सध्या उन्हाळा असला तरीही डेनिम ही अशी फॅशन आहे जी आपण कायमस्वरूपी फॉलो करत असतो. कोणाला कधी काय आवडेल हे सांगता येत नाही. बऱ्याच फॅशन बदलत असतात, पण डेनिमची फॅशन कधीच बदलत नाही. ऋतू कोणताही असो डेनिमचे आऊटफिट्स सर्वांनाच आवडतात. त्यामुळेच डिझायनर्स डेनिमबरोबर नेहमी काही ना काही प्रयोग करत असतात. सध्या उन्हाळ्यातही असे काही डेनिमचे हॉट ट्रेंड्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
डंगरी ड्रेस
तुम्हाला जर वाटत असेल की, डंगरी ड्रेस हा फक्त टीनएजर्सना चांगला दिसतो वा शोभतो तर असं अजिबात नाही. कारण डंगरी हा असा ड्रेस आहे जो कोणत्याही मुलीला अथवा महिलेला शोभून दिसतो. बाजारामध्ये प्रत्येक आकाराचा डंगरी ड्रेस तुम्हाला मिळू शकतो. फक्त तुम्हाला कोणता रंग शोभून दिसेल हे तुमचं तुम्ही ठरवा. काळ्या आणि निळ्या या दोन्ही रंगामध्ये तर या डंगरी असतातच पण याशिवाय अन्य रंगांमध्येही बाजारामध्ये डंगरी उपलब्ध असतात. तुमची उंची आणि आकार याप्रमाणे तुम्ही डंगरी घेऊ शकता.
वाचा – उन्हाळ्यासाठी कूल आणि ट्रेंडी टॉप्स डिझाईन्स
प्लेसूट्स
डेनिम फॅब्रिकबरोबर तयार करण्यात आलेले प्लेसूट्स प्रत्येक व्यक्तिमत्वाला शोभून दिसतात. तसंच कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःला एक वेगळा आणि स्टायलिश लुक देऊ शकता. या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये असे ऑफ शोल्डर प्लेसूट्स नक्की सामावून घ्या.
टॉप विथ टाय-अप
तुम्हाला जर स्वतःला जर कॅज्युअल लुक आवडत असेल तर तुम्ही स्लिव्ह्जमध्ये टाय अप डिझाईनसह डेनिम टॉप घालू शकता. हा तुम्हाला वेगळा लुक देतो. कॉलेट, फिरायला अथवा ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही असा लुक करून जाऊ शकता.
कोल्ड शोल्डर टॉप
आजकल कोल्ड शोल्डर टॉप जरा जास्तच ट्रेंडमध्ये आहेत. मग त्यात हे जर डेनिमचे असतील तर अजून मस्त. डेनिम घालणं हे फॅशनच्या दुनियेत एक वेगळंच समीकरण आहे. डेनिमने एक वेगळाच लुक तुम्हाला मिळतो. त्यामुळे तुम्हालाही जर कोल्ड शोल्डर लुक आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचा कोल्ड शोल्डर टॉप नक्की घालायला हवा आणि तुमच्या वॉर्डरोबमध्ये असा टॉप असायला हवा.
वन शोल्डर टॉप
डेनिम फॅब्रिकबरोबर तयार करण्यात आलेला हा वन शोल्डर टॉप तुम्हाला कोणत्याही पार्टीमध्ये आकर्षक दिसण्यास मदत करतो. या टॉपला अधिक स्टायलिश बनवण्यासाठी समोरच्या बाजूला फ्लेअर्ड डिझाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा टॉप घातल्यानंतर एक वेगळा लुक मिळतो आणि इतकंच नाही तर तुम्ही पार्टीमध्ये उठून दिसता.
साडी
अर्थात साडी हा शब्द वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल आणि तुम्ही पुन्हा हा शब्द वाचला असेल आणि विचार कराल की, साडी आणि डेनिमचा काय संबंध? पण आता डेनिमचा वापर साडीबरोबरदेखील व्हायला लागला आहे. फक्त हे आऊटफिट घालण्याचा थोडा अंदाज वेगळा आहे. जीन्स, लेगिंग्ज, पँट अथवा पलाझोबरोबर तुम्ही तुमचा साडी लुक कॅरी करू शकता आणि तुमच्या घरच्या अर्थात कौटुंबिक कार्यक्रमामध्ये इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसू शकता. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलेल्या डेनिमचा उपयोग करून तुम्ही त्याला पारंपरिक लुकही देऊ शकता.
या सर्वांशिवाय बाजारामध्ये उपलब्ध असणारे डेनिमचे जॅकेट्स, सूट्स आणि कुरतीदेखील तुमचे लक्ष नक्कीच वेधून घेतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार हे कपडे खरेदी करू शकता. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही स्वतःला डेनिम लुक देऊन नक्कीच इतरांपेक्षा वेगळं दिसू शकता. त्यामुळे तुमच्या आऊटफिट्सना डेनिम टच देणं विसरू नका.
Photos : AND & Instagram
हेदेखील वाचा –
कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज
ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’