31 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीला गृहलाभ होण्याची शक्यता

31 मार्च 2019 चं राशीफळ,  मेष राशीला गृहलाभ होण्याची शक्यता

मेष : प्रॉपर्टीतून लाभ


आपले प्रॉपर्टीशी संबंधित काही व्यवहार अपूर्ण असतील तर आज प्रयत्न वाढवून उरकून घ्या. कारण आज आपल्याला प्रॉपर्टीतून लाभ होण्याचे योग आहेत. आर्थिक नियोजन कोलमडल्याने ओढताण जाणवू शकते. दात आहेत तर चणे नाहीत आणि चने आहेत तर दान नाहीत अशी अवस्था होईल. म्हणून मन विचलित होऊन विफलता येऊ शकते.


क़ुंभ : अडथळे येतील


आज विशेषत: व्यापा-यांना कामामध्ये अडथळे येणार आहेत. त्यामुळे लक्ष विचलित होऊ शकतं. लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असू शकते. वरकरणी कनवाळू आणि आतून कठोर अशा व्यक्तींपासून सावध राहा. ते तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात.


मीन : प्रतिष्ठा मिळेल


व्यवसायिकांसह नोकरदार मंडळींसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारण आज आपल्या कामाचे कौतुक होऊन प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. वडील बंधुकडून आज आर्थिक लाभ होऊ शकतो. कुणाशीही बोलतांना अचुक संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्याने कुणी दुखवाला जाणार नाही, याची काळजी घ्या.


वृषभ : अर्थसहाय्य मिळेल


व्यवसायाच्या वृद्धीसाठी आपण अर्थसहाय्य मिळविण्याच्या प्रयत्न करीत असाल तर आज आपल्या प्रयत्नांना यश मिळू शकतं. कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुठल्या गोष्टीचा मनावर तणाव जाणवत असेल तर आज सिनेमा बघण्यासाठी वेळ काढा.


मिथुन : खर्चावर नियंत्रण


उत्पन्न व खर्च यांचा योग्य ताळमेळ बसवून खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आज आपणास देण्यात येत आहे. अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात शांतता प्रस्थापित झाल्याने घरात आनंदाचे वातरवण राहिल. कोणतीही कृती करण्यापूर्वी व्यवस्थित विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका.


कर्क : ग्रहमान उत्तम


आज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज आपले ग्रहमान अतिशय उत्तम आहे. हे प्रगतीचे योग आहेत. त्यामुळे प्रयत्नांमध्ये कसूर करु नका. आज तुम्ही आनंदाने वास्तुवर खर्च करणार आहात. नवीन वस्तुंची खरेदी करणार आहात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. काम करीत असतांना प्राथमिकता लक्षात घेऊन महत्त्वाची कामे आधी करा.


सिंह : अनुकूल दिवस


आजचा दिवस बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेची निगडीत व्यावसायिकांना आजचा दिवस अनुकूल असा आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडीत व्यक्तींनी आज मिळणा-या संधीचा पुरेपुर लाभ घ्यावा. आज तुमच्या मोठ्या भावाला हानी पोहचू शकते किंवा नुकसान होऊ शकतं. म्हणून काळजी घ्या. त्यांच्या संपर्कात राहा. आशावादी राहा


कन्या : चिकाटी ठेवा


प्रत्येकवेळी भाग्याची साथ मिळून कार्य सुखकर होईल ही अपेक्षा व्यर्थ आहे. त्यामुळे यश मिळण्यास विलंब होत असेल तर निराश होऊ नका. चिकाटी कायम ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. परिश्रम कधीही वाया जात नाही. शक्यतोवर बाहेर उन्हात फिरणे टाळा. उन्हास त्रास होऊ शकतो.


तूळ : विद्याथ्र्यांसाठी अनुकूल


आजचा दिवस शिक्षणासाठी म्हणजेच विद्याथ्र्यांसाठी अनुकूल असा आहे. विद्याथ्र्यांचे संपूर्ण लक्ष आज अभ्यासात लागलेले असेल. अतिआत्मविश्वास घातक असतो. उतळ पाण्याला खळखळाट फार म्हणून स्वत:ला थोडं आवर घाला. वास्तविवकतेत जगण्याचा प्रयत्न करा. आज स्वत:ला वेळ नक्की द्या. चंद जोपासण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक : नफ्याकडे लक्ष द्या


व्यावसायिकांनी आज आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. संधी चालून येणार आहे. तिचा योग्य तो लाभ घेण्याचा प्रयत्न करा. नाही तर दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था होईल. आज घरात प्रसन्नता वाटेल. आनंद व शांतीने आज घर भरलेलं असेल. कामाची गती आज आपण वाढविली पाहिजे. ते आज पूर्णही होऊ शकतं.


धनु : पथ्य पाळा


आपल्याला आहाराविषयी कुठले पथ्य सांगितलेले असतील तर ते आज अगदी तंतोतंत पाळण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. नाही त्रास होऊ शकतो. सोबतच आधी पोटोबा मग विठोबा हे ही लक्षात असून द्या. आज कुटुंबवत्सल लोकांना अर्थलाभ होऊ शकतो. घरातून बाहेर पडतांना आईचे आशीर्वाद घेऊन निघा.


मकर : बढती मिळेल


बढती मिळण्यासाठी आज जे लोक पात्र असतील त्यांच्या बढतीचा मार्ग आज मोकळा होईल किंवा बढतीही मिळू शकते. त्यामुळे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. साखरेचे खाणार त्याला देव देणार. त्यामुळे सर्वांशी गोडीगुलाबीने वागण्याचा प्रयत्न करा. वास्तुच्या रचनेत बदल करणे आवश्यक आहेत. खर्चावरही आज नियंत्रण ठेवावे लागेल.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद