ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)

जिरं असं म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे मिसळणाचा डबा. नंतर जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. भारतीय पाकसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण आणि चवीत भर टाकणारं मसाला जिन्नस म्हणजे जिरं. पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात जिऱ्याची मदत होऊ शकते.

जिरे खाण्याचे फायदे

जिरे पाणी पिण्याचे फायदे

जिऱ्याचे साईड ईफेक्ट्स

ADVERTISEMENT

जेरा रेसिपी

FAQs

जिरं म्हणजे काय आणि त्याचा शोध (What Is Cumin Seed)

%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87 %E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87

जिऱ्याचा शोध 4,000 सालापूर्वी सीरिया आणि पूर्व इजिप्तमधील एका संशोधनात झाला. त्याकाळी याचा वापर मसाला आणि मम्मीजचं संवर्धन करण्यासाठी केला जायचा. बायबलमध्येही याचा उल्लेख आढळतो. पूर्वापार जिऱ्याचा वापर हा व्यापारातील देवाणघेवाण करण्यासाठी केला जायचा. तेव्हापासूनच जिऱ्याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिरं हे सूरूवातीपासूनच भारत, रोमन, ग्रीक आणि मिस्त्र संस्कृतीतील महत्त्वाचा भाग होतं. युरोपियन कॉलोनायझेशन नंतर जिरं हे मेक्सिकन आणि दक्षिण अमेरिकन खाद्यसंस्कृतीतही सामील झालं. जिरं हे विविध प्रकारात आढळतं. उदाहरणार्थ काळं जिरं, हिरवं जिरं आणि पांढरं जिरं.

ADVERTISEMENT

वाचा : मेथीचे आरोग्यासाठी काय आहेत फायदे

अख्खं जिरं आणि जिरं पावडर (Cumin Seeds & Ground Cumin Powder)

जिरं हे अख्खं आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात वापरलं जातं. अख्खं जिरं हे प्रत्येक पदार्थाच्या फोडणीचा अविभाज्य भाग आहे. काहीवेळा जिरं भाजून वाटणातही वापरलं जातं. तर जिऱ्याच्या पावडरचा वापर हा मसाला म्हणूनही केला जातो. जिऱ्याच्या पावडरचा वापर आजकाल सॅलड, सॉसेस आणि बार्बेक्यूजमध्येही केला जातो.

जिरे खाण्याचे फायदे (Benefits Of Cumin Seeds In Marathi)

जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. जाणून घेऊया जिरं खाण्याचे फायदे.

त्वचेसाठी (Cumin For Skin)

जिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॅक्नेची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन (Skin Infections) पासूनही रक्षण होतं. त्याशिवाय जिऱ्याचा उपयोग हा सोरायसिस आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठीही केला जातो. तुम्ही हवं असल्यास जिरा पावडरच्या वापर फेसपॅकमध्येही घालूनही करू शकता.

ADVERTISEMENT

अजवाइनच्या वापराबद्दल देखील वाचा

पचन (Digestion)

जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. जिरं आपल्या प्रतिकारशक्तीलाही वाढवतं. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत. आवळ्यासोबत जिरं, ओवा आणि काळं मीठ मिसळून खाल्ल्यास भूक वाढते. पचनासाठी ओवा फायदेशीर असल्यामुळे ओव्याचे अनेक फायदे शरीरावर होतात.

केसांसाठी (Hair)

त्वचेला सुंदर करण्यासाठी जसे जिऱ्याचे फायदे आहेत. तसंच केसांसाठीही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याचं तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होतं. रोज काळ्या जिऱ्याचं सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत होतात. याशिवाय ज्यांना कोड्यांची समस्या असेल त्यांच्यासाठीही काळं जिरं फायदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी तेलासोबत जिरं गरम करून घ्या. या कोमट तेलाने केसांना मसाज करा. 2 ते 3 वेळा हे तेल लावल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.

ताप (Fever)

तापामुळे जेव्हा शरीर दूखू लागतं. तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता. जिऱ्यातील थंडावा अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि ताप उतरतो.

ADVERTISEMENT

सर्दी (Cold Relief)

थंडीच्या दिवसात नाक बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका येणं बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठ दूर करण्यात ही मदत करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेलं जिरं घालून प्या. असं केल्याने लवकर बरं वाटेल.

पोटदुखी (Stomach Pain)

पोटात कधीही दुखू शकतं. जेव्हा पोटात असह्य दुखत असेल तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पाहा. पोटात जेव्हा दुखेल तेव्हा जिरं आणि साखर (Jeera aur sugar) समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.

उमासे येणं (Morning Sickness)

जर तुम्हाला उलटीसारखं वाटत असल्यास जिर चावून चावून खावं. त्वरित बरं वाटतं. जिऱ्याचा रस चघळल्याने उलटीसारखं वाटणं कमी होतं.

सांधेदुखी (Joint Pain)

मेथी, ओवा, जिर आणि बडीशोप सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण एक चमचा रोज खाल्ल्याने डायबिटीज, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसंच गॅसची समस्येवरही याचा फायदा होतो.

ADVERTISEMENT

कॉलेस्ट्रॉल (Cholestrol)

आजकाल कॉलेस्ट्रॉल वाढल्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. बरेच जणांच्या खाण्यापिण्यावर यामुळे मर्यादा येतात. जिऱ्याचं सेवन केल्यास तुमच्या कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.

                                                          वाचा – Health Benefits Of Jaggery In Marathi

जिरे पाणी पिण्याचे फायदे (Jeera Water Benefits)

%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87

रात्रीच्या वेळी 2 चमचे जिरं 1 ग्लास पाण्यात भिजवावं आणि सकाळी उठल्यावर उकळून गाळून घ्यावं. हे पाणी रिकाम्या पोटी चहासारखं गरमगरम घेतल्यास नक्कीच फायदा होतो. पाणी गाळून उरलेलं जिरं चावून खावं. याचं सेवन रोज केल्यास शरीरातील कोणत्याही भागातील अनावश्यक चरबी शरीरातून बाहेर पडेल. शक्यतो जिरं हे तांब्याच्या भांड्यात भिजवावं. कारण असं मानलं जातं की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलानेही वजन कमी होतं.

ADVERTISEMENT

वाचा – शेपूची भाजी सहज उपलब्ध

जिरं आणि विविध घरगुती उपाय (Uses of Cumin Seeds In Marathi)

  1. दह्यासोबत जिरं घ्यायचं असल्यास 50 ग्रॅम दह्यात जिरं पावडर मिसळून रोज खावं.
  2. व्हेजिटेबल सूपमध्ये चव वाढवण्यासाठी तुम्ही एक चमचा जिरं घालू शकता.
  3. मधासोबत जिरं घ्यायचं असल्यास 3 ग्रॅम जिरा पावडरमध्ये काही थेंब मध घालावं आणि पाणी प्यावं.
  4. ब्राऊन राईस बनवताना यामध्ये जिरं घातल्यास स्वादही वाढेल आणि वजनही कमी करेल.
  5. जिऱ्याचं चाटण : आलं, लिंबू आणि जिरं हे वजन कमी करण्याची क्षमता वाढवतं. गाजर आणि इतर भाज्या उकडून त्यात आलं किसून घाला आणि वरून जिरं-लिंबाचा रस घाला. ही डीश तुम्ही रात्री डाएट फूड म्हणून खाऊ शकता.

जिऱ्याचे साईड ईफेक्ट्स (Side Effects Of Cumin Seeds In Marathi)

प्रत्येक गोष्टीचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्याचं सेवन संतुलित प्रमाणात केलं जातं. तुम्ही जिऱ्याचे फायदे जाणून घेतले असतीलच पण अति प्रमाणात जिऱ्याचं सेवन केल्यास शरीरावर याचा प्रभाव पडू शकतो.

  1. गर्भवती महिलांनी जिऱ्याचं सेवन कमी करावं. जिऱ्याचं जास्त सेवन केल्यास ते प्रसूती वेळी गर्भपात होण्याचं कारण बनू शकतं.
  2. पिरियड्सच्या काळात जिऱ्याचं सेवन कमी करावं कारण जिऱ्यामुळे जास्त ब्लीडींग होऊ शकतं.
    काहींना जिऱ्याची एलर्जी ही असू शकते.
  3. जास्त प्रमाणात बऱ्याच काळापर्यंत जिऱ्याचा वापर केल्यास किडनी आणि लिव्हरला त्रास होऊ शकतो.
  4. जिरं हे वातूळ असल्यामुळे सेवन केल्यानंतर जास्त ढेकरा येऊ शकतात.

उन्हाळ्यात आणि दैनंदिन जीवनात जिऱ्याचा समावेश करण्यासाठी काही खास रेसिपीज (Jeera Recipes)

दैनंदिन जीवनात स्वयंपाक करताना आपण फोडणीसाठी जिऱ्याचा वापर करतोच. पण तुम्ही जिऱ्याचा पुढीलप्रकारेही आहारात समावेश करू शकता.

जलजिरा (Jaljeera)

%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE - Cumin seeds in Marathi

ADVERTISEMENT

जलजिरा हे उन्हाळ्यातील प्रसिद्ध पेय आहे. हे तहानही भागवतं आणि पचनही सुधारतं. तसंच शरीराला उन्हाचा त्रास होण्यापासून वाचवतं. त्यामुळे तुम्ही हे सरबत केल्यास घरच्यांना नक्कीच आवडेल.

साहित्य:

पुदीन्याची पानं -1/2 कप,

कोथिंबीर -1/2 कप,

ADVERTISEMENT

लिंबू – 2 नग,

रायत्याची सुकी बूंदी -1/2 कप,

साखर – 01 मोठा चमचा,

भाजलेलं जिरं – 02 छोटा चमचा,

ADVERTISEMENT

काळं मीठं – 01 छोटा चमचा,

आलं – 01 इंच तुकडा,

हिंग – 01 चिमूट,

काळी मिरी – 1/4 छोटा चमचा,

ADVERTISEMENT

मीठ – 1/2 छोटा चमचा/स्वादानुसार

जलजिरा बनवण्याची कृती:

सर्वात आधी पुदीना आणि कोथिंबीर चांगली स्वच्छ करून घ्या. बारीक चिरून मग त्यात आलं किसून घाला. आता त्यात साखर, भाजलेलं जिरं, काळीमिरी, काळं मीठ आणि साधं मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पेस्ट एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात 4 ग्लास थंड पाणी घालून चांगल मिक्स करा. आता त्यात लिंबाचा रस घाला जलजिरा सरबत तयार आहे. सर्व्ह करताना ग्लासात सरबत काढून त्यात वरून बूंदी घालून गार्निश करा किंवा तुम्ही बर्फाचा चुराही घालू शकता.

वाचा- सौंदर्यासाठी दालचिनी चे फायदे

ADVERTISEMENT

जिरा राईस (Jeera Rice)

जिरा राईस हा भाताचा प्रसिद्ध आणि आवडता प्रकार आहे. साधा भात खायचा कंटाळा आल्यास अनेकवेळा जिरा राईसला पसंती दिली जाते. कढीसोबतही जिरा राईस पसंत केला जातो.

साहित्य:

1 कप बासमती तांदूळ

1 चमचा जिरा पावडर

ADVERTISEMENT

3 कप पाणी

2 चिमूट मीठ

1 चमचा जिरं

1 चिरलेला कांदा

ADVERTISEMENT

1 ½ चमचा वनस्पती तेल

कृती:

जीरा राईस बनवण्यासाठी सर्वात आधी थंड पाण्याने बासमती तांदूळ धूवून घ्या. तांदूळ काही वेळ तसाच भिजवून ठेवा म्हणजे नंतर तांदूळ लवकर शिजेल. मग एका बाऊलमध्ये 3 कप पाणी घेऊन त्यात तांदूळ घाला. नंतर प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी करा. नंतर कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत फ्राय करा. चव वाढवण्यासाठी त्यात तुम्ही ड्राय फ्रूट्स आणि मटारही घालू शकता. आता भिजलेले तांदूळ आणि मीठ त्यात घाला आणि प्रेशर कुकर लावून 2 शिट्ट्या करून घ्या. सर्व्ह करताना कोंथिबीर आणि ड्राय फ्रूट्सने सजवा.

जिरे ताक (Jeera Buttermilk)

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी जिरं घातलेलं ताक पिणं हा सर्वोत्तम उपाय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात किमान एकदा तरी जिरं घातलेलं ताक प्यायलाच हवं.

ADVERTISEMENT

साहित्य:

1 कप दही

1 ½ कप थंड पाणी

½ टीस्पून भाजलेली जिरा पावडर

ADVERTISEMENT

मीठ स्वादानुसार

¼ टीस्पून काळं मीठ

⅛ टीस्पून काळी मिरी पावडर

कृती:

ADVERTISEMENT

एका पातेल्यात दही घ्या. यामध्ये जिरा पावडर, मीठ, काळं मीठ, आणि मिरी पावडर घाला. चांगलं फेटून घ्या. मग थंड पाणी घालून पुन्हा घुसळून घ्या. ताक तयार आहे.

पाहूया काय आहेत काळी मिरीचे फायदे

जिऱ्यासंबंधी विचारण्यात आलेले अत्याधिक प्रश्न (FAQs)

%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87

जिऱ्याचा वापर वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी होऊ शकतो का?

जिरं हे वजन कमी कऱण्यासाठी रामबाण औषध आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, रोज एक चमचा जिऱ्याच्या सेवनाने तिप्पट पटीने फॅट कमी होतं. एका रिसर्चनुसार, वजन कमी करण्यात जिरं प्रभावी ठरतं. जिऱ्यामुळे ना फक्त एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात तर मेटाबॉलिजम रेट वाढून डायजेशनही सुधारतं.

ADVERTISEMENT

जिऱ्याचं पाणी दिवसातून किती वेळा घेऊ शकता?

जिऱ्याचं पाणी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहासारखं घेऊ शकता किंवा संध्याकाळी चार-पाचच्या सुमारासही घेऊ शकता. पण जिऱ्याच्या पाण्याचं रोज सेवन सुरू करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

प्रसूतीकाळात किंवा प्रसूतीनंतर जिऱ्याचं सेवन केलेलं चांगल की वाईट?

प्रसूती काळात जिरं चांगल नसतं पण प्रसूतीनंतर याचं सेवन तुम्ही करू शकता. सर्व आजीही गरोदर महिलांना प्रसूतीनंतर जिऱ्याचं पाणी प्यायचा सल्ला द्यायच्या. खरंतर जिऱ्यामुळे प्रसूतीकाळात वाढलेलं वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. तसंच नवजात बाळाच्या आईला दूध न येण्याची समस्या असेल, तर जिऱ्याचं सेवन केल्यास ही समस्या दूर होते. जिऱ्याचं पाणी प्यायल्याने दूध बनायला सुरूवात होते.

जिऱ्याचं जतन कसं करावं? 

जर तुम्ही बाजारातून जास्त प्रमाणात जिरं आणल्यास ते लगेच बाटलीत भरून ठेऊ नका. शक्यतो ते दोन ते तीन दिवस उन्हात वाळत ठेवा आणि मग बाटलीत साठवून ठेवा. म्हणजे ते अगदी वर्षभरही चांगलं राहील.

You Might Like These:

ADVERTISEMENT

6 Benefits Of Gioly In Marathi

Benefits Of Olive Oil & Best Oil Brands In India In Marathi

आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान

ब्रोकोलीचे तुमच्या सौंदर्यावर होणारे फायदे (Beauty Benefits Of Broccoli In Marathi)

ADVERTISEMENT
04 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT