ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या

प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या

वयाच्या 17 व्या वर्षी मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी प्रियांका चोप्राला आज जगामध्ये कोणी ओळखत नाही असं नाही. प्रियांकाने भारताचं नाव परदेशातही गाजवलं तेही अगदी वयाच्या सतराव्या वर्षापासून. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये जन्माला आलेली प्रियांका आज सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. अभिनय असो वा फॅशन सेन्स प्रियांका नेहमीच चर्चेत राहाते. मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकल्यानंतर 2003 मध्ये ‘द हिरो – स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून प्रियांकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आजपर्यंत प्रियांकाने फक्त आणि फक्त जगावर राज्य केलं आहे. मागच्या वर्षी प्रियांकाने आपला बॉयफ्रेंड आणि अमेरिकन गायक निक जोनसबरोबर लग्न केलं. प्रियांका सध्या आपलं आयुष्य अगदी आनंदात जगत आहे. पण प्रियांकाच्या फिटनेस आणि सौंदर्याचं नक्की काय गुपित आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यामुळे प्रियांका नक्की कशा प्रकारे स्वतःला फिट ठेवते हे तुम्हालाही कळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःलाही फिट ठेऊ शकण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकाल.

प्रियांका चोप्राचा गॉर्जस लुक, सेक्सी आऊटलुक आणि स्टनिंग फिगर हे सर्व तिच्या कठीण वर्कआऊट फिटनेस रिजिम आणि डाएट प्लॅनमुळेच आहे. प्रियांका चोप्रा आपलं करिअर सुरु झाल्यापासूनच आपल्या फिगरबाबतीत सतर्क राहिली आहे. तिने कधीही आपली फिगर झिरो झाली पाहिजे असा विचार केला नाही तर तिला अगदीच हाडाचा सापळा बनून राहायचं नव्हतं. प्रियांकाचं मेटाबॉलिजमदेखील कमालीचं आहे. चित्रपटाला आवश्यक असल्याप्रमाणे ती तिची जाडी कमी जास्त करू शकते. अर्थात त्यावर ती तितकी मेहनतही घेते. योग्य वर्कआऊट रूटीन पाळल्यामुळेच प्रियांकाने आपलं शरीर इतकं टोन्ड आणि अगदी काटक ठेवलं आहे. तुम्हालादेखील प्रियांकासारखी परफेक्ट फिगर आणि सौंदर्य हवं असल्यास, प्रियांकाचं सकाळपासून ते रात्रीपर्यंत नक्की काय शेड्युल आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रियांका चोप्राचं डाएट रूटीन – Priyanka Chopra Diet Routine in Marathi

प्रियांका चोप्राचा डाएट प्लॅन – Priyanka Chopra Diet Plan in Marathi

ADVERTISEMENT

प्रियांका चोप्राचे फिटनेस टिप्स – Priyanka Chopra Fitness Tips in Marathi

प्रियांका चोप्राचे ब्युटी सिक्रेट्स – Priyanka Chopra Beauty Secrets in Marathi

प्रियांका चोप्रा आणि योगा (Priyanka Chopra Yoga)

प्रियांका चोप्राचे फिटनेस सिक्रेट्स – Priyanka Chopra Fitness Secrets in Marathi

ADVERTISEMENT

Priyanka Chopra Fitness 4
मिसेस जोनसची परफेक्ट फिगर, टोन्ड बॉडी आणि सेक्सी आऊटलुक तिच्या वर्कआऊट फिटनेस रूटीन डाएट प्लॅन आणि योगा सराव केल्यामुळे आहे. ती आपलं आरोग्य आणि फिगर या दोन्ही गोष्टींसाठी सतर्क असते. प्रियांकाचे पाय आणि कंबर ही अजूनही अतिशय सेक्सी दिसते. प्रियांका जिमसाठी वेडी नाही. पण अत्यंत कठोर मेहनत, डाएट प्लॅन आणि योग्य वर्कआऊट रूटीनमुळे तिने स्वतःची फिगर उत्कृष्ट ठेवली आहे. फिटनेस फ्रिक मिस वर्ल्ड आपल्या आहार आणि व्यायामामुळेच परफेक्ट फिगर आणि स्लिम बॉडी योग्यरित्या सांभाळत आहे.

