मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या गॉसिपनंतर आता गॉसिप रंगत आहेत त्या मलायकाचा एक्स हसबंड अरबाजच्या लग्नाची. एका एन्टरटेन्मेंट चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्वत: अरबाज खानने हा खुलासा केला आहे. त्यामुळे तो लवकरच लग्न करेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तब्बल 1 वर्षांनी अरबाजने लग्न करण्याचे हे संकेत दिले आहेत. शिवाय त्याने मलायकासोबत घटस्फोट का झाला? याचे कारण दिले आहे.
अरबाजला ज्यावेळी मलायकासोबत घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले त्यावेळी त्याने ते कारण सांगितले. शिवाय तो दुसऱ्या लग्नाबाबत हे देखील म्हणाला की, एखादे लग्न जर नाही टिकले तर दुसरं लग्न करायला काय हरकत आहे. आपल्याकडे ही प्रथा आधीपासून सुरु आहे. त्यामुळे मी देखील दुसरं लग्न करीन. मी उलट तरुणांना असा संदेश देईन की, आयुष्यात दुसरी संधी द्यायला काय हरकत आहे. त्यामुळे आता हे नक्की की, तब्बल 1 वर्षानंतर अरबाजने रिलेशनशीपमध्ये स्वत:ला दुसरी संधी द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे आता अरबाज लग्नाची तारीख कधी सांगतो असे झाले आहे.
आंटी म्हणणाऱ्यांना मलायकाने दिले सडेतोड उत्तर
मलायकाने काही दिवसांपूर्वी करिना कपूरच्या शोमध्ये तिच्या घटस्फोटाचे कारण सांगितले. आता अरबाजनेही अखेर त्यामागील काही कारणे सांगितले. तो म्हणाला की, माझे आणि मलायकाचे नाते एकदम चांगले होते. तक्रारीला काहीच जागा नव्हती. पण अचानक काही गोष्टी बिघडल्या. त्याचा परिणाम घटस्फोटात झाला. ज्या पद्धतीने आमचे नाते संपले त्याबद्दल मला काहीच तक्रार नाही. काही काळासाठी माझे आयुष्य हलले. पण आता माझे आयुष्य रुळावर आले आहे.आता आयुष्य रुळावर आले म्हटल्यावर मी माझा संसार पुन्हा नव्याने सुरु करण्यात काय हरकत आहे. मी असा माणूस नाही, जो एकदा लग्न बिघडले म्हणून पुन्हाही बिघडेल असा विचार करुन आयुष्य असेच जगण्याचा विचार करेल. जर आयुष्यात चांगली व्यक्ती आली तर आयुष्य नक्कीच चांगले होईल.
भूमीसोबत असे काय घडले की, तिला सहन करावा लागला हा त्रास
मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. नुकतेच ते मालदिव्समध्ये जाऊन आले. तर दुसरीकडे मॉडल जॉर्जिया एंडियानी डेट करत आहे. जॉर्जिया आणि अरबाजमध्ये 22 वर्षांचा फरक आहे.त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले आहे. काही दिवसांपूर्वी जॉर्जियासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली अरबाज खानने दिली होती. त्यामुळे आता हे नाते नव्या दिशेने नेण्याचा अरबाजचा प्रयत्न असावा.
मालदीवच्या सुंदर किनाऱ्यावर मलायकाचा हॉट योगा
मलायका अर्जुनसोबत 19 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा होती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्या लग्नाकडे खिळलेल्या होत्या. पण तसे काहीच झाले नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. पण ही जोडी बी टाऊनमध्ये अनेकवेळा अनेक ठिकाणी एकत्र दिसत असते. आता त्यांच्या नात्याला ते कोणते नाव देणार यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.
अरबाज खान फार चित्रपटातून दिसला नसला किंवा इतर प्रोडक्शन हाऊसचे त्याने फार चित्रपट केलेले नाही. पण सध्या तो युट्युूबर करत असलेला एक कार्यक्रम चांगलाच सुरु आहे. मुलाखत प्रकारातील हा कार्यक्रम असून लोकांना त्याला अँकर रुपात पाहायला आवडत आहे.