प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. प्रियंका सतत सोशल मीडियावर तिचे आणि निकचे फोटो शेअर करत असते. प्रियंकाने नुकतीच एक पोस्ट तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्या दोघांच्या हातात एक कुत्र्याचं छोटंसं पिलू दिसत आहे. या पिलाचं नाव ‘एक्ट्रा चोप्रा जोनस’ आहे असं प्रियंकाने शेअर केलं आहे. याआधीही तिच्याकडे ‘डियाना’ नावाची एक कुत्री आहे. शिवाय या फोटोतील नव्या गाडीचं सेलिब्रेशन करतानाही ती दोघं दिसत आहेत.
View this post on Instagram
प्रियांकाला सासरी मिळतेय अशा वागणूक
निक जोनसला तीन भाऊ आहेत. त्यांची फॅमिली मोठी असून सर्वजण अगदी आनंदाने राहतात. जोनस भावंडांमध्ये चांगलं बॉडिंग दिसून येतं. मात्र लग्नानंतर काही दिवस जोनस कुटुंबातील एका सदस्याला प्रियांका आवडत नसल्याचं खुद्द जोनस कुटुंबाने उघड केलं होतं. इंग्रजी टेलीव्हिजन माध्यमातील एका चॅट शोमध्ये जोनस ब्रदर्सची मुलाखत घेण्यात आली. या चॅट शोमध्ये हा खुलासा करण्यात आला. निक जोनसचा भाऊ केविन जोनस यांने हा खुलासा केला आहे. केविन जोनसच्या छोट्या मुलीला म्हणजेच वॅलेंटिनाला (Valentina) सुरूवातीला प्रियांकासोबत कंम्फर्टेबल होण्यास थोडा वेळ लागल्याचं त्याने शेअर केलं आहे. केविनने शेअर केलं की, आता माझ्या मुलींना त्यांची काकी प्रियंका खूप आवडते. मात्र सुरूवातीला वॅलेंटिना प्रियांकाला निकला हातही लावू देत नसे. कारण वॅलेंटिनाला तिचा काका निक खूप आवडतो. त्यामुळे ती त्याच्याबाबतीत फारच प्रोटेक्टिव्ह आहे. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांमध्ये ती प्रियांकाचं निकसोबतचं वागणं सहन करू शकत नव्हती. जेव्हा जेव्हा प्रियंका निकच्या खांद्यावर हात ठेवत असे तेव्हा वॅलेंटिनाला खूप राग यायचा. प्रियांकासोबत असताना जर वॅलंटिना निकजवळ असेल तर ती चक्क प्रियांकाचा हात झटकून द्यायची. मात्र हळूहळू वॅलेंटिनाच्या लक्षात आलं की प्रियांकादेखील आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहे. त्यामुळे आता वॅलेंटिना प्रियांकाच्या खूप जवळची आणि लाडकी झाली आहे. प्रियंका सध्या तिच्या जीवनात चांगलीच रमली आहे.
प्रियांका चोप्राचे आगामी चित्रपट
काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक यांचं ‘सकर’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या गाण्यात त्या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री दिसली होती. हे गाणं जोनस ब्रदर्सनी गायलं होतं. शिवाय प्रियांकाचा एक हॉलीवूड चित्रपटदेखील नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं नाव ‘इस इंट इट रोमॅंटिक’ असं आहे. लवकरच ती ‘दी स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर असेल. दी स्काय इज पिंक चित्रपट सोनाली बोस दिग्दर्शित आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि प्रियांका पुन्हा एकत्र काम करणार अशी चर्चा होती. मात्र भारत चित्रपटात काम करण्यास प्रियांकाने ऐनवेळी नकार दिल्यामुळे यापुढे सलमान खान तिच्यासोबत पुन्हा काम करणार नसल्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
प्रियांकाचा पायगुण, नीक जोनासला मिळाली खुशखबर
पंच प्रवीण तरडे करणार 'सूर सपाटा'चा निवाडा
पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि संजय दत्त एकत्र
फोटोसोजन्य - इन्स्टाग्राम