नीता अंबानी यांनी सूनमुख पाहून श्लोकाला दिलं 'हे' महागडं गिफ्ट

नीता अंबानी यांनी सूनमुख पाहून श्लोकाला दिलं 'हे' महागडं गिफ्ट

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्चला विवाहबंधनात अडकले. आकाश अंबानी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सपूत्र आहे तर श्लोका मेहता प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची कन्या आहे. सहाजिकच हा विवाह या वर्षीचा एक राजेशाही थाटातील लग्नसोहळा होता. बॉलीवूड, राजकारण, देश-विदेशामधील सेलिब्रेटी पाहुणे उपस्थित होते. प्रि-वेडिंगपासून लग्नाच्या रिसेप्शन पर्यंत सर्वच लग्नविधींची सर्वत्र चर्चा होती. शाही थाटामाटात झालेल्या या लग्न सोहळ्यानंतरही अंबानी परिवारामध्ये सेलिब्रेशन अजून सुरूच आहे. नुकतच नीता अंबानी यांनी त्यांची सून श्लोका मेहता-अंबानी हिला एक महागडं गिफ्ट दिलं आहे. लग्नानंतर सूनमुख विधीमध्ये सासू सूनेला पाहून प्रेमाने काहीतरी भेटवस्तू देते. या विधीला हिंदी भाषिक 'मुंह दिखाई' तर मराठीत 'सूनमुख' विधी असं म्हणतात.


akash 1


श्लोकाला सासूकडून मिळाला महागडा 'हिऱ्याचा हार'


नीता अंबानी यांनी त्यांची लाडकी सून श्लोकाला एक महागडा हिऱ्यांचा नेकलेस भेट दिला आहे. या नेकलेसची किंमत अंदाजे 'तीनशे कोटींच्या' घरात आहे. नीता अंबानी यांना त्यांच्या सूनेला एक अनमोल भेटवस्तू देण्याची इच्छा होती. त्यामुळे नीता अंबानी यांनी हे गिफ्ट निवडण्यासाठी फार वेळ घेतला आणि सूनेसाठी ही अमुल्य भेटवस्तू निवडली अशी चर्चा आहे. वास्तविक आधी नीता अंबानी श्लोकाला त्यांच्या अंबानी घराण्याचा परंपरागत सोन्याचा हार भेट देणार होत्या. अंबानी घरातील मोठ्या सूनेला हा सोन्याचा हार परंपरेनुसार देण्यात येतो. मात्र नीता अंबानी यांनी श्लोकाला हा अंबानी घराण्यातील जुना नेकलेस न देता हिऱ्यांचा नवीन नेकलेस देण्याचा निर्णय घेतला. हा हिऱ्यांचा नेकलेस जगातील सर्वात महागड्या नेकलेसपैकी एक आहे. या नेकलेसची डिझाईन आणि अनमोल हिरे यामुळे या नेकलेसची किंमत जवळजवळ तीनशे कोटींच्या घरात गेली आहे.एवढंच नाही तर ईशा अंबानी म्हणजेच श्लोकाच्या नंणदेनेही आकाश आणि श्लोकाला मंह दिखाई विधासाठी एक आलिशान बंगला भेट दिला आहे. मात्र अजूनही याबाबत कोणताही अधिकृत खुलासा अंबानी कुटुंबाकडून करण्यात आलेला नाही. 


akash wedding


नीता अंबानींचा थाटच न्यारा...


आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नाचा थाट काही औरच होता. यांच्या लग्नामध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र या सोहळ्यात सर्वात सुंदर आणि उठावदार दिसत होत्या त्या नीता अंबानी. गुलाबी रंगाच्या हेव्ही लुकवाला ट्रेडिशनल लेहंग्यामध्ये नीता अंबानीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं. तसंच त्यांनी या लेहंग्यावर हिरव्या रंगाचा कुंदन सेट घालून त्याची शोभा अधिक वाढवली होती. पण या लेहंग्यापेक्षाही लक्ष वेधून घेत होता तो त्यांचा ब्लाऊज. या ब्लाऊजवर रेशमी धाग्यांनी आकाश आणि श्लोकाचं नाव गुंफलं होतं. त्याशिवाय त्यावर मोठ्या अक्षरात ‘शुभारंभ’ असंही लिहिलं होतं. हा लेहंगा मल्टीकलरच्या रेशमी धाग्यांनी बनवून घेतलेला आहे.  नीता यांनी ब्लाऊज इतका सुंदर तयार करून घेतला होता की, सर्वांचं लक्ष या ब्लाऊजकडे होतं आणि नीता यांनी सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या होत्या असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. थोडक्यात मुलांच्या लग्नात नीता अंबानी यांचा थाट निराळा होता. नीता अंबानी प्रत्येक कार्यक्रमात हटके दिसण्याचा प्रयत्न करतात. आता तर आपल्याप्रमाणे आपल्या मोठ्या सूनेचाही थाट असावा यासाठीच त्यांनी श्लोकालाही हा महागडा हिऱ्यांचा हार दिला असावा.


nita ambani


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम