प्रत्येक स्त्री साठी आई होणं हे एक स्वप्न असतं. आई होण्यासारखं दुसरं सुख नाही असं प्रत्येकीला वाटत असतं. पण आजकाल आई होणं वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही. मुळातच हल्ली लग्न उशीरा होतात आणि त्यानंतर बाळासाठी प्रयत्नही उशीराच केले जातात. त्यामुळे हल्ली फारच कमी वेळा नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचं ऐकायला येतं. सिझर झाल्यानंतर तर गरोदरपणामध्ये अधिक काळजी घ्यावी लागते. गरोदरपणामध्ये नक्की का काळजी घ्यावी लागते? याचीही कारणं आहेत. वास्तविक गरोदरपणानंतर सर्वात जास्त बाळाबरोबर स्वतःचीही काळजी घ्यावी लागते. ही काळजी नक्की कशी आणि काय घ्यावी याबद्दल आम्ही तुम्हाला आमच्या लेखातून सांगणार आहोत. गरोदरपणा म्हटलं की, खरं तर सगळ्या मिक्स भावना असतात. आनंद, काळजी, चिंता या सगळ्या गोष्टी मनात एकदमच घर करतात. त्यात लहान बाळ पहिल्यांदाच आल्यानंतरच्या भावना आणि आता याला कसं सांभाळायचं आणि त्याबरोबरच स्वतःला कसं सांभाळायचं याचीही एक रेस सुरु होते. पण तुम्हाला आम्ही यामध्ये नक्कीच मदत करू शकतो. यासाठीच गर्भधारणा झाल्यावरच बाळावर गर्भसंस्कार करण्यास सुरूवात करा.
बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. त्यामुळे तिला बाळाप्रमाणेच स्वतःची काळजीदेखील जास्त घेण्याची गरज असते. आईच्या शरीरामध्ये सतत पुढील सहा महिने बदल होत असतात. त्यामुळेच पूर्वी सव्वा महिना घरामध्ये बंधन पाळलं जायचं. त्यामुळे महिलांना तब्बेत सुधारायला वेळ मिळत असे. गरोदरपणानंतर काळजी घेणं यासाठी गरजेचं असतं कारण या काळामध्ये प्रसूतीमुळे अनेक गुंतागुंती होत असतात. त्यामध्ये प्रसूतीनंतरचा रक्तस्राव, हृदयाघात यासारख्या गोष्टी येतात. यामुळे महिलांच्या शरीरातील ताकद निघून गेलेली असते. त्याचप्रमाणे या काळात रक्तक्षय, उच्च रक्तदाब, हृदरोग असे आजारही बळावतात. त्यामुळे सर्वात जास्त स्वतःची काळजी घ्यायला हवी.
गरोदरपणानंतरच्या काळात आपल्यासह अनेक गोष्टी घडत असतात. पण आपल्याला त्या माहीत नसल्याने त्याचा अधिक त्रास होतो. अशा नक्की कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया.
गरोदरपणानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असती होणारा रक्तस्राव. एकाच वेळी दोन पॅडदेखील लावावे लागतात. शिवाय दिवसातून तीन ते चार वेळा बदलावे लागतील इतका रक्तस्राव होत असतो. गरोदरपणानंतर हा त्रास सर्वात जास्त होत असतो. शिवाय या वेळी रक्ताच्या गुठळ्या बाहेर पडतात वा रक्त अति प्रमाणात जात असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. हा स्राव खरं तर दुसऱ्या आठवड्यापर्यंत थांबतो.
टाक्यांमुळे लघवीला जायचा बऱ्याच महिलांना त्रास होतो. पण असं असलं तरीही लघवीला जाणं गरजेचं आहे. कारण तसं न केल्यास तुमचं मूत्राशय भरू शकतं. शिवाय गरोदरपणानंतर तुमच्या शरीरामध्ये पाणी आणि क्षार जास्त प्रमाणात असतं. हे शरीरातून निघून जाण्यासाठी तुम्हाला निदान दिवसातून तीन ते चार वेळा लघवीला जाणं आवश्यक आहे.
