7 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

7 मार्च 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

मेष : बढती मिळेल


कर्मचारी मंडळींसाठी आज आनंदाचा दिवस आहे. कारण आपल्यापैकी ज्यांना बढती मिळण्याचा विश्वास ते त्यांचा आज बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आज आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. वडीलांकडून मार्गदर्शन आज मिळू शकतं. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घ्या.


कुंभ : आशीर्वाद मिळवा


गुरूंच्या आशीर्वादाची तुम्हाला खूप गरज आहे. त्यामुळे भरकटलेल्या अवस्थेतून बाहेर निघु शकता. म्हणून आज गुरुंचे आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करा. अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आराहावर नियंत्रण ठेवून पथ्य पाळा. तुमच्या परिवारात जर पैतृक संपत्तीचा वाद सुरु असेल तर तो आज मिटण्याची शक्यता आहे.


मीन : संधीचा लाभ घ्या


नोकरीसह आज व्यवसायातही संधी उपलब्ध होणार आहेत. त्यांचा योग्य तो लाभ घेऊन आपण यश संपादन करु शकता. आरोग्य चांगले राहिल. दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहणार आहात. त्यामुळे आत्मविश्वासही वाढीस लागण्याची शक्यता आहे. वडीलांशी संघर्ष होऊ शकतो. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा. वाद वाढवू नका.


वृषभ : कंटाळा कराल


आज तुमच्या अंगात आळस घुसलेला राहिल. त्यामुळे कामे करण्याचा आज तुम्ही कंटाळा करणार आहात. विशेषत: विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. जंक फूड शरीरासाठी घातक असतात. आज तुम्ही त्याच्यापासून लांब राहिलेलेच बरे! जोडीदाराचा प्रभाव आज तुमच्यावर राहणार आहे. जोडीदाराच्या मर्जीनुसार आज तुम्ही वागणार आहात.


मिथुन : आर्थिक ओढताण


खर्च करीत असतांना उत्पन्नाचा विचार केला नाही तर आर्थिक ओढतान होणारच आहे. त्यामुळे चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत अशी अवस्था होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आज विशेष काळजी घ्यायला हवी. त्रास वाढण्याची शक्यता आहे. जेष्ठ नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आज देण्यात येत आहे.


कर्क : चिकाटी कायम ठेवा


काम पूर्ण होत नसेल तर हतबल होऊ नका. कदाचित भाग्य तुमची परिक्षा घेत असेल. चिकाटी कायम ठेवून हातातले काम पूर्ण करण्यावर भर द्या. मुलं आज तुमच्या आवडीप्रमाणे वागणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून तसली अपेक्षाही तुम्ही करायला नको. मात्र एखाद्या गोष्टीत आज त्यांना यश मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा तुम्हाला अभिमान वाटेल.


सिंह : उत्तम दिवस


आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. विशेषत: स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्य थोडं नरम-गरमच राहिल. जोडीदाराशी आज वाद होऊन मनमुटाव होण्याची शक्यता आहे. घरोघरी मातीच्या चुली असतात. त्यामुळे विषयाला वाढवू नका. सामंजस्याची भुमिका घ्या.


कन्या : लालसा नको


लालच बुरी बला होती है. त्यातल्यात पैशांची लालसा अजिबात नको. झटपट पैसे कमविण्याच्या नादात आपण चुकीच्या मार्गावर तर जात नाही आहोत ना? याची काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. तनासह मनही सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करा. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास मदत होईल.


तूळ : सोशल मीडिया घातक


सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक आज सर्वांसाठीच घातक ठरतोय. विशेषत: विद्याथ्र्यांनी तर यापासून लांबच राहायला हवे. हे विद्याथ्र्यांसह त्यांच्या पालकांनाही शिकविणारा आजचा दिवस असेल. आहाराची पथ्य सांगितलेली असतील तर अगदी तंतोतंत पाळा. त्रास होण्याची शक्यता आहे. संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यांची अभिमान वाटेल.


वृश्चिक : व्यवसायात यश


व्यवसायात आज तुम्हाला घवघवीत असं यश मिळू शकतं. ज्याची तुम्ही कल्पना किंवा अपेक्षाही केलेली नसेल असं यश प्राप्त करण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. त्याचा फायदा करुन घ्या. जंक फूड आरोग्यासाठी घातकच. आज तर तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहायला हवे. मानसिक सुखशांतीच्या वातावरणाचा तुम्ही आज अनुभव करणार आहात.


धनु : आशीर्वाद मिळवा


गुरु किंवा जेष्ठांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळविण्याचा आज प्रयत्न करा. तुम्हाला त्याची गरज आहे. अन्नबाधेचा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आराहावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. सोबतच खर्चही वाढणार आहे. जो तुम्ही आनंदाने करणार आहात.


मकर : गोंधळ उडेल


आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आज तुमचा गोंधळाचा दिवस राहणार आहे. विशेषत: सरकारी कर्मचारी आज गोंधळलेल्या स्थितीत असतील. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा. रक्तदाबाचा त्रास असलेल्या आपल्या आरोग्याची आज विशेष काळजी घ्यायची आहे. जोडीदारासोबत तुम्ही प्रवासाचा आनंद घेणार आहे.लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र