ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
marathi mhani

125 Famous Marathi Mhani List | प्रसिद्ध 125 मराठी म्हणी

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेचदा बोलताना किंवा कोणाला काही उदाहरण देण्यासाठी सहज मराठी म्हणींचा उपयोग करत असतो. काळाच्या ओघात मराठी म्हणी मात्र आजही त्यांचं महत्त्व राखून आहेत. ते त्यांच्या सहज आणि उत्तम अर्थामुळे जो आजच्या काळातही लागू होतो. मोठे मोठ लेखक असोत वा एखादा साधी काम करणारी मोलकरीण बोलण्याच्या ओघात ते म्हणींचा बेमालूमपणे उपयोग करतात. म्हणी या जरी छोट्या असल्या तरी त्यांचे अर्थ मात्र फारच खोल आणि अगदी वर्मावर  बोट ठेवणारे असतात. चला या लेखात आपण पाहूया मराठीतील अशाच प्रसिद्ध मराठी म्हणी (Marathi Mhani).

Marathi Proverbs With Meaning | मराठीतील प्रसिद्ध 125 म्हणी

खालील म्हणीतील काही म्हणी या प्रसिद्ध आहेत तर काही नव्याने सामील झालेल्या म्हणी आहेत. पाहा POPxoMarathi ने संग्रहित केलेल्या या 125 म्हणी आणि त्यांचे अर्थ. 

आपलेच दात आणि आपलेच ओठ

कधीकधी प्रत्येकावरच अशी वेळ येते जेव्हा एखादा कठीण निर्णय घेण्याची वेळ येते. कारण ज्याच्यामुळे ती वेळ येते तो ही आपलाच असतो. त्यामुळे दोन्हीकडून नुकसान आपलंच असतं.

आपलं ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं पहायचं वाकून.

ही म्हण आजच्या काळातही तंतोतंत लागू होते. फेसबुकचंच उदाहरण घ्या ना. ज्यावर इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे यात सगळ्यांनाच रस असतो. स्वतःच फेसबुक अकाउंटवर एक फोटो असेल पण इतरांचे सगळे फोटो पाहून झालेले असतात.

ADVERTISEMENT

आपला हात जग्गन्नाथ.

कधी कधी इतरांना एखादी गोष्ट करण्यास सांगितल्यावर वेळ वाया जातो आणि कामही होत नाही. त्यापेक्षा आपल्याच हाताने ते काम पटकन केलेलं बरं असं म्हणण्याची वेळ येते.

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट.

आजच्या काळात ही म्हण चपखल बसते. कारण आजकाल लोकांना स्वतःच्या मुलांचं कौडकौतुक करण्यातच जास्त धन्यता वाटते. पण इतरांच्या गुणी मुलांचं कौतुक करणारे विरळाच असतात.

आलिया भोगासी असावे सादर.

आपल्यावर जो प्रसंग येईल त्याला तोंड द्यायला आपण तयार असलं पाहिजे.

आला भेटीला धरला वेठीला.

एखाद्या प्रसंगी समोरच्याची चूक नसतानाही त्याला आहे समोर म्हणून नाहक भरीस पाडलं जातं.

ADVERTISEMENT

– अति तेथे माती.

कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केल्यास त्याची किंमत राहत नाही.

आंधळं दळतं कुत्रं पीठं खातं.

आजच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये म्हण अगदी लागू पडते. जिथे जो खरं काम करतो त्याला किंमत नसते आणि त्याच्या जीवावर भाव कोणीतरी भलताच खाऊन जातो.

आधी पोटोबा मग विठोबा.

काहींना फक्त स्वतःचच पोट भरण्यात स्वारस्य असतं. मग याबाबतीत ते देवालाही सोडत नाहीत.

आडात नाही तर पोऱ्ह्यात कूठून येणार.

आईवडिलांप्रमाणेच त्यांची मुलं असतात.

ADVERTISEMENT

यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स

आगीशिवाय धूर दिसत नाही.

कोणतीही घटना अशीच घडत नाही. त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असतं.

