नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या 'या' 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या 'या' 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स


जर तुम्ही एका नवजात बाळाची आई असाल किंवा लवकरच आई होणार असाल तर आई होण्याआधी तुम्हाला ब्रेस्टफिडींगबाबत या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असलीच पाहिजे. आपल्या नवजात बाळासंबंधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तनपान किंवा ब्रेस्टफीड. त्यामुळे प्रत्येक नवजात बाळाच्या आईला ब्रेस्टफिडींग पोझिशन्सची माहिती असायलाच हवी. कारण बाळं झाल्याझाल्या त्याला आईचं दूध देणं आवश्यक असतं. या काळातलं ब्रेस्ट मिल्क बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी सर्वात जास्त शक्तीदायक आणि शक्तिवर्धक असतं. ब्रेस्टफिडींग म्हणजेच स्तनपान हे अनेक पोझिशन्समध्ये देता येतं. हे आईला जाणून घ्यावं लागेल की, तिच्यासाठी आणि बाळासाठी कोणती पोझिशन चांगली आहे. चला जाणून घेऊया वेगवेगळ्या कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्सबाबत -1. क्रॅडल होल्ड


breastfeedholdcradle


या पोझिशनमध्ये पायाच्या खाली उशी लावून एखाद्या खुर्चीवर किंवा बेडवर बसण्याची गरज असते, ज्यामुळे तुम्हाला बाळाकडे वाकावं लागत नाही. आपला हात दूमडून बाळाचे डोके धरा आणि त्याला कुशीत घ्या, ज्यामुळे बाळाच्या शरीराची पुढची बाजू तुमच्याकडे येईल. जर तुम्ही उजव्या स्तनाने दूध पाजणारं असाल तर बाळाचे डोके आपल्या हातावर ठेवा. आपला हात दूमडून बाळाच्या मागे धरून त्याच्या मणक्याला आणि मानेला सपोर्ट द्या. आता बाळाला आपल्याकडे नीट धरा. 1 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी ही आदर्श पोझिशन आहे.2. क्रॉस- क्रॅडल होल्ड


breastfeedholdcrosscradle


ज्या बाळाला आपल्या तोंडात आईचं निप्पल घेता येत नाही, त्याच्यासाठी ही चांगली पोझिशन आहे. ही क्रॅडल होल्डपेक्षा वेगळी आहे. या पोझिशनमध्ये दुमडलेल्या हाताच्या तुलनेत तुमचा हात बाळाच्या डोक्याला सपोर्ट देतो. जर तुम्ही उजव्या स्तनाचा वापर करून बाळाला पाजणार असाल तर बाळाला पकडण्यासाठी आपल्या डाव्या खांद्याचा आणि हाताचा वापर करा. बाळाच्या शरीराचा आणि छातीचा भाग आपल्याजवळ घ्या. आता आपल्या अंगठ्याने किंवा अंगठ्याच्या टोकाचा वापर करून बाळाचे तोंड उजव्या निप्पलजवळ न्या.3. साईड लाईंग पोझिशन


Side-Lying-Position


साईड लाईंग पोझिशन म्हणजे एका कुशीवर झोपून दूध पाजणं. जर तुम्हाला उजव्या स्तनाचा वापर करून दूध पाजायचं असल्यास उजव्या कुशीवर झोपा. बाळाला आपल्या बाजूला झोपवा. आपल्या डाव्या खांद्याने बाळाच्या शरीराला सपोर्ट द्या आणि डाव्या हाताने बाळाच्या डोक्याला सपोर्ट द्या. आता बाळाचे तोंड आपल्या निप्पलजवळ न्या. अनेक माता जेव्हा बाळ मध्यरात्री उठतं तेव्हा अशाच प्रकारे बाळाला फिडींंग करतात.  4. फुटबॉल होल्ड


Football position


आपल्या बाळाला आपल्या काखेत असं काही धरा की, जसं एखादा फुटबॉल पकडला असावा. आपल्या बाळाची पोझिशन अशी ठेवा की, ज्यामुळे बाळाचं नाक तुमच्या निप्पलच्या लेव्हलमध्ये असेल आणि बाळाचे पाय मागच्या बाजूला जातील. तुमच्या पाठीमागे तुम्ही एखादी उशी ठेवू शकता आणि त्यावर तुमचा हाथ टेकवा. तुमच्या हाताने बाळाच्या मणक्याला, मानेला, डोक्याला आणि खालच्या भागाला सपोर्ट देता येईल. यामुळे पोझिशनमुळे महिलांच्या पोटावर येणार ताण कमी होतो.  फोटो: Pexels(फिलिप्स इंडिया च्या लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ. मीमांसा मल्होत्रा यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित)


हेही वाचा -


प्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत 'हे' ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स


गर्भसंस्कारांचे फायदे