आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. आपल्या बाळाला जन्म देण्याचा अनुभव काही औरच असतो. असं म्हणतात की बाळंतपण म्हणजे त्या स्त्रीचा दुसरा जन्मच असतो. गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून अगदी बाळाचा जन्म होईपर्यंत संपूर्ण कालावधी त्या स्त्रीसाठी एखाद्या उत्सवाप्रमाणेच असतो. तिचे डोहाळे पुरविण्यासाठी घरातील मंडळी तिला हव्या त्या सर्व गोष्टी खाऊ घालतात. नेहमीपेक्षा जास्त लाड झाल्यामुळे तीही मनातून हुरळून जाते. प्रेगन्सी आणि खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तिच्या वजनात मात्र प्रचंड वाढ होते. शिवाय बाळाच्या जन्मानंतरही ती बाळाच्या संगोपनामध्येच व्यस्त होते. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात आणण्याकडे अशा महिला फारसं लक्ष देत नाहीत. गरोदरपण आणि डिलीव्हरी या दरम्यान अशा अनेक गोष्टी असतात. ज्यामुळे स्त्रीचं शरीर बेढब आणि स्थुल दिसू लागतं. स्ट्रेच मार्क्ससारख्या बाळंतपणाच्या खुणा तिच्या शरीरावर दिसू लागतात. बाळंतपणानंतर वाढलेलं वजन लक्ष न दिल्यास अधिकच वाढू लागतं. म्हणून फार उशीर होण्याआधी वजन कमी करण्यासाठी वेळीच उपाय करा. मात्र जर तुमचं सी - सेक्शन झालं असेल तर डिलीव्हरीनंतर लगेच वजन कमी करण्याची घाई करू नका. वजन कमी करण्यासाठी आमच्या या टीप्स तुमच्या नक्कीच फायदेशीर ठरतील. काही हलके व्यायाम, प्राणायम करून तुम्ही पूर्वीप्रमाणे सुडौल दिसू लागाल.
प्रेगन्सीनंतर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय
प्रेगन्सीनंतर वजन कमी करण्यासाठी योगासने आणि व्यायाम
1.डिलीव्हरीनंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामुळे तुमचं वजन वाढू लागतं आणि पोटाचा घेरही मोठा होतो.
2. बाळ झाल्यावर स्तनपान करणाऱ्या महिलांच्या आहाराचे प्रमाण वाढते. ज्यामुळे त्याच्या शरीरातील चरबीचे प्रमाणही वाढू लागते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असतं.
3. डिलीव्हरीच्या दरम्यान झालेल्या कष्टामुळे शरीराची झीज भरून काढण्यासाठी महिलांच्या आहारात वाढ होते.
4. कधी कधी थायरॉईडच्या समस्येमुळेही वजन वाढू लागते.
इतर लोकांनी केलेला वेटलॉस आणि गरोदरपणानंतर महिलांनी केलेला वेटलॉस यात खूप फरक आहे. त्यामुळे या दोन्ही वेटलॉससाठी केले जाणारे उपायही निरनिराळे असतात. नॉर्मल डिलीव्हरीनंतर हळूहळू पोट नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतं. मात्र सिझेरिअन डिलीव्हरीनंतर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जर तुमचं सिझेरिअन झालं असेल तर वजन कमी करण्यासाठी कोणतेही औषधोपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
यासाठी आम्ही तुम्हाला पोट कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. शिवाय या घरगुती उपचारांचा तुमच्यावर कोणताही चुकीचा परिणाम होणार नाही.
Also Read Postpartum Recovery Tips For Moms In Marathi
गरोदरपणानंतर वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी पिणे नक्कीच लाभदायक ठरेल. यासाठी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा ओवा टाका. हे मिश्रण मंद गॅसवर उकळी येईपर्यंत गरम करा. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून घ्या आणि प्या. ओव्याच्या पाण्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. बाळंतपणानंतर काही दिवस ओव्याचे पाणी जरूर प्या.
प्रेगन्सीनंतर जर तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर कमी करायचा असेल तर दालचिनी आणि लवंग फारच उपयुक्त ठरतील. यासाठी दोन ते तीन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा पाण्यात टाकून ते पाणी गरम करा. गरम पाणी कोमट झाल्यावर ते हळूहळू प्या. या उपायामुळे तुम्हाला चांगला परिणाम जाणवले. पोट कमी करण्यासाठी बाळंतपणानंतर कमीतकमी दोन महिने हे पाणी प्या.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणे हा एक चांगला उपाय आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिऊ शकतात. मात्र बाळाला जन्म दिल्यावर वजन कमी करणाऱ्या महिलांसाठी ग्रीन टी पिणे हा अगदी रामबाण उपाय आहे. कारण ग्रीन टीमध्ये नैसर्गिक अॅंटी-ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने आई आणि बाळाला कोणताही त्रास होत नाही.
मेथीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मेथीच्या बियांमुळे पोटातील चरबी कमी करण्यास मदत होते. शिवाय मेथी महिलांच्या हॉर्मोन्सचे संतुलन राखण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे बाळंतपणानंतर महिलांना मेथीच्या बिया वापरून अनेक खाद्यपदार्थ करून दिले जातात. पोट कमी करण्यासाठी रात्री एक ग्लास पाणी आणि एक चमचा मेथी एका भांड्यात घेऊन गरम करा. हे पाणी कोमट झाल्यावर प्या. नियमित हे पाणी घेतल्याने तुमचे पोट कमी होईल.
बदाम आणि मनुका पोटाची चरबी कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरतात. कारण बदामामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन ई चे गुणधर्म असतात. शिवाय यामध्ये मॅग्नेशिअम, झिंक आणि कॅल्शिअम सुद्धा असते. जर तुमची नैसर्गिक प्रसूती झाली असेल तर दहा बदाम आणि दहा मनुका एका मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि एक दूधात हे मिश्रण मिक्स करून प्या. डिलीव्हरीनंतर नियमित दूधातून हे मिश्रण घेतल्यास तुमच्या पोटाची चर्बी मुळीच वाढणार नाही शिवाय तुम्हाला ताकदही मिळेल.
गरोदरपणानंतर पोट कमी करण्यासाठी मध, काळीमिरी आणि आलं फार उपयोगी ठरू शकतं. यासाठी एक कोमट ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध, अर्धा चमचा काळीमिरी पावडर आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिसळा. हे पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्या. या उपायामुळे तुमच्या पोटाचा आकार तर कमी होईलच शिवाय संपूर्ण शरीर सुडौल दिसू लागेल.
रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये पाव चमचा जायफळ मिसळून प्या. ज्यामुळे तुमचे पोट हळूहळू कमी होऊ लागेल.
तुमची प्रसूती नैसर्गिक असो वा सिझेरिअन तुम्हाला पोट कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काही योगासने आणि व्यायाम करणेदेखील उपयुक्त ठरू शकेल. सिझेरिअन डिलीव्हरी असेल तर व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. नैसर्गिक प्रसूती झाली असेल तर आम्ही सूचवलेले खालील व्यायाम जरूर करा. हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला बाहेर अथवा जीममध्ये जाण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच हे व्यायाम करू शकता.
लक्षात ठेवा प्रसूतीनंतर कोणताही व्यायाम करताना तो सावधपणे करणे गरजेचे आहे. कारण अशा अवस्थेमध्ये तुम्ही जड व्यायाम नक्कीच नाही करू शकता. त्यामुळे पहिले दोन महिने सकाळी घराच्या जवळपास अथवा बागेत फिरायला जाण्यास काहीच हरकत नाही. मॉर्निंग वॉकमुळे तुम्हाला फ्रेश वाटू लागेल. रात्रभर बाळामुळे झालेल्या जागरणाचा थकवा दूर करण्यासाठी मॉर्निंग वॉक एक चांगला व्यायाम ठरेल. संध्याकाळीदेखील तुम्ही वॉकला जाऊ शकता. यामुळे तुमचे वजन नक्कीच वाढू शकणार नाही. तीन महिन्यानंतर डॉक्टरांच्या सल्लानुसार तुम्ही काही हल्के व्यायामप्रकार करू शकता.
प्राणायम हा असा एक व्यायाम प्रकार आहे ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न दिसू लागते. शिवाय नियमित प्राणायम केल्यामुळे तुमच्या पोटाचा घेरही नियंत्रित राहू शकतो. नियमित प्राणायम करणाऱ्या लोकांचे शरीर सुडौल आणि चेहऱ्यावर तेज कायम असते.
प्रेगन्सीनंतर वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे. यासाठी वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे दररोज वीस ते तीस मिनीटे व्यायाम करा. ज्यामुळे तुमच्या पोटाचा घेर कमी होईल.
बॉल रोल आऊट एक्सरसाईजमुळे तुमच्या पोटाचा घेर नक्कीच कमी होऊ शकतो. शिवाय या व्यायामामुळे तुम्हाला थकायलाही होणार नाही.
जर तुम्हाला बाळंतपणानंतर पोट कमी करायचं असेल तर त्यासाठी एरोबिक्स व्यायाम करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकेल. या व्यायामामुळे तुमचे पोट कर कमी होईलच शिवाय तुमची फिगरही मेंटेन राहील.
तुमचे किती वजन कमी होऊ शकते हे तुमचे पूर्वीचे वजन आणि तुमची जीवनशैली यावर अवलंबून आहे. बऱ्याचदा बाळंतपणानंतर महिलांचे चार ते पाच किलो वजन कमी होणे स्वाभाविक आहे.
प्रसूतीनंतर एका आठवड्यामध्ये महिला नॉर्मल जीवन जगू शकतात. मात्र पूर्णपणे बरे होण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
बेलीफॅट कमी करण्यासाठी सोप्या टीप्स- Tips To Reduce Belly Fat
प्रेग्नन्सीनंतर नेहा धुपिया बॅक टू वर्क
Signs & Symptoms Of Pregnancy In Marathi
गर्भसंस्कार करण्यासाठी काही टीप्स
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटर स्टॉक