30 मार्च 2019 चं राशीफळ, मीन राशीच्या लोकांना आज विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज

30 मार्च 2019 चं राशीफळ,  मीन राशीच्या लोकांना आज विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज

मेष : विद्यार्थ्यांना लाभ


विद्यार्थ्यासाठी आजचा दिवस लाभचा आहे. कारण आज त्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात असणार आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला परिश्रम घ्यावेच लागतील. आज आपल्या नवीन ओळखीही होऊ शकतात. शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखण्याचा प्रयत्न करा.


कुंभ : आशीर्वाद मिळवा


जीवनामध्ये गुरुचं स्थान खूप मोठ असतं. त्यामुळे मन विचलित झाल्यास गुरुंच्या संगतीत जाऊन त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करावा. कारण गुरुवीना गती मिळत नाही. घरातील वातावरण तणावपूर्ण राहिल. जीवनामध्ये कुठलाच धोका न पत्करणे हाच मोठा धोका असतो. म्हणून धाडस करा.


मीन : विचारपूर्वक निर्णय घ्या


आज तुम्हाला कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषत: सरकारी कर्मचा-यांनी आज सावधानता बाळगणे गरजेचे आहे. पळसाला पाने तिनच असतात. हे लक्षात घेऊन वास्तविकता समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मित्रांशी आज सुसंवाद वाढेल. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, हे लक्षात घ्या.


वृषभ : तणाव जाणवेल


आज नोकरदार महिलांना तणाव जाणवणार आहे. कारण कुटुंब व नोकरी यामधला ताळमेळ आज बिघडणार आहे. दोन्ही गोष्टी सांभाळतांना त्यांची तारांबळ उडू शकते. कोणताही निर्णय घेण्याआधी थोरा-मोठ्यांचा सल्ला घ्यायला विसरु नका. गरज पडल्यास त्यांच्या परिचयाचाही लाभ घेऊन आपले कार्य पूर्ण करण्यावर भर द्या.


मिथुन : त्रास वाढेल


आपल्या जर पोटाचा विकार असेल तर आपल्यासाठी काळजी करण्याचा आजचा दिवस असेल. कारण विकार बळावून त्रास वाढू शकतो. म्हणून लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका. वैवाहिक आयुष्यातील विविध रंग आज अनुभवायला मिळतील. स्वार्थ साधुन स्वत:च्या भरभराटीवर आज लक्ष द्या. थेंबे थेंबे तळे साचे याचे भान असू द्या.


कर्क : व्यवसायाची संधी


आपण जर स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर आज तुमच्यासाठी संधी चालून येणार आहे. तिचा लाभ घ्यायला चुकू नका. सासुरवाडीच्या मंडळींकडून आज तुम्हाला लाभ होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. आज तुमच्यासाठी संधी मिळण्याचा दिवस आहे. त्यांचा पूरेपुर लाभ घ्या.


सिंह : अभ्यासात लक्ष द्या


परिक्षांचा कालखंड सुरु असल्याने महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज मदत होईल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. कुणी सांगितलेले ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. नाही तर फसगत होऊन नुकसान होऊ शकते.


कन्या : काळजी घ्या


मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी आज आपली साखर तपासून घ्यावी. सुरु असलेली औषधी न चुकता घेऊन स्वत:ची काळजी घ्या. घरातील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे राहिल. मार्ग सापडत नाही म्हणून हतबल होऊन बसू नका. चालायला सुरुवात करा. भाग्य तुमच्या मागे येईल. प्रयत्नांती परमेश्वर असतो, हे लक्षात ठेवा.


तूळ : मर्जी सहन करावी लागेल


नोकरीमध्ये अधिकारी वर्गाची मर्जी सहन करावी लागेल व ती राखण्याचा प्रयत्नही करावा लागेल. त्यांनी सांगितल्या प्रमाणे वागावे लागेल. आज स्वत:चे आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. त्यामुळे काळजी दुर होईल. घरात मंगलकार्य जुळून येण्याचे योग आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. यश नक्की मिळेल.


वृश्चिक : विद्यार्थ्यांना त्रास


विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस तापदायक ठरु शकतो. म्हणून अभ्यास सोडून इतर गोष्टीत मन गुंतवू नये. वाहन सावकाश चालवा. वाहतुकीचे नियम पाळण्यावर भर द्या. कुठे तातडीने पोहचायचे असल्यास वेळेच्या आधी निघा. मोठ्या फायद्यासाठी आज लहान नुकसान चालेल. त्याला गुंतवणूक समजा.


धनु : शत्रूंपासून सावधान


आज आपल्याला शत्रूंपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ते तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात किंवा दोघांचे भांडण आणि तिस­-याचा लाभ होऊ शकतो. विद्याथ्र्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. संपूर्ण लक्ष अभ्यासात देऊ शकाल. कोणतेही काम करण्यापूर्वी जेष्ठांचे मार्गदर्शन घ्यायला विसरु नका.


मकर : दिलासा मिळेल


नोकरीच्या शोधात असणा-यांचा शोध आज संपू शकतो किंवा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे प्रयत्नांमध्ये वाढ करा. नवीन लोकांना भेटा. स्त्री पक्षाकडून आपल्याला आज सहयोग प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहिल. आपले अस्तित्व तुम्ही आज सिद्ध करु शकाल. परिणामी आत्मविश्वासउंचावलेला असेल.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद