ADVERTISEMENT
home / Family
सिंगल स्टेटस असण्याचे फायदे आणि तोटे

सिंगल स्टेटस असण्याचे फायदे आणि तोटे

काही मुलींना आपलं सुख-दुःख वाटून घेण्यासाठी पार्टनरची गरज असते तर काही मुलींना स्वतःच सिंगल स्टेटस (single status) प्रिय असतं. त्या स्वतःशी कमिटेड (committed) असतात आणि आपल्या या नात्याला त्या पूर्णतः गंभीरतेने आणि जवाबदारीने निभावतात. काही मुली आपल्या इच्छेने सिंगल असतात तर काही जणी काही कारणास्तव सिंगल राहण्याचा निर्णय घेतात. यामागची इतरही कारणं असू शकतात, ज्यामुळे त्या मुली शेवटी सिंगल राहणं पसंत करतात.       

रिलेशनशिप स्टेटस काय आहे (What Is A Relationship Status)?

मुलींना का आवडतं सिंगल स्टेटस (Why Girls Like To Remain Single)?

सिंगल असण्याचे फायदे (Benefits Of Being Single)

सिंगल असण्याचे तोटे (Disadvantages Of Being Single)

रिलेशनशिप स्टेटस काय आहे (What Is A Relationship Status)?

तुम्ही कोणासोबत आणि कोणत्या प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये आहेत हे तुमचं रिलेशनशिप स्टेटस दर्शवत असतो. सोशल मीडियाच्या या काळात आपलं नातं लपवणं सोप काम नाही, कारण असे अनेक स्टेटस प्रचलित आहेत. ज्यामुळे तुमचं नातं समजून घेणं आता सोप्प झालं आहे. जाणून घ्या अशाच काही प्रचलित रिलेशनशिप स्टेटसबाबत

1. सिंगल (Single) – जर तुम्ही एकट्या आहात म्हणजेच जर तुमचा कोणी बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड/नवरा/बायको नसेल तर तुम्ही सिंगल आहात. याचे दोन अर्थ निघतात, ते म्हणजे तुम्हाला फक्त तुमचीच कंपनी आवडते किंवा अजूनपर्यंत तुम्हाला तुमच्या टाईपचं कोणी मिळालं नाही.

reasons-why-some-girls-remain-single-benefits-disadvantages

ADVERTISEMENT

2. कमिटेड (Committed) – तुम्ही कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहात पण अजून लग्न केलं नसेल तर तुम्ही कमिटेड आहात.

 

3. मॅरीड (Married) – जर तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही लोकांसमोरही जाहीर केलं असेल तर तुमचं स्टेटस असतं मॅरीड.

4. कॉम्प्लिकेटेड (Complicated) – या स्टेटसचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे तुम्हाला वाटतं की, ज्या नात्यात तुम्ही आहात ते एकतर्फी आहे किंवा तुम्ही स्वतः त्या नात्याबाबत कन्फ्यूज आहात.

ADVERTISEMENT

5. सेपरेटेड (Separated) – तुम्ही कधीकाळी नात्यात होतात पण आता तुम्ही वेगळे झाला आहात. मग ते ब्रेकअप असू शकतं किंवा तुटलेलं लग्नही असू शकतं.  

6. डिव्होर्स्ड (Divorced) – जेव्हा लग्नानंतर तुमचा डिव्होर्स किंवा घटस्फोट झालेला असतो.

या रिलेशनशिप स्टेटसच्या आधारावर तुम्ही कोणत्या नात्यात आहात ते तुम्हीच ठरवा.

मुलींना का आवडतं सिंगल स्टेटस Why Girls Like To Remain Single?

तुमच्या ओळखीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये अशा कोणी मुली आहेत का ज्या बऱ्याच काळापासून सिंगल आहेत. सिंगल आहेत याचा अर्थ असा नाही की, त्यांचे कोणी मित्र नाहीत किंवा त्यांच्या आयुष्यात कोणी स्पेशल व्यक्ती नाहीत, जे त्यांची सुख-दुःख शेअर करत असतील.

ADVERTISEMENT

एक मुलगी सिंगल असण्यामागे अनेक कारण असू शकतात. काही मुली सिंगल राहतात कारण त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा त्यांच कोणतंही नातं बराच काळ टीकत नाही. तर काही मुलांना स्वतःच्या इच्छेने सिंगल राहायला आवडतं. ज्यामुळे या मुली आयुष्यभर किंवा बराच काळ सिंगल राहणं पसंत करतात. जाणून घ्या याबाबत बरंच काही.  

1. काही वेळा मुलींमध्येच राहिल्यामुळे काहीजणींचा मुलांबाबतचं अट्रॅक्सन (attraction) कमी होतं. घरी भाऊ नसणं किंवा मुलींच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकणं हेही यामागील कारण असू शकतं.

2. काही मुलींमध्ये मुलांप्रती ही भावना असते की, प्रत्येक मुलगा तिच्याकडे चुकीच्या नजरेनेच पाहतो किंवा तिच्यासोबत काहीतरी चुकीचंच वागेल.

3. काही वेळा बऱ्याच मुलींचा अॅटिट्यूड (attitude) ही त्यांच्या मैत्रीच्या किंवा प्रेमाच्याआड येतो.

ADVERTISEMENT

reasons-why-some-girls-remain-single-benefits-disadvantages-3

ज्या मुलींना वाटतं की, त्यांच्यापेक्षा जगात सुंदर कोणीच नाही, त्याही अनेकवेळा सिंगल राहतात.

4. काही मुलींना एकटीनेच सगळं करण्याची सवय असते. त्यांना प्रत्येक काम त्यांच्या पद्धतीने करायचं असतं, मग भलेही त्यामुळे समोरच्याला त्रास का होईना.

5. कधी कधी पास्ट एक्सपीरियन्स (past experience) च्या कटू आठवणींमुळे त्यांचा प्रत्येक मुलावरचा विश्वास उडतो आणि त्या सिंगल राहणंच पसंत करतात.

ADVERTISEMENT

6. कुटुंबापासून लांब राहिल्यामुळे काहीवेळा मुलींमध्ये एकटं राहण्याची इच्छा निर्माण होते.

7. ज्या मुली खूप अॅक्टीव्ह नसतात किंवा ज्यांच्यामध्ये खूप पोरकटपणा असतो, त्यांना मुलांशी पटवून घेणं कठीण जातं.

8. ज्या मुली आपल्या कुटुंबाशी जास्त क्लोज असतात, त्यांना बरेचदा मुलांशी डील करण्यात त्रास होतो. त्या नेहमी आपल्या पार्टनरची तुलना आपल्या घरातील भावाशी किंवा सदस्यांशी करतात आणि काहीही कमी पडल्यास भांडणं करण्याची त्यांना सवय लागते.

9. काही मुलींचा इंटरेस्ट सेम सेक्स पर्सन (same sex person) म्हणजेच मुलींमध्येही असू शकतो.

ADVERTISEMENT

10.काही मुली दुसऱ्या मुलींसोबत झालेल्या वाईट अनुभवांमुळे घाबरून जातात आणि रिलेशनशिप (relationship) किंवा कमिटमेंट (commitment) पासून पळ काढतात.

11. बराच काळ हॉस्टेल किंवा पीजीमध्ये एकटं राहिल्यानेही काही मुलींना एकटं राहणं आवडू लागतं.

 

12. फायनान्शियली (financially) आणि मेंटली (mentally) इतकं स्टेबल असणं की कोणत्याही गोष्टीसाठी कोणाचीही गरज न वाटणं.

ADVERTISEMENT

13. फ्रेंड्स किंवा फॅमिलीचा स्ट्राँग सपोर्ट मिळणं.

reasons-why-some-girls-remain-single-benefits-disadvantages-5

14. ज्या वर्कींग गर्ल्स (working girls) असतात त्यांना फ्रिडमची इतकी सवय होते की त्यांना दुसऱ्यांना आपल्या आयुष्यात केलेली ढवळाढवळ त्यांना आवडेनाशी होती.

15. काही मुलींना कोणत्याही प्रकारचा धोका सहन करायचा नसतो, त्यामुळे त्यांना एकटं राहणंच चांगलं वाटू लागतं.

ADVERTISEMENT

16. काही करिअर ओरिएन्टेड मुली आपल्या कामात इतक्या बिझी असतात की, त्यांना आपल्या रूटीनमधला कोणताही क्षण दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करायचा नसतो.

17. काही जणी अशा असताता ज्यांना दुसऱ्यांमधील एकही कमी गोष्ट सहन होत नाही. त्यांना परफेक्शन आवडतं आणि याच कारणामुळे त्यांना एकटं राहणं आवडतं.

18. कधीकधी घरातलं एकुलतं एक अपत्य असल्यामुळे काही मुलींमध्ये शेअरिंग आणि केअरिंगची फिलींग नसते आणि त्यामुळे त्यांना सिंगल स्टेटसच आवडू लागतं.

19. ज्या मुलींच्या डोक्यात मुलांबाबत नावड निर्माण होते, त्यांनाही एकटं राहणंच जास्त आवडू लागतं.

ADVERTISEMENT

20. काहींना अनेक वर्ष एकटं राहिल्यानेही भविष्यातही एकटंच राहण्याची इच्छा होते. त्यांना एका काळानंतर आपलं आयुष्य कोणाबरोबरही शेअर करण्याची इच्छा होत नाही.

सिंगल असण्याचे फायदे Benefits Of Being Single

जर तुमचं सिंगल स्टेटस लोकांच्या नजरेत खटकत असेल आणि ते तुम्हाला लग्नासाठी प्रेशराईज करत असतील किंवा तुम्ही स्वतः तुमच्या सिंगल स्टेटसबाबत कन्फ्युज असाल तर सिंगल असण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत असले पाहिजेत. एकटं राहण्याचा हा अर्थ नाही की, आयुष्यात काहीच उरलं नाही. एकटं राहूनही आयुष्य हसतखेळत मजेत जगता येतं.

1. तुम्ही कोणावरही अवलंबून नसता आणि तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता.

2. तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हवी ती गोष्ट करू शकता.

ADVERTISEMENT

3. तुमच्या आवडीचं जेवण बनवू आणि खाऊ शकता. तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता.

reasons-why-some-girls-remain-single-benefits-disadvantages-4

4. तुमच्या इच्छेने आणि हिशोबाने तुमचं रूटीन सेट करू शकता.

5. तुम्हाला स्वतःसाठी खरेदी करताना कोणताही विचार करावा लागणार नाही की, तुमच्या पार्टनरला ही गोष्ट आवडेलच की नाही.

ADVERTISEMENT

6. तुमचं मन असेल तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या घरी स्टेसाठी बोलवू शकता.

7. तुमच्यावर फक्त तुमची जवाबदारी असते, जी तुम्ही अगदी हसत खेळत पार पाडू शकता.

8. तुम्हाला प्रत्येकवेळी कोणाच्या प्रश्न-उत्तरांचा सामना करायची गरज नाही.

9. कोणाबाबत एखादी अपेक्षा ठेवून नंतर दुःखी होण्याचीही गरज नाही. सिंगल गर्ल्सची अपेक्षा फक्त त्यांच्यापर्यंतच सीमित असते.

ADVERTISEMENT

10. कोणतीही गोष्ट करण्यासाठी कोणाचीही वाट बघण्याची गरज भासत नाही. सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंत तुमची सगळी कामं तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता.

11. तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी बांधील नसता.

12. तुम्हाला कोणाबाबत जलसीही होत नाही.

13. तुम्ही तुमचं भविष्य तुमच्या हिशोबाने प्लॅन करू शकता.

ADVERTISEMENT

14. तुम्हाला या गोष्टीची चिंता करावी लागत नाही की, सकाळी उठून तुमचा चेहरा किंवा केस कोणत्या परिस्थितीत असतील.

सिंगल असण्याचे तोटे Disadvantages Of Being Single

सिंगल असण्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही. एकटं राहण्याने जिथे आनंद वाटतो तिथे काहीवेळा एकटेपणा भावनाही मनात डोकं वर काढते. आयुष्यात काहीवेळा अशी परिस्थिती येते की, आपल्यासोबत कोणीतरी असावं अशी भावना निर्माण होते. दिवसभरातील नैराश्य किंवा रात्रीच्या अंधारात कोणालातरी घट्ट मिठी मारायची इच्छा होते आणि हा एकटेपणा कोणत्याही वेदनेपेक्षा कमी नसतो. अनेकदा नातेवाईक किंवा मित्रसुद्धाही पोकळी भरू शकत नाहीत, जी फक्त एखादी स्पेशल व्यक्तीच भरू शकते. जाणून घ्या सिंगल असण्याचे तोटे.

1. आजारपणात कोण्याच्या तरी सोबतीची गरज भासणे.

2. कपल्सना पाहून रोमँटीक फिलींग उचंबळून येणे.

ADVERTISEMENT

3. एखाद्या ठीकाणी फिरायला गेल्यावर कोणाच्यातरी कंपनीला मिस करणं.

reasons-why-some-girls-remain-single-benefits-disadvantages-1

4. जेव्हा एखाद्या आनंदी क्षणी किंवा दुःखात कोणीही शेअर करायला सोबत नसणं.

5. पावसाळ्यात जेव्हा पाऊसाचे थेंब पडताच कोणाचा हात धरून रोमँटीक मूडमध्ये चहाचा आस्वाद न घेता येणं.

ADVERTISEMENT

6. सणावाराला किंवा आनंदाच्या क्षणी जेव्हा प्रत्येकजण आपल्या पार्टनरसोबत किंवा कुटुंबासोबत बिझी असतं तेव्हा सिंगल मुलींना स्वतःच्या एकटेपणाची चीड येऊ शकते.

7. लग्न कधी करतेय, हा प्रश्नाचं काही उत्तर नसंत आणि याबाबत बोलणंही बोअर वाटू लागतं.

8. काही लोक तुमच्याकडे सहानभूती दाखवू लागतात तर काहींना कळतं नाही का तुम्ही सिंगला का आहात.

9. काही लोकं सिंगल मुलगी असण्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात.

ADVERTISEMENT

10. आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा कुटुंबातील व्यक्तीेसोबत शेअर करू शकत नाही.

कोणावरही प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करणं महत्त्वाचं आहे. असो प्रत्येक गोष्टीचे आणि स्टेटसचे फायदे आणि तोटे असतातच. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायला हवा, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकेल.  

हेही वाचा – 

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

ADVERTISEMENT

प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

22 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT