ADVERTISEMENT
home / Periods
उन्हाळ्यात तुम्हालाही नकोसे होतात पिरेड्स, मग वाचाच

उन्हाळ्यात तुम्हालाही नकोसे होतात पिरेड्स, मग वाचाच

पिरेड्सचे पाच दिवस महिलांच्या आयुष्यातील नकोसे दिवस असतात. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने पिरेड्स येऊच नये असे वाटतात. कारण आपल्याला या दिवसात इतके गरम होत असते की, सॅनिटरी पॅड घेण्यासही कंटाळा येतो. तुम्हालाही उन्हाळ्यात सॅनिटरी पॅड लागतात. ते काढून फेकण्याची इच्छा होते. तर मग आम्ही दिलेल्या टीप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा. ज्यामुळे तुम्हाला रॅशेश येणार नाही आणि पिरेड्स दरम्यान येणारा कंटाळाही येणार नाही.

  •  कॉटन पॅडची निवड

periods summer care1

उन्हाळा असो किंवा कोणताही सीझन तुम्ही कॉटन पॅडची निवडच केली पाहिजे. स्वस्त आणि मस्त पॅडस घेण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. जे सॅनिटरी पॅड 100%प्युअर कॉटन असतील अशाच सॅनिटरी पॅडची निवड करा. कारण असे सॅनिटरी पॅड तुमच्या जाघांना जास्त लागत नाही. त्यामुळे तुमच्या जाघांना येणाऱ्या रॅशेश देखील येणार नाही. तुम्ही तुमचे रोजचे सॅनिटरी पॅडने संतुष्ट नसाल तर popxo तुम्हाला काही  बायोडिग्रेडेबल आणि 100% नॅच्युरल सॅनिटरी पॅड सुचवेल.

Carmesi All Natural Sanitary Pads – XL (10 Pads)- 254/-

ADVERTISEMENT

Whisper Ultra Soft 2x Softer Odour Control Super Saver – XL Plus (30 Pads)-290/-

Heyday Natural & Organic Sanitary Napkins (Ultra Thin-14 pack)-199/-

उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला हायड्रेट

  • बनियनचा कपडा देईल आराम

जाघांना पॅड लागण्याच्या तक्रारी अनेक महिला करतात. जर तुम्हालाही सॅनिटरी पॅड लागत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. त्यासाठी तुम्हाला हवा आहे बनियनचा स्वच्छ तुकडा. आता या बनियनच्या तुकड्याचे करायचे काय? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सॅनिटरी पॅड पँटीला लावायच्या आधी तुम्हाला पँटीभोवती हा कपडा व्यवस्थित घडी करुन ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला तुमचे सॅनिटरी पॅड लावायचे आहे. बनियनच्या कपड्यामुळे तुमच्या सॅनिटरी पॅडच्या विंग्जना लागलेले ब्लड स्टेन तुमच्या थेट पँटीला लागणार नाही. शिवाय बनियनचा कपडा नरम असल्यामुळे तुमच्या जाघांना पँटीच्या कडा लागणार नाहीत

ADVERTISEMENT

*बनियनचा कपडा निवडण्यामागे इतकेच कारण आहे की, हा कपडा खूप पातळ आणि आरामदायी असतो. हा कपडा खराब झाल्यानंतर स्वच्छ करण्यासही अडथळा येत नाही.

*घरातील एखादी जुनी बनियन असल्यास त्याचे  सॅनिटरी पॅडपेक्षा मोठे आणि तुमच्या पँटीला पूर्ण कव्हर करु शकेल इतक्या आकाराचे तुकडे करा.

तुम्ही अजूनही वापरत नाही का पँटी लायनर, मग तुम्ही हे वाचायलाच हवे

  • इंटिमेट पावडरला द्या पसंती

उन्हाळा म्हटलं की, घाम हा आलाच. एकतर पिरेड्सचा ओलेपणा, त्यात येणारा घाम, ब्ल्ड स्टेनचा वास यामुळे सतत चीडचीड होत राहते. तुमच्या जाघांकडील भाग कोरडा आणि कायम सुंगधित राहावा असे वाटत असेल तर तुम्ही रोजच्या रोज इंडिमेट पावडरचा वापर करा.  सकाळी आणि रात्री झोपताना आवर्जून ही पावडर जाघांना, नितंबाना लावा.

ADVERTISEMENT
  •  कपडा घेतल्यास उत्तम

कपडा! हल्ली पिरेड्सदरम्यान कपडा कोणीच घेत नाही. पण उन्हाळ्यात कपडा वापरण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो. कारण कपडा अजिबात लागत नाही. त्यात रक्त अधिक चांगल्या पद्धतीने शोषले जाते. पण हल्ली महिलांना कामानिमित्त तासनंतास ऑफिसमध्ये बसावे लागते किंवा बाहेर पडावे लागते अशावेळी कपडा वापरणे कठीण जाते म्हणून महिला सॅनिटरी पॅडलाच पसंती देतात. पण जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही कपडा वापरुन पाहा. तुम्हाला थोडा आराम वाटेल.

पदार्थांचे असे कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यास ठरु शकतात घातक

  • सैल कपडयांची निवड

loose clothing

पिरेड्सच्या दिवसात सैल कपडे घालणेच चांगले असते.( पँटी देखील तुम्ही पातळ होजीअरी मटेरिअलच्या घाला). तुम्ही सैल कपड्याची निवड केल्यास उत्तम. या दिवसात जीन्स घालणे शक्यतो टाळा. जीन्स घालायची असेल तर या दिवसात सैल जीन्स घाला. याशिवाय. कॉटन पँटस, स्कर्टस, लेगिंग्स, हेरम पँटस, पलाझो असे कित्येक पर्याय तुमच्याकडे आहेत.

ADVERTISEMENT

(सौजन्य- Shuttersrock)

01 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT