9 मार्च 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना गृहलाभ

9 मार्च 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना गृहलाभ

मेष : खर्चाकडे लक्ष ठेवा


आपली आर्थिक नियोजन बिघडू नये म्हणून वाढणा-या खर्चाकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता कामा नये. संधीवाताचा त्रास असणा-यांची आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्रास वाढू शकतो. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना नामोहरम करु शकाल.


कुंभ : संघर्ष होईल


आज तुमचा वडीलांशी संघर्ष होऊ शकतो. म्हणून शांत राहून वाद वाढणार नाही याकडे लक्ष ठेवावे. योग्य तो सुसंवाद साधुन त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करा. मिळालेल्या मार्गदर्शनाचा आपल्या कामात उपयोग करुन घ्या. तेच तुमच्या हिताचे राहिल. वाहन सावकाश चालवा. वाहतुकीचे नियम पाळा.


मीन : विद्यार्थ्यांना यश


आज विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल. विशेषत: स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनासाठी आजचा दिवस यशदायक आहे. जंक फूड आरोग्याची घातकच असतात. किमान तरी ते नकोच. तुमचे शत्रु आज वरचढ होण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. नाही तर दोघांचे भांडण तिस-याचा लाभ अशी अवस्था होईल.


वृषभ : व्यवसायात गोंधळ


व्यावसायिकांनी आज थोडं सावाध राहायला हवं. कारण व्यवसायात गोंधळ उडून नुकसान होऊ शकतं. संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांचं कौतुक करुन प्रोत्साहन नक्की द्या. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यातून तुम्हाला संधी मिळू शकतात. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायला विसरु नका.


मिथुन : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ होऊ शकतो. तुमच्या घरात जर पैतृक संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. गरज पडल्यास तडजोडीचे धोरण स्विकारायलाही कमी करु नका. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनाला मनस्वी आनंद मिळेल. मानसिक सुखशांतीचा अनुभव कराल.


कर्क : विचार करुनच निर्णय


आज कोणताही निर्णय घेतांना तो व्यवस्थित विचार करुनच घ्या. विशेषत: सरकारी कर्मचा-यांनी आज थोडं सावध राहायला पाहिजे. निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. मात्र सोबतच खर्चही वाढणार आहे. जो तुम्ही आनंदात करणार आहात. लेखक व कवी मंडळींना आज यश मिळून लौकिकात भर पडू शकते.


सिंह : आर्थिक ओढताण


आज तुम्हाला आर्थिक ओढताणीचा सामना करावा लागणार आहे. दात आहेत तर चने नाहीत आणि चने आहेत तर दात नाहीत, याचा अनुभव येणार आहे. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यासाठी आज मदत मिळू शकेल. म्हणून संधीचा लाभ घ्या. सायंकाळपर्यंत एखादा आकस्मिक आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.


कन्या : लालसा नको


लालच बुरी बला होती है. झटपट पैसे मिळविण्याचा लालसा घात करु शकतो. आपण चुकीचे मार्गाने तर जात नाही आहोत ना? याची खात्री करुन घ्या. आज आत्मविश्वास वाढलेला असेल. स्त्री पक्षाकडून सहयोग प्राप्त होऊ शकतो. म्हणून आनंदाचे वातावरण असेल. अपूर्ण असलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आज प्रयत्न वाढवा.


तूळ : अभ्यासात लक्ष द्या


विद्याथ्र्यांना आज अभ्यासात संपूर्ण लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नसतं. म्हणून काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सहन करावेच लागेल. जोडीराशी कुठल्यातरी कारणाने वाद होऊन मनमुटाव होण्याची शक्यता आहे. म्हणून शांत राहा. एखाद्या संकटातून आज सुखरुपणे बाहेर पडाल. देव तारी त्याला कोण मारी.


वृश्चिक : आळस कराल


आजचा तुमचा दिवस आळसाने भरलेला असेल. त्यामुळे कामे टाळण्याचा प्रयत्न कराल. विशेषत: विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. आधी पोटोबा मग विठोबा अशी स्थिती राहिल. त्यामुळे आहाराविषयीचे पथ्य पाळण्याकडे लक्ष द्या. संकटातून बाहेर पडू शकाल. त्यामुळे ईश्वराची आपल्यावर कृपा असल्याची भावना मनात दाटून येईल.


धनु : जोड व्यवसायाचा विचार


आज तुमच्या मनात प्रगतीच्या दृष्टीकोनातून जोड व्यवसाय सुरु करण्याचा विचार येईल. मात्र तो करीत असतांना हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये, हे लक्षात ठेवा. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. चिंता करीत बसू नका. प्रयत्न करुनही यश मिळत नसेल कर्माची दिशा बदला. भाग्यही आपोआप बदलेल.


मकर : आशीर्वाद मिळवा


गुरुंचे आशीर्वाद व मार्गदर्शनाची तुम्हाला नितांत गरज आहे. त्यामुळे निश्चित एक दिशा सापडू शकेल. आज तुम्ही प्रवास करणार आहात. त्यात जोडीदाराची संगत लाभल्याने प्रवासाचा आनंद द्विगुणीत होणार आहे. आज तुम्ही दिवसभर आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र