वड्याचं तेल वांग्यावर.

एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढणे.

बुडत्याला काठीचा आधार.

संकटकाळात कधी कधी छोटीशी मदतही मोलाची ठरते.  

ADVERTISEMENT

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

आपल्या उत्त्पन्नाप्रमाणे खर्च करावा असा या म्हणीचा साधा अर्थ आहे. कधीही खर्च करताना सर्वात आधी आपल्याला तेवढा खर्च करणं झेपेल का याचा विचार नक्की करावा.

अडला हरी गाढवाचे पाय धरी.

एखाद्या काम अडल्यावर मूर्ख लोकांच्याही पायी पडावं लागतं.

अती परिचयात अवज्ञा.

कधी कधी एखाद्याच्या जास्त

अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

एखाद्या बाबतीत अति शहाणपणा दाखवायला गेल्यास आपलंच नुकसान होतं. त्यामुळे कधीही एखादी गोष्ट नीट समजवून घ्यावी. त्याबद्दल इतरांचं मत घ्यावं आणि मग करावी. घाई करू नये.

ADVERTISEMENT

अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं.

थोड्याशा कौतुकानेही शेफारून जाणं.

अळीमिळी गुपचिळी.

स्वतःच्या मनातील गोष्टीबाबत कोणालाही कळू न देणं.

ओल्याबरोबर सुके जळते.

वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यास कधी कधी चांगल्या लोकांचेही नुकसान होते.

जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार

ADVERTISEMENT

तहान लागल्यावर विहीर खणणे.

एखाद्या गोष्टीची गरज लागल्यावर तिचा शोध घेणे.

तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना.

एखाद्याशी न पटणे पण तो लांब गेल्यावर त्याचीच आठवण काढणे किंवा त्याच्याबाबत विचारणे.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.

एखादं काम करताना त्याच्यात अनेक अडथळे येणे.

लाथ मारेन तिथे पाणी काढेन.

कोणत्याही कामात यश मिळवण्याचा आत्मविश्वास असणे.

ADVERTISEMENT

पडत्या फळाची आज्ञा.

एखाद्या गोष्टी करायची तर असते पण केल्यावर असं दाखवणे की, दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून केली.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

– दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.

नावडतीचं मीठ अळणी.

एखादी व्यक्ती नावडती आहे म्हटल्यावर तिने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंतीस पडतच नाही.

लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.

स्वतःला काहीही येत नसताना लोकांना शहाणपणा सांगणे.

ADVERTISEMENT

घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं घोडं.

एखादं काम करण्याचा कंटाळा आला नसताना पुन्हा तेच काम करावं लागणं.

एक गाव बारा भानगडी.

एकच व्यक्ती जेव्हा अनेक वाईट गोष्टी एकाच वेळेला करत असते.

ब्रेकअपसाठी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेट्स 

उचलली जीभ लावली टाळ्याला.

कधीही बोलताना आधी विचार करावा आणि मग बोलावा.

ADVERTISEMENT

उथळ पाण्याला खळखळाट फार.

काही लोकं करण्यापेक्षा बोलण्यातच जास्त वेळ घालवतात.

ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.

कोणतीही गोष्ट आवडली म्हणून ती अतिप्रमाणात करू नये.

एक ना धड भाराभर चिंध्या.

कोणतंही एक काम नेटाने न करता, इतर गोष्टींच्या पाठी धावणे.

एकटा जीव सदाशिव.

जो माणूस एकटा असतो त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं बंधन नसतं.

ADVERTISEMENT

एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.

कोणी आपल्याबद्दल वाईट बोलल्यास मनाला न लावून घेणे.

एका हाताने टाळी वाजत नाही.

कोणत्याही गोष्टीत एकाच व्यक्तीची चूक नसते. कारण प्रत्येक गोष्टीला दोन्ही पैलू असतात.

ओठात एक आणि पोटात एक.

सांगताना एक सांगणे पण करताना वेगळेच करणे.

कर नाही त्याला डर कशाला.

जो चांगलं काम करतो त्याला कशाचीही भीती नसते.

ADVERTISEMENT

करावे तसे भरावे.

आपण जी चांगली-वाईट कर्म करतो त्यांची फळं आपल्यालाच भोगावी लागतात.

वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

कशात काय अन फाटक्यात पाय.

काहीही दोष नसताना संकटात पडणे

काखेत कळसा अन गावाला वळसा.

एखादी गोष्ट स्वतःकडे असताना ती सगळीकडे शोधत बसणे.

ADVERTISEMENT

काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.

काहीही काम न करता दिखावा करणे.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

एखाद्यावर आलेलं मोठं संकट टळणे.

हातच्या कंकणाला आरसा कशाला?

जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुरावा लागत नाही.

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.

काही व्यक्तींसाठी कितीही केलं तरी त्यांचं समाधान होतच नाही.

ADVERTISEMENT

देश तसा वेश.

परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे.

कोल्ह्याला द्राक्षे आंबट.

एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून तिला नावं ठेवणं.

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येतातच.

चुकला फकीर मशिदीत.

एखाद्याला व्यक्तीला कितीही सुधारायचा प्रयत्न केला तरी ती पुन्हा तिच गोष्ट करते.

ADVERTISEMENT

चोराच्या उलट्या बोंबा.

स्वतः चूक करून दुसऱ्यावर आरोप करणे.

चोर नाही तर चोराची लंगोटी.

जेथे काहीही मिळण्याची अपेक्षा नसताना छोटीशी गोष्ट मिळाल्यावर समाधान मानणं.

छडी लागे छमछम विद्या येई घमघम.

सहजासहजी न समजणारी गोष्ट शिक्षा केल्यावर लगेच लक्षात येते.

जसा भाव तसा देव.

तुम्ही देवावर जशी श्रद्धा ठेवाल तसा देव तुम्हाला फळ देईल.

ADVERTISEMENT

हपापाचा माल गपापा.

लोकांचा शिव्याशाप करून मिळवलेल्या संपत्तीचा झपाट्याने ऱ्हास होतो.

ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.

जो आपल्यावर उपकार त्याचे उपकारकर्त्याचे ऋण कधीही विसरू नये.

जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.

एखाद्या माणसातल्या वाईट सवयी आयुष्यभर तशाच राहतात.

जेथे पिकतं तिथे विकतं नाही.

एखादी गोष्ट आपल्याकडे आहे म्हणून तिचं महत्त्व नसणं.

ADVERTISEMENT

ज्याचं जळतं त्यालाच कळतं.

ज्याला त्रास होतो त्यालाच त्याच दुःख कळतं.

ज्याच्या हाती ससा तो पारधी.

ज्याच्याकडे जी वस्तू असते त्याला त्या वस्तूबाबतचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच कर्तुत्व एकाचे असते पण नाव दुसऱ्याचे होते.

ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी

नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.

एखाद्याला उपदेश करूनही त्याचा उपयोग न होणे आणि त्याने परत तसेच वागणे.

ADVERTISEMENT

झाकली मूठ सव्वालाखाची.

एखादी चुकीची गोष्ट लपवून ठेवणे.

एका माळेचे मणी.

सगळी माणसं एकसारख्याच स्वभावाची असणे.

चोर सोडून संन्याशालाच फाशी.

खऱ्या अपराध्याला सोडून भलत्यालाच शिक्षा करणे.

ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.

एखाद्याच्या संगतीत राहिल्याने त्याचे दुर्गुण आपल्यात येणे. 

ADVERTISEMENT

भातावरून शिताची परीक्षा.

एखाद्या छोट्या गोष्टीवरून मोठ्या गोष्टींचे अनुमान लावणे.

तळे राखी तो पाणी चाखी.

एखाद्याला काम सोपवल्यावर तो त्यातून फायदा करून घेतोच.

तीन तिघाडा काम बिघाडा.

तीन हा आकडा आला की, काम बिघडतं असा समज आहे.

कोल्हा काकडीला राजी.

छोट्याश्या गोष्टीनेही आनंदी होणे.

ADVERTISEMENT

तेरड्याचे रंग तीन दिवस.

कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळासाठीच असते.

ब्रेकअप झाल्यावर पाहा ‘या’ 45 मूव्हीज 

तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

एखाद्याला विनाकारण मारणे आणि त्याबाबत तक्रार करण्याचीही संधी न देणे.

तोंडात तीळ न भिजणे.

एखाद्याला महत्त्वाची गोष्ट विश्वासाने सांगितल्यावरही तो जेव्हा ती जगभर करतो.  

ADVERTISEMENT

थांबला तो संपला.

आपलं कार्य अविरत सुरू ठेवावं, अपयश मिळालं म्हणून थांबू नये.

दगडापेक्षा विट म‌ऊ.

मोठ्या संकटापेक्षा छोटं संकटं कमी नुकसानदायक असतं.

दात आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.

एक गोष्ट करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी दुसरी गोष्ट उपलब्ध नसणे.

दाम करी काम.

पैसे खर्च केले तर सगळी काम लगेच होतात.

ADVERTISEMENT

इकडे आड तिकडे विहीर.

जेव्हा समोर असलेला प्रत्येक पर्याय नुकसानदायी असतो.

दिव्याखाली अंधार.

कधी कधी दिग्गजांमध्येही दोष असतो.

दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.

एखादी व्यक्ती जसं दाखवते ती खऱ्या आयुष्यातही तशीच असेल याची शाश्वती नसते.

दुरून डोंगर साजरे.

प्रत्येक व्यक्ती तिला लांब असेपर्यंत चांगलीच वाटते. सानिध्यात आल्यावर खरा स्वभाव कळतो.  

ADVERTISEMENT

जागतिक मराठी भाषा दिन

दृष्टी आड सृष्टी.

एखादी गोष्ट जोपर्यंत माहीत नसते तोपर्यंतच चांगल असतं.

हाजिर तो वजीर.

जो वेळेला उपस्थित असतो त्याचाच फायदा होतो.

दैव देते आणि कर्म नेते.

जेव्हा नशिबाने मिळालेली एखादी गोष्ट स्वतःच्या चुकीने गमवावी लागते.

ADVERTISEMENT

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.

दोघांच्या भांडणात नेहमीच तिसऱ्याचा फायदा होतो. त्यामुळे वाद टाळावेत.

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.

दोन दगडावर कधीही पाय ठेऊ नये. नाहीतर पदरी निराशाच पडते.

मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे.

अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

धरलं तर चावतंय आन सोडलं तर पळतंय.

एखाद्याला मदत केली तरी वाईट होणं आणि नाही केली तरी वाईट ठरणे.

ADVERTISEMENT

भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी.

एखाद्याला मदत केल्यावर त्याने गैरफायदा घेणे.

न कर्त्याचा वार शनिवार.

एखादं काम करायचं नसल्यास हजार कारणं देणं.

नव्याचे न‌ऊ दिवस.

प्रत्येक गोष्ट सुरूवातीला छानच वाटते. पण नंतर तिचं महत्त्व कमी होतं.

नाव मोठं लक्षण खोटं.

काही व्यक्ती फक्त नावाला प्रसिद्ध असतात.त्याचं खरं कर्तुत्व काही नसतं.

ADVERTISEMENT

नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे.

जर कोणाला एखादी गोष्ट जमत नसेल तर उगाच कारणं देणे.

नेमेचि येतो मग पावसाळा.

एखादी गोष्ट वारंवार घडणे.

पडत्या फळाची आज्ञा.

एखाद्याने काम सांगितल्यावरच ते पार पाडणे.

पदरी पडले आणि पवित्र झाले.

जे असेल त्यात समाधान मानावे

ADVERTISEMENT

पहिले पाढे पंच्चावन्न.

एकदा केलेली चूक पुन्हा करणे.

पिंपळाला पाने चार.

प्रत्येक गोष्टीला

पी हळद अन हो गोरी.

कोणत्याही गोष्टीचं फळ लगेच मिळत नाही.

पोट भरे खोटे चाले.

– एखादा गोष्ट नको असतानाही उगाच कांगावा करणे.

ADVERTISEMENT

प्रयत्नांती परमेश्वर.

प्रयत्न केले तर देवही नक्की फळ देतो.

पेरावे तसे उगवते.

तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळतं. त्यामुळे नेहमी चांगलं काम करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.

एखाद्या कामासाठी इतके प्रयत्न करावे की, अशक्य ही शक्य होईल.

बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.

पुरावा दाखवा नाहीतर माफी मागा.

ADVERTISEMENT

नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे.

देवाच्या नावाने स्वतःचा स्वार्थ साधणे.

बुडत्याचे पाय खोलात.

अधोगती सुरू झाल्यावर माणसाला जेव्हा अजून दुर्बुद्धी सुचते.

भरोशाच्या म्हशीला टोणगा.

जेव्हा एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो आणि तोच नेमका दगा देतो.

भिंतीला कान असतात.

कधीही कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्याआधी काळजी घ्यावी.

ADVERTISEMENT

भित्यापाठी ब्रम्हराक्षस.

ज्याने चूक केलेली असते त्यालाच परिणामांची भिती वाटते.

म‌ऊ लागले म्हणून कोपऱ्याने खणू नये.

एखादी व्यक्ती चांगली म्हणून तिचा अति फायदा घेऊ नये.

मनी वसे ते स्वप्नी दिसे.

जे आपल्या मनात असतं तेच स्वप्नातही दिसतं. त्यामुळे नेहमी चांगला विचार करा.

माकडाच्या हातात कोलीत.

अयोग्य व्यक्तीला अधिकार मिळणं.

ADVERTISEMENT

मी नाही त्यातली अन कडी लावा आतली.

एखाद्याला गोष्ट दुसऱ्याला नाही म्हणायची आणि स्वतः तिच गोष्ट करायची.

मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.

स्वतः मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही.

मोडेन पण वाकणार नाही.

कितीही त्रास किंवा नुकसान झालं तरी तत्त्वांशी तडजोड न करणे.

म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावलाय.

एखाद्याची चूक असेल तर त्याला वेळीच सांगावं नाहीतर तो आपल्याला डोईजड होऊ लागतो. 

ADVERTISEMENT

जशी राजा तशी प्रजा.

सामान्यजन हे समाजातील मोठ्या व्यक्तीचं अनुकरण करत असतात.

रोज मरे त्याला कोण रडे.

एखादी गोष्ट वारंवार झाल्यावर त्यातील स्वारस्य कमी होऊन जातं.

लंकेत सोन्याच्या विटा.

एखादी गोष्ट दुसऱ्याकडे असणे पण आपल्याला तिचा उपयोग नसणे.

वाचा – Famous Marathi Dialogues

ADVERTISEMENT

लहान तोंडी मोठा घास.

आपली क्षमता नसताना एखादी मोठी गोष्ट करण्याचं ठरवणे. .

लेकी बोले सुने लागे.

एकाला बोलल्यास दुसऱ्यास त्रास होणे.

वराती मागून घोडे.

एखादी गोष्ट घडून गेल्यावर तिच्यासाठी उपाय करणे.

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.

विंचू हा कधीच बिऱ्हाड करत नाही. तसंच काही व्यक्तीचं असतं. ते फक्त गरजेपुरत्या गोष्टी वापरून आयुष्य जगतात.

ADVERTISEMENT

शिळ्या कढीला ऊत.

जुन्या गोष्टी पुन्हा उगाळणे.

सगळं मुसळ केरात.

एखाद्या गोष्टीसाठी केलेली मेहनत वाया जाणे.

उंदराला मांजर साक्षी.

एखादी चूक केल्यावर दोषी जेव्हा एकमेकांसाठी साक्षीदार बनतात.

कसा वाटला… हा मराठी म्हणींचा खजिना.  तुम्हाला हा लेख आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

ADVERTISEMENT

You Might Like This:

मराठीतील लोकप्रिय शब्द (Famous Marathi Words List)

26 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT