3 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना मनशांती मिळण्याची शक्यता

3 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना मनशांती मिळण्याची शक्यता

मेष : मनशांती मिळेल


आजच्या आजुबाजुला मानसिक सुखशांती मिळवून देणारे वावरण असेल. त्यामुळे तृप्तीतेची अनुभूती येईल. वाहन सावकाश चालवा. वाहतूकीचे नियम पाळा. कुठे तातडीचे पोहचायचे असेल तर लवकर निघा. एखाद्या मोठ्या संकटातून सुखरुप बाहेर पडाल. देव तारी त्याला कोण मारी ही भावना मनात दाटून येईल.


 कुंभ : श्रमानंतरच भाग्य


कधी कधी भाग्य आपली परिक्षा घेत असतं. ते आधी आपल्याकडून श्रम करवून घेतं, त्यानंतरच सोबतीला येऊन यश देत असतं. सध्या तुमच्या सोबत तेच सुरु आहे. त्यासाठी स्वत:वर वि·ाास ठेवा. आत्मविश्वासाला जागवा. ईश्वराचे आपल्यावर आशीर्वाद असल्याची भावना आज आपल्या मनात जागृत होणार आहे. आज फुकटच्या गप्पा-टप्पा नकोत.


मीन : नवीन ओळखी होतील


आज तुमच्यासाठी नवीन ओळखी करुन घेण्याचा दिवस असून त्यांना आत्मवि·ाासाने सामोरे जा. भविष्यात त्याचा फायदाच होईल. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यात नुकसान होण्याचा संभव आहे. म्हणून प्रवास टाळा किंवा साधव राहा. कुणावरही विसंबून राहू नका. ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकतं.


वृषभ : विरोध होईल


आज तुम्हाला अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. त्यामुळे लक्ष विचलित होऊ शकतं. सैतानालाही त्याचा वाटा द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जीवनात सर्वच गोष्टी आपल्यालाच मिळतील ही अपेक्षाच व्यथ्र्य आहे. अतिविचार घातक असतात. चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्यावर भर द्या.


मिथुन : काळजी घ्या


आज तुम्हाला स्वत:ची काळजी घ्यायची आहे. विशेषत: वाहन चालवितांना हळू चालवा. वाहतुकीचे नियम पाळा. वेळेच्या आधी निघा. म्हणजे घाई होणार नाही. प्रेमवीरांसाठी आज आनंदाचा दिवस असून प्रेयसिशी संपर्क होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण राहिल. कुणाशीही बोलतांना अचुक संवाद साधा.


कर्क : वास्तूवर खर्च


आज तुम्ही वास्तुवर आनंदाने आवश्यक तो खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनस्वी आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात. कोणतीही कृती किंवा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच सावध व्हा.


सिंह : शत्रू पराभूत होतील


आज तुमच्यासाठी पराक्रम गाजविण्याचा दिवस असून त्यामुळे तुमचे शत्रू पराभूत होणार आहेत. त्यामुळे संधीचा लाभ घ्यायला विसरु नका. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे पूर्ण कराण्यावर आज भर द्या. थोडा वेळ मनोरंजानासाठीही काढा. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळू शकतं.


कन्या : सामंजस्य वाढेल


आज तुमचे ओळखीच्या लोकांबरोबर सामंजस्य वाढणार आहे. त्यांना आत्मवि·ाासाने सामोरे जा. त्यामुळे संबंध सुदृढ होण्यास मदत होऊ शकते. प्रयत्न करुनही जर यश मिळत नसेल तर कर्मात बदल करुन पाहा. भाग्यही बदलू शकतं. आज कोणावरही टिका टिप्पणी करु नका. बोलतांना आपल्याकडून कोणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या.


तूळ : शत्रू वरचढ होतील


आज तुम्ही थोडे विचलित होणार आहात. आत्मविश्वासाची कमीही जाणवेल. कारण आज तुमचे शत्रू पराभुत होणार आहेत. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यातून तुम्हाला संधी मिळू शकते. मार्ग सापडत नसेल तर हतबल होऊन बसण्यापेक्षा चालायला सुरुवात करा. भाग्य तुमच्या मागे येईल. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा.


वृश्चिक : गैरसमज होईल


कोणतीही गोष्ट व्यवस्थित समजून घेतली नाही तर गैरसमज होतात. आज तुमचा एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. म्हणून सावध राहा. त्यातुन संबंध खराब होऊ शकतात. इच्छिलेल्या कार्याला उशिर होऊ शकतो. म्हणून विचलित होऊ नका. चिकाटीने प्रयत्न राहा. तणाव जाणवत असेल तर संगीत ऐकण्यावर भर द्या.


धनु : लेखकांना यश


लेखक मंडळींसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. कारण आज त्यांच्या लेखन कार्याला यश मिळू शकतं. आज तुमच्यासाठी पराक्रम गाजविण्याचाही दिवस असून त्यातून शत्रुंना नामोहरण करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कोणाविषयीही टिका किंवा तक्रारी करण्यामध्ये वेळ घालवू नका. पदरी पडले अन् पवित्र झाले, हे समजून घ्या.


मकर : वास्तूतून लाभ


आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असून तुम्हाला वास्तूतून लाभ मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने मनस्वी आनंदाची प्राप्ती तुम्ही करणार आहात. कुणाच्याही व्यंगावर हसणे ही बाब कधीही वाईटच. आज तर ती अजिबात करायला नकोच.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र