे तेवढं पदरात पाडून घ्या. प्रवासातूनही संधी प्राप्त होऊ शकते. सत्याची कास सोडू नका. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे लक्षात ­असू द्या.


वृषभ : आरोग्य सांभाळा


रोजच्या दगदगीच्या जीवनात आपल्या आरोग्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्या. आज त्रास जास्त जाणवू शकतो. मित्रांच्या गाठीभेटीमुळे आज मन प्रसन्न राहिल. विचारांमधुन बाहेर पडायला त्यातून मदत मिळणार आहे. कलाकारांसाठी आजचा दिवस यशदायी आहे. सोबतच लौकिकतही भर पडू शकते.


मिथुन : बढतीची शक्यता


नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. आपण जर बढतीसाठी प्रात्र असाल तर आज तुमच्या बढतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. जेष्ठांचे मार्गदर्शन, आशीर्वाद न चुकता घ्या. त्यांचे मार्गदर्शन तुमच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरु शकते. तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. त्यामुळे परिश्रम सार्थकी लागण्याची भावना मनात येईल.


कर्क : खर्चाकडे लक्ष ठेवा


अंथरुन पाहुन पाय पसरावे, असे म्हटले जाते. आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार नाही, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी अवास्तव व अनावश्यक खर्चाला कात्री लावा. सासरकडच्या मंडळींकडून आग्रहाचे आमंत्रण येईल. जे तुम्ही आनंदाने स्विकारणार आहात. आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारा आजचा दिवस असेल.


सिंह : मुलांना यश


आज तुमच्या मुलांना खेळामध्ये यश मिळू शकतं. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. धार्मिक यात्रा घडण्याचे योग आहेत. त्यामुळे आध्यात्मान मन रममान होण्यास मदत मिळेल. पैसे खर्च करतांना मात्र सांभाळून खर्च करा. आपले आर्थिक नियोजन कोलमडणार नाही, याची काळजी घ्या.


कन्या : वसुली येईल


आपले उधारीचे पैसे जर कुणाकडे अडकलेले असतील तर आज ते वसुल होऊ शकतात. म्हणून त्यासाठी आज प्रयत्न वाढवायला हवेत. तुमच्या निर्णयामध्ये आज तुम्हाला जोडीदराची पूर्ण साथ मिळणार आहे. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करु नका. वास्तविकता समजून घेण्याचा प्रयत्न करा.


तूळ : आरोग्य सांभाळा


आपले संपूर्ण लक्ष आरोग्याकडे देण्याचा सल्ला आपणास आज देण्यात येत आहे. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. त्यामुळे योग्य लोकांशी मैत्री करा. आपण जर कुणाची प्रशंसा करु शकत नसाल तर आपणाला टीका करण्याचा अजिबात अधिकार नाही. आज तर टिका किंवा तक्रार अजिबातच नको.


वृश्चिक : आर्थिक अस्थिरता


आज आपले आर्थिक नियोजन कोलमडू शकते. आकस्मिक आलेले खर्च डोकेदुखी वाढविणार आहेत. शत्रूंना पराभुत करण्याचा आजचा दिवस असेल. त्यामुळे आत्मविश्वासही भरपुर राहिल. वरकरणी कठोर आणि आतून कनवाळू स्वभावाचे तुम्ही आहात. त्यामुळे चुकीच्या लोकांपासून राहा. ते तुमच्या भावनांशी खेळू शकतात.


धनु : प्रवासात नुकसान


आज तुम्ही प्रवासात करणार आहात. मात्र त्यात नुकसान होणार असल्यामुळे सावध राहा किंवा प्रवास टाळा. मुलांच्या बाबतीत तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा केलेली असेल त्या आज साध्य होण्याचे योग आहेत. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करायचा असतो. हे लक्षात असू द्या.


मकर : आरोग्याला जपा


आज आपली प्रकृती थोडी नरम-गरम राहिल. त्यामुळे दगदग कमी करुन आपल्या आरोग्याला जपण्याचा आपणास आज सल्ला देण्यात येत आहे. अमर्यात सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आजचा तुमचा दिवस परिपूर्ण राहिल. त्यामुळे गरज पडल्यास धाडस करायला चुकू नका. कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला प्राप्त होणार आहे.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद