25 एप्रिलचं राशीफळ, वृश्चिक राशीला मिळेल बजेटमध्ये घर

25 एप्रिलचं राशीफळ, वृश्चिक राशीला मिळेल बजेटमध्ये घर

मेष - गैरसमज होतील दूर


मित्रमैत्रिणींशी बोलून गैरसमज दूर करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मनातील गोष्ट समोरच्याला सांगण्याचा योग्य दिवस आहे. पार्टनरशीपमधील व्यवहारातून फायदा होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचे स्थान उंचावेल. पैशांमध्ये वाढ होईल. घेण्यादेण्याचे व्यवहार करताना सावधान!


कुंभ - विरोधकांपासून सावधान


आज नव्या कामाची सुरुवात करु नका. त्यात अडचणी येण्याच्या शक्यता आहेत. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची चिन्हे आहेत. विरोधकांपासून सावधान. मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकते. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायासंदर्भात बाहेर जाणे होऊ शकते. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.


मीन- रोमान्स टिकून राहील


संशय आणि ताण-तणावामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. डिप्रेशनदेखील येऊ शकते. व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे. जुनी भांडणे संपतील. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. प्रेमात रोमान्स टिकून राहील.


 वृषभ - आत्मविश्वास वाढेल.


व्यवसायात वृद्धी करण्यासाठी अनेक चांगल्या संधी चालून येतील .कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहन दिले जाईल. राजकारणात जबबादारी वाढेल. आत्मविश्वात वाढेल. रचनात्मक कामात मन रमेल. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील.


 मिथुन - शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता


आज तुम्हाला व्यवसायातून कमी लाभ होऊ शकतो. शेअर बाजारात तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. घेण्यादेण्याच्या व्यवहारात सावध राहा. आत्मविश्वास कमी होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. राजकारणात धूर्तमंडळींपासून सावध राहा. कोर्ट कचेरीतील व्यापातून सुटका होईल.


 कर्क - आरोग्य राहील चांगले


योग्य आणि चांगल्या जेवणाच्या सवयीमुळे तुम्ही फिट आणि निरोगी राहाल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. वेळेवर कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यांची आवड वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. विरोधक काहीच करु शकणार नाही


सिंह - रागावर नियंत्रण ठेवा


आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. समाजात तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतिसोबत बदल होण्याची शक्यता आहे. भांडणांपासून लांब राहा. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. रचनात्मक कामांमधून फायदा होईल. परदेश यात्रेचे योग आहेत.


कन्या -आईच्या आरोग्याची काळजी घ्या


प्रॉपर्टी संदर्भातील सगळे वाद मिटण्याची शक्यता आहे. आर्थिक सुखात वाढ होणार आहे. घर- जागा खरेदी करण्याचा विचार मनात येईल. आत्मविश्वास वाढेल. थांबलेली कामे पुन्हा सुरु होतील. घेण्यादेण्याच्या व्यवहारात सावधान. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.


 तूळ- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या


घरातील लहानांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. जेवणाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.बोलून भांडणे सुतील. व्यवसायात केलेला एखादा नवा करार किंवा नवी ओळख फायद्याची राहील. रचनात्मक कामात प्रगती होईल. समाजातील मान-सन्मान वाढेल. पैशांमध्ये वृद्धी होईल. आत्मविश्वास वाढेल. लबाड व्यक्तींपासून सावधान!


 वृश्चिक - बजेटमध्ये मिळेल घर


तुम्ही कोणाला प्रपोज केले असेल तर आज तुम्हाला होकार मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. कोणत्यातरी सामाजिक सोहळ्याला हजेरी लावाल. तुमच्या बजेटमध्ये घर मिळण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट संदर्भातील घेण्यादेण्याच्या व्यवहारात तुम्हाला फायदाच होईल. खेळांंची आवड वाढेल.


 धनु - अधिकारी नाराज होण्याची शक्यता


तुमच्या दुर्लक्षित स्वभावामुळे तुम्ही नोकरीच्या चांगली संधी गमावू शकता. तुम्ही हाती घेतलेले काम उशिरा पूर्ण केल्यामुळे अधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा. महत्वाची कागदपत्रे जपून ठेवा. विरोधक तुमच्यातील कमीपणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे.


मकर-  नव्या कामाचा करा शुभारंभ


आज तुम्ही काही नवीन करायचे योजले असेल तर त्याची सुरुवात करु शकता. सब्सिडी किंवा टॅक्स बचतीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. नवी जागा खरेदी करण्याचे ठरवू शकता. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.


हे ही वाचा


12 राशींमध्ये या राशी आहेत आहेत बलशाली


राशीनुसार करुन पाहा या सेक्स पोझिशन


राशीनुसार तुम्ही निवडा तुमचे करीअर