प्रियांका चोप्राचं डाएट रूटीन – Priyanka Chopra Diet Routine in Marathi

Priyanka Chopra Fitness 3
प्रियांका आपलं दैनंदिन रूटीन अतिशय कठोरपणे पाळते. पण विकेंड्सला मात्र ती कधीही चीट डे साजरा करायचा सोडत नाही. प्रियांका सांगते की, तिला सकाळी उठल्यानंतर दर दोन तासांनी सुक्या मेव्यासह नारळ पाणी प्यायला खूप आवडतं. असं केल्यामुळे ती दिवसभर अतिशय अॅक्टिव्ह आणि एनर्जेटिक राहाते. तसंच तिच्या टोन्ड बॉडीमागे नियमित व्यायाम आणि योगाचं खूपच मोठं योगदान आहे. प्रियांकाला चॉकलेट्स, केक, पेस्ट्रीज आणि तंदुरी खाणं अतिशय आवडतं. त्यामुळे विकेंड्सला ती डाएट रूटीनला थोडा आराम देऊन हे सर्व खाते. विटामिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळावे म्हणून प्रियांका नेहमी हिरव्या भाज्या आणि फळं खाते. हे सर्वच तिच्या आवडीचं खाणं आहे.

वाचा – परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल

ADVERTISEMENT

प्रियांका चोप्राचा डाएट प्लॅन – Priyanka Chopra Diet Plan in Marathi
कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण असो वा निक जोनसबरोबर आऊटिंग असो प्रियांका कधीही आपला डाएट प्लॅन फॉलो करायला विसरत नाही. तुम्हीदेखील प्रियांकाचा डाएट प्लॅन फॉलो करू शकता आणि तिच्यासारखं फिट आणि टोन्ड बॉडी मिळवू शकता.

नाश्ता – एक ग्लास स्किम्ड दुधाबरोबर दोन अंडी अथवा ओटमिल
दुपारचं जेवण – 2 चपाती, भाजी, डाळ आणि सलाड
संध्याकाळचं स्नॅक्स – टर्की सँडविच अथवा कडधान्य
रात्रीचं जेवण – सूप, ग्रिल्ड चिकन अथवा मच्छी

प्रियांका चोप्राचं वर्कआउट रिजिम (Priyanka Chopra Workout Regime)

Priyanka Chopra Fitness 1
प्रियांका चोप्राचा फिटनेस मंत्र कार्डियो, जिममधील वेट ट्रेनिंग, तिचं नेहमी आनंदी राहणं, आराम करण्याची तिची सवय आणि योगा सराव हे आहे. ती तिचं वजन अगदी मोठ्या मुश्किलीने वाढवते आणि आठवड्यातून चार दिन ती व्यायाम करते. फिटनेस फ्रिक बॉलीवूड दिवा प्रियांका चोप्राची  टोन्ड आणि सेक्सी बॉडीचं रहस्य हे तिचा नियमित आहार, योग आणि योग्य जीवनशैली आहे. प्रियांकाने ‘मेरी कॉम’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटामधील भूमिकेसाठी 20 किलो वजन कमी केलं होतं. पण त्यानंतरही तिने पुन्हा एकदा मेहनतीने आपली टोन्ड बॉडी पुन्हा मिळवली. बघूया काय आहे प्रियांका चोप्राचं वर्कआऊट रूटीन…

ADVERTISEMENT
  • जिममध्ये 15 मिनिट्स ट्रेडमिलवर धावणं
  • त्यानंतर तिला पुशअप आणि रिव्हर्स लंग्ज परफॉर्म करायला आवडतात
  • 20-25 बेंच जंप्स आणि 20-25 रिव्हर्स क्रंच
  • 60 सेकंद प्लँक्स होल्ड आणि 20-25 बायसेप्स कर्ल्स
  • ती रेझिस्टन्स ट्रेनिंगला नेहमी प्राधान्य देते
  • प्रियांकाला वेट ट्रेनिंगची जास्त आवड नाही
  • जेव्हा जिममध्ये जात नाही तेव्हा तिला धावणं आणि स्पिनिंग अर्थात इनडोअर सायकलिंग करायला आवडतं.
  • तणावमुक्त होण्यासाठी आणि शरीराच्या लवचिकपणासाठी बॉलीवूड दीवा प्रियांका योगा करते.

प्रियांका चोप्राचे फिटनेस टिप्स – Priyanka Chopra Fitness Tips in Marathi

Priyanka Chopra Fitness 8
प्रियांका चोप्राच्या फिटनेसचं रहस्य तिने नेहमी आनंदी राहणं हेदेखील आहे. एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने सांगितल्याप्रमाणे, ‘मला माझ काम जास्त आनंदी ठेवतं. त्याशिवाय माझं कुटुंबही. मला पार्टी किंवा क्लबमध्ये जाण्यापेक्षा घरी कुटुंबाबरोबर वेळ घालवायला जास्त आवडतं. आयुष्यातील लहान लहान गोष्टी मला जास्त आनंद देतात. अर्थात मला लहान मुलांचं हसूदेखील आनंद देतं किंवा घरात बसून सर्वांबरोबर चित्रपट बघणंही मला आनंद देतं. मला माझ्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण फार आवडतं. माझ्या आयुष्यात नकारात्मकतेला काहीच जागा नाही. आनंदी राहण्याव्यतिरिक्त मला फिट राहायलादेखील आवडतं. फिट राहण्यासाठी माझ्याकडून मी सगळे योग्य प्रयत्न करते.’ आनंदी राहण्यासाठी प्रियांका काय करते हे तर आम्ही तुम्हाला सांगितलं आता तिच्या फिटनेसचं काय रहस्य आहे ते जाणून घेऊया.

वाचा – बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

1- प्रियांका जास्तीत जास्त पाणी पिते कारण त्यामुळे तिचं शरीर हायड्रेट राहतं आणि तिची त्वचा चमकदार आणि चांगली होते.

ADVERTISEMENT

2- एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने सांगितलं होतं की, तिला दम्याचा त्रास आहे. यासाठीच ती आपला श्वास व्यवस्थित राहावा याासठी योगा करते आणि प्राणायम करते. त्यामुळे तिला मानसिक समाधान लाभतं आणि तिचं मन शांत राहतं.

3- प्रियांकाला जास्त लिक्विड डाएट घ्यायला आवडतं.

4- प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, कधीही खाण्याच्या बाबतीत आपलं मन मारू नये. त्यामुळे आठवड्यातून एकदा डाएटचा विचार न करता तिला जे आवडतं ते ती खाते.

5- प्रियांका बाहेरचं खाणं कमी आणि घरी बनवलेले पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करते.

ADVERTISEMENT

6- आठवड्यातून एकदा चीट डे असला तरीही प्रियांका तळलेले पदार्थ आपल्यापासून दूरच ठेवते.

7- जास्तीत जास्त ताजं, आरोग्यवर्धक आणि पौष्टिक पदार्थ खाणं खाण्याला प्रियांका प्राधान्य देते.

प्रियांका चोप्रा आणि योगा (Priyanka Chopra Yoga)

Priyanka Chopra Fitness 5
सर्व कलाकारांना फिट राहण्यासाठी योगा, वर्कआऊट रूटीन आणि परफेक्ट फिटनेस रिजीमची खूपच आवश्यकता असते आणि याची पूर्ण कल्पना प्रियांकाला आहे. बॉलीवूडची हे देसी गर्ल प्रियांका योगा, आसान, प्राणायाम आणि मेडिटेशन यावर जास्त भर देते. योगा तणावापासून दूर ठेवण्यासाठी आणि शरीर शांत आणि रिलॅक्स राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्या आयुष्यात करतं. एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने सांगितलं, ‘योगामुळे शरीराला आकार मिळतो. तसंच तुमचा स्टॅमिना आणि लवचिकता वाढवण्यासाठी योगाची मदत होते.’ प्रियांकाच्या योगा सेशनमध्ये द फिश पोझ, वॉरियर पोझ, प्राणायम आणि मेडिटेशन या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत.

ADVERTISEMENT

वाचा – अभिनेत्री दीप्ती सतीचा फॅशन आणि फिटनेस मंत्रा

प्रियांका चोप्राचे ब्यूटी सिक्रेट्स – Priyanka Chopra Beauty Secrets in Marathi
बाकी मोठ्या अभिनेत्रींप्रमाणेच प्रियांका चोप्रावरही त्यांच्या चाहत्यांची नजर नेहमीच टिकून राहते. त्यामुळे तिला नेहमीच सुंदर दिसणं गरेजचं आहे. पण प्रियांका सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा आधार नेहमी घेते असं नाही. ती बारीक सारीक उपाय करून आपलं सौंदर्य जपते. आपल्या व्यस्त आयुष्यातही बॉलीवूड फॅशनिस्टा प्रियांका चोप्रा आपली त्वचा, केस आणि चेहऱ्याची अतिशय योग्यरित्या काळजी घेते . जाणून घेऊया आपलं सौंदर्य अधिक सुंदर करण्यासाठी प्रियांका नक्की काय करते …

Priyanka Chopra Fitness 2

1- बॉलीवूडमध्ये प्रियांका त्या काही स्टार्सपैकी एक आहे जिचे केस निरोगी, मजबूत आणि चांगले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी प्रियांका आठवड्यातून तीन दिवस तेल गरम करून मालिश करून घेते. तिच्या म्हणण्यानुसार, गरम तेलाने मालिश केल्यास दिवसभराचा थकवा निघून जातो.

ADVERTISEMENT

2- आपलं सौंदर्य जपण्यासाठी प्रियांका आपल्या त्वचेला टोनिंग आणि मॉईस्चराईज करण्याला जास्त प्राधान्य देते.

3- ती आपल्या चमकत्या त्वचेचं श्रेय दिवसभर भरपूर पाणी पिण्याला देते

4- तसं तर प्रियांकाची स्वतःची अशी मेकअप आर्टिस्ट आहे. पण इतर दिवशी सुंदरता वाढवण्यासाठी ती फक्त काजळ आणि आयलायनर या दोनच गोष्टींचा उपयोग करते.

5- असं म्हटलं जातं की, चित्रपट आणि फॅशनच्या जगतात येण्यासाठी प्रियांकाने आपल्या नाकाची आणि ओठांची सर्जरी करून घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही बाबींची काळजी घेणंही अत्यंत गरजेचं आहे. तिच्या ओठांसाठी प्रियांका नेहमी दुधावर येणारी ताजी मलई अर्थात क्रिम लावते. रात्रभर मलई लावल्यामुळे ओठांना योग्य हायड्रेशन आणि पोषण मिळतं असं प्रियांकाचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

6- लिपमेकची जेव्हा गोष्ट येते तेव्हा प्रियांकाला डार्क शेड लावलेलं फार कमी वेळा पाहण्यात आलं आहे. ती जास्त वेळा न्यूड ब्राऊन आणि गुलाबी शेड लावायला तिला जास्त आवडतं.

7- आपल्या ब्यूटी रूटीनच्या बाबतीत प्रियांका चोप्राचं म्हणणं आहे की, आपली त्वचा साफ ठेवण्यासाठी आणि मेकअप काढण्यासाठी ती ऑर्गेनिक नारळ तेलाचा वापर करते. त्यासाठी ती त्वचेवर थोडा वेळ तेल लाऊन थांबते. त्यानंतर ओल्या आणि मऊ गरम टॉवेलच्या मदतीने ती चेहरा हळूहळू साफ करते. असं केल्याने एकाचवेळी त्वचा एक्सफोलिएट, शुद्ध आणि हायड्रेट होते आणि कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हा उपाय अगदी योग्य आहे.

8- प्रियांका आपल्या स्किन केअर रूटीनबाबत अत्यंत जागरूक आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ‘माझ्या आयुष्यात काय चालू आहे या गोष्टींनी फरक पडत नाही. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी माझा चेहरा पाण्याने साफ धुते आणि त्यानंतर मॉईस्चराईजर लावते. अगदी पहाटेचे 4 वाजले असले तरीही. मी ही सवय स्वतःला इतकी लाऊन घेतली आहे की, झोपण्यापूर्वी आपोआपच माझे पाय बेसिनजवळ वळतात. या सगळ्या सवयी मला माझ्या आईमुळे लागल्या आहेत. ती स्वतः हे सगळं फॉलो करते.’

फोटो सौजन्य – Instagram

ADVERTISEMENT

You Might Like This:

Effective Tips & Diet Plan To Reduce Weight In Marathi

15 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT