5 मार्च 2019 चं राशीफळ, मीन राशीसाठी दिवस आनंदाचा

5 मार्च 2019 चं राशीफळ, मीन राशीसाठी दिवस आनंदाचा

मेष : कामाला उशीर


भाग्यने तुमची परिक्षा घ्यायचं ठरविलेलं आहे. त्यामुळे कामाला वेळ थोडा जास्त लागू शकतो. म्हणून विचलित होऊ नका. प्रयत्न करीत राहा. भाग्याची साथ नक्की मिळेल. आज तुमचा वडीलांशी संघर्ष होऊ शकतो. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा. वाद वाढवू नका. वास्तुतून लाभ मिळण्याची आज शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा.


कुंभ : व्यस्त राहाल


आज तुम्ही कार्यात दिवसभर व्यस्त राहणार आहात. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या. जोडीदाराचा प्रभाव आज तुमच्यावर असेल. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात. एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. ज्याचा नंतर तुम्हाला पश्चातापही होईल. म्हणून गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या.


मीन : आनंद वाढेल


भुतकाळात घडून गेलेल्या एखाद्या आनंददायी घटनेचा आनंद आज पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे काही काळ तुम्ही जुन्या आठवणींमध्ये रममान होणार आहात. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. जुनी दुखणी तोंड वर काढू शकतात. आज वास्तुवर आनंदाने खर्च करणार आहात. त्यामुळे परिवारात आनंदी आनंद असेल.


वृषभ : संताप येईल


एखाद्याविषयी गैरसमज होऊन तुम्हाला त्याच्यावर विनाकारण संताप येईल. त्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा गैरसमज होण्यापासून सावध राहा. आज तुम्ही जोडीदारासोबत प्रवास करणार आहात. त्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणीत होणार आहे. शत्रुंनाही नामोहरम करण्याची संधी आज तुम्हाला प्राप्त होणार आहे.


मिथुन : दिशा बदलला


प्रयत्न करुनही यश मिळत नसेल तर प्रयत्नांची दिशा बदलवीशी आज तुम्हाला वाटणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन दिशा बदला. फायदा होईल. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. मात्र सोबतीला खर्चही होणार आहे. एखाद्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडल्यामुळे ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होईल.


कर्क : विरोध होईल


आज तुम्हाला अनोळखी लोकांचा अचानकपणे झालेल्या विरोधाचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुम्ही विचलित होणार आहात. आत्मविश्वासही कमी राहिल. जोडीदाराबोसत मतभेद होऊन गैरसमज होऊ शकतात. घरोघरी मातीच्याच चुली असतात. म्हणून वाद वाढवू नका. सामंजस्याची भुमिका घ्या. शत्रु वरचढ होऊ शकतात.


सिंह : शत्रू वरचढ होतील


आज तुमचे शत्रू वरचढ होतील. त्यामुळे तुम्ही विचलित होऊन आपल्या ध्येयापासून भरकटण्याची शक्यता आहे. आत्मवि·ाासही खालावलेला राहिल. आज तुम्हाला स्त्री पक्षाकडून सहयोग प्राप्त होऊ शकतो. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यातुन तुम्हाला संधी प्राप्त होणार आहेत.


कन्या : कामात अडचणी


आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा अडचणी व समस्यांचा आहे. कारण आज तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अचडणी येणार आहेत. म्हणून सावध राहून प्रयत्न करीत राहा. वडीलांकडून आज तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घेण्याचा प्रयत्न करा. शैतानालाही त्याचा वाटा द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा.


तूळ : कलाकारांना यश


कलाकार मंडळींसाठी आजचा दिवस यशदायक असा आहे. यश प्राप्त झाल्यामुळे आज नावलौकिकही उंचावू शकतो. जोडीदाराशी वाद होऊन मनमुटाव होण्याची शक्यता आहे. घरोघरी मातीच्या चुली असतात. म्हणून वाद वाढवू नका. सामंजस्याची भुमिका घ्या. आज तुमचे शत्रु पराभूत होऊ शकतात.


वृश्चिक : परिश्रमानंतर यश


यश मिळविण्यासाठी परिश्रमाशिवाय दुसरा पर्यायच नाही, हे जरी खरं असलं तरी भाग्यही आपली कधी कधी परिक्षा घेत असते. त्यामुळे परिश्रम करीत राहा. यश नक्की मिळेल. तुमच्या घरात जर पैतृक संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटू शकतो. म्हणून तडजोडीची भूमिका घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करा. वाहन सावकाश चालवा.


धनु : एकांताची आवश्यकता


आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी चिंतन करण्यासाठी आज तुम्हाला आवश्यकता भासेल. मात्र एकांतांत जाऊन चिंता करीत बसू नका. चिंतन करण्यावर भर द्या. त्यातून तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. स्त्रियांना आज मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. प्रवासात नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे आज प्रवास शक्यतोवर टाळा


मकर : काळजी घ्या


आज तुमचे सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी स्वत:ची अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या. कल्पक व सर्जनशील कार्यात प्रगती आज होऊ शकते. म्हणून आपल्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे लक्षात ठेवा. नौकरी व व्यवसायात मिळणा-या संधीचा लाभ घ्या.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र