वाचा - गरोदरपणाचा पहिला महिना
गरोदरपणाानंतर प्रत्येक महिलेच्या शरीरामध्ये स्तन हा महत्त्वाचा भाग असतो. पहिल्या दिवशी पिवळट स्राव येतो. ज्याला कोलोस्ट्रम म्हटलं जातं. जे बाळासाठी आवश्यक असतं. तिसऱ्या दिवशीपर्यंत दुधाचं प्रमाण व्यवस्थित सुरू होतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला दूध मिळण्यासाठी स्तनांना आटू न देणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्तनांकडे योग्य लक्ष दिलं नाहीत तर तुमचे स्तन आटून बाळासाठी दूध येणं बंद होईल.
गरोदरपणानंतर महिलांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण वाढत आहे. इतकंच नाही तर संधीवात, आमवात, हातापायांना मुंग्या येणं, डोकं सतत दुखणं या तक्रारीही वाढत चालल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे गरोदरपणानंतर काही महिन्यातच वर्किंग वूमन कामाला लागतात. योग्य ती काळजी घेत नाहीत. गरोदरपणानंतर घ्यावा लागणारा शेक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. काही ठिकाणी याला शेक शेगडी असंही म्हटलं जातं. गरोदरपणाच्या काळामध्ये आपल्या शरीरातील वात हा बिघडलेला असतो आणि त्यासाठीच गरोदरपणानंतर शेक घेणं गरजेचं असतं. वाताच्या शीत आणि रूक्ष गुणाला मारण्यासाठी तेलाचं मालिश करून हा शेक घ्यायला हवा. शिवाय तुम्ही यावेळी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब वा निर्गुडीचा पालादेखील घालू शकता. तुमची प्रकृती चांगली होण्यासाठी या नैसर्गिक गोष्टी तुम्हाला मदत करतात. निदान सव्वा महिना अंगाला तेल मालिश करूनच मग आंघोळ करावी. केवळ बाळालाच नाही तर तुमच्या शरीरालादेखील याची गरज असते. तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असल्यास, कोमट पाण्याने योनीमार्ग स्वच्छ करावा. पण जर सिझर असेल तर असं करू नये. थंड पाण्यामुळे वात वाढतो. म्हणून निदान दोन महिने तरी बाळंतीणीने गार पाण्यात जाऊ नये. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळेच कपडे धुणं यासारख्या गोष्टीदेखील करू नयेत. नॉर्मल डिलिव्हरी असल्यास, सुती कपड्याने पोट बांधावं आणि सीझर असल्यास, पोट बांधून ठेऊ नये. टाके सुकल्यानंतर टाक्यांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने नंतर पोट बांधावं. पोट बांधल्यामुळे गर्भाशय सुस्थितीत येण्यास मदत होते. शिवाय बाळाला देण्यात येणारी धुरी बाळंतीणीनेदेखील घ्यावी. याशिवाय गरोदरपणानंतर स्त्रियांनी रोज दूधातून 2 चमचे सकाळ आणि संध्याकाळी शतावरी घेतल्यास, बाळाला दूध कमी पडणार नाही.
वाचा - आई व्हायचंय...तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून
बऱ्याचदा महिलांना आपल्या शरीराच्या आकाराची जास्त काळजी असते. सध्याच्या जगामध्ये प्रत्येक स्त्री ला सुडौल दिसायचं असतं. पण मुळात बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच सुडौल दिसण्याच्या मागे धाऊ नका. ते योग्य नाही. तुमची नॉर्मल डिलिव्हरी नसेल आणि जर सिझर असेल तर तुमचे टाके हे साधारणतः सहा महिने ओले असतात. त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त काळजी या काळात घ्यावी लागते. तुम्हाला त्याची जाण नसते. पण व्यायाम करण्याच्या मागे लगेच लागू नका. त्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसानच होणार आहे. शरीराला गरोदरपणातील बदल भरून काढण्यासाठी किमान सहा महिने लागतात. शिवाय प्रत्येक स्त्री ची क्षमता ही वेगवेगळी असते हे समजायला हवं. यावेळी स्वतःला जास्त ताण देऊ नये. दुसऱ्यांकडून मदत घ्यावी. गुंतागुंतीची प्रसूती वा सिझर असल्यास आपल्याला रिकव्हर होण्यासाठी जास्त वेळ लागतो. व्यायाम करण्यासाठी शरीराला थोडा आराम द्या. साधारण सहा महिने झाल्यानंतर हलका व्यायाम करायला सुरुवात करा. हे तुमच्या आणि बाळाच्या दोघांच्याही आरोग्यासाठी चांगलं आहे.
गरोदरपणानंतर गर्भाशय हे हळूहळू पूर्ववत होत असतं. पहिल्या सहा आठवड्यांमध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांची निदान दोन ते तीन वेळा भेटायला हवं. कारण या काळामध्ये तुम्हाला ताप येणं, पोट साफ न होणं, जास्त रक्तस्राव होणं, पोटात दुखणं या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं. उपचारांनी या व्याधी बऱ्या होतात. पण त्यासाठी तुम्ही योग्य काळजी घ्यायला हवी. बाळाला लागणाऱ्या दुधासाठी तुम्हाला आवश्यक घटक हे आहारातूनच मिळत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गरोदरपणानंतर काय खायचं आणि काय तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं. त्यामुळे गरोदरपणानंतर स्त्री च्या नेहमीच्या गरजा भागवण्यासाठी कसा आहार असायला हवा हे जाणून घेऊया.
आपल्या विचाराने आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. याचा अनुभव तुम्हाला या काळात जास्त दिसून येतो. आपण एकटे नसतो तर आपल्यावर आपल्या बाळाचीही जबाबदारी असते. त्यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही कायम सकारात्मक विचार करत राहण्याची गरज असते. कारण त्याचा सर्वात पहिला परिणाम होतो तो तुमच्या येणाऱ्या दुधावर. त्यामुळे तुम्ही सतत नेहमी सकारात्मक आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. गरोदरपणानंतर एक मानसिक औदासिन्य येत असतं. गरोदरपणाच्या काळात काही कारणाने मानसिक ताण निर्माण झाला असेल तर नंतर मानसिक औदासिन्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवल्यास, हे ताणतणाव आपोआप दूर ठेवण्यास मदत होते. यासाठी गरोदरपणानंतर तुम्हाला समुपदेशन आणि तणावविरोधी औषधांचा आधारही घेता येतो. पण त्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वास्तविक या काळात जास्तीत जास्त सकारात्मक राहून आनंदी राहण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.
वाचा - प्रेगन्सीनंतर पुन्हा सुडौल दिसण्यासाठी करा 'हे' उपाय
नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर डिलिव्हरी यामध्ये खूपच फरक असतो. नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिला या लवकर त्यातून बाहेर येतात. पण सीझर झालेल्या महिलांना निदान सहा महिने तरी प्रचंड काळजी घ्यावी लागते. अर्थात याचा अर्थ असा नाही की, नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिला या लगेच काम करू शकतात. पण सीझर झालेल्या महिलांच्या तुलनेत त्यांची प्रकृती लवकर स्थिरस्थावर होत असते. त्यामुळे सीझर झाल्यानंतर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. ती नक्की काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊया -
सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसूतीनंतर लगेच लैंगिक संबंध ठेऊ नका. आपले टाके ताजे आणि तितकेच वेदनादायी असतात. शिवाय योनीला आजाराचं संक्रमण होण्याचीही शक्यता असते. शेवटच्या काही महिन्यांमध्ये सेक्स न केल्यामुळे दोघांनाही एकमेकांची ओढ असणार हे खरं आहे. पण शक्यतो मनावर नियंत्रण ठेवलेलं चांगलं. एकमेकांची काळजी या काळात घेणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी किस घेणं, मिठी मारणं किंवा एकमेकांच्या शरीराला ऊब देणं हेदेखील चांगलं आहे. अर्थात या गोष्टी तुम्ही गरोदर असतानाही करू शकता. पण संपूर्ण सेक्स हे साधारण तीन महिन्यांनी केलेलं चांगलं. गरोदरपणानंतर सेक्स करणे वाईट असं कधीही म्हणता येणार नाही. पण कोणत्याही प्रकाराचा आजार नको असेल तर, सेक्स तीन महिन्याने करणं योग्य आहे.
फोटो सौजन्य - Instagram
You might like this:
Major Symptoms Of Pregnancy In Marathi
गर्भसंस्कार नेमके कधी करणं गरजेचं आहे
गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय...तर करा नैसर्गिकरित्या उपचार
गणेशाची 25 संस्कृत नावे (Ganesha Sanskrit Names)