home / लाईफस्टाईल
वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो येण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो येण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

लहानपणापासूनच आपल्याला पोषक पदार्थ खाण्याचा आग्रह केला जातो. सर्वच फळांमध्ये पोषकतत्व भरपूर प्रमाणात असतात. मात्र पोषक पदार्थांपेक्षा इतर अपथ्य गोष्टी खाण्याकडेच नेहमी आपला कल असतो. सतत जंकफूड, चायनीज, वडापाव, चिप्स खाण्याने तुमचे वजन हळू हळू वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी मग तुम्ही अनेक उपाययोजना करता. कृत्रिम उपचार करून तुमचे वजन काही काळापुरते नियंत्रित झाल्यासारखे वाटते मात्र पुन्हा ते वाढू लागते. शिवाय अती व्यायाम अथवा वजन कमी करण्याचे उपचार केल्यामुळे तुमचे वजन तर कमी होते मात्र त्याचबरोबर चेहऱ्यावरचे तेजदेखील कमी होत जाते. गाल आत गेल्यावर चेहऱ्यामधला फ्रेशनेस कमी दिसू लागतो. पुरेसे पोषण न झाल्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. मात्र वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि त्वचा फ्रेश दिसण्यासाठी काही फळांचा नियमित आहारात समावेश करा. कारण फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही आणि त्वचेवर ग्लो देखील येतो.

सफरचंद –

apple for weight loss

एन अॅपल ए डे किप दी डॉक्टर अवे ही म्हण तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल. मात्र हे माहीत असूनही तुम्ही सफरचंद खाण्याचा कंटाळा करता. निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी नियमित सफरचंद खाण्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नियमित सफरचंद खाल्यास तुमचे वजनदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण सफरचंदामध्ये भरपूर कॅलरीज आणि फायबर असते. ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग आणि डार्क सर्कल्सदेखील कमी होतात. दररोज सकाळी नास्ता करताना एक सफरचंद खा किंवा संध्याकाळी कामावरून निघण्याआधी एक सफरचंद खा. ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल. भुक कमी लागल्यामुळे तुम्ही इतर चुकीचे पदार्थ खाणार नाही.

संत्रे-

Orange For Weight Loss

संत्रे हे एक असे फळ आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरिज बर्न होऊ शकतात. शिवाय संत्र्यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. गोड खाण्याची इच्छा यामुळे कमी होते. मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर संत्र्यांचा रस घेण्यापेक्षा एक संत्रे सोलून खा.  त्वचा सुंदर दिसण्यासाठी संत्र्याचा वापर तुम्ही त्वचेवर फेसपॅकप्रमाणे लावण्यासाठी देखील करू शकता. व्हिटॅमिन सी युक्त संत्र्याचा रसामुळे तुमचा चेहरा नितळ आणि चमकदार होतो.

कलिंगड-

Watermelon For Weight Loss In Hindi

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे अनेक चांगले फायदे शरीरावर होतात. एकतर कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे तुमचे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. शिवाय कलिंगडामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. भरपूर पाण्याचा अंश आणि फायबर असलेल्या कलिंगडामुळे तुमचे वजन लवकर कमी होते. यासाठी दररोज सकाळी नास्ता करताना कलिंगडाचा रस प्या अथवा कलिंगड खा.कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडंट असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते.

किवी-

Kiwi Fruit For Weight Loss In Hindi

किवी वजन कमी करण्यासाठी एक सुपरफुड समजले जाते. कारण किवीमध्ये व्हिटॅमिन सी, ई , फॉलवेट  आणि फायबर असते. किवीमधील बीयांमुळे पचन चांगले होते. किवी खाण्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू लागते आणि भुक कमी लागते. किवीमधील पोषकतत्वांमुळे तुमचे पुरेसे पोषण होते आणि सतत भुक न लागल्यामुळे तुम्ही इतर नको ते पदार्थ कमी प्रमाणात खाता. किवीमधील व्हिटॅमिन ई मुळे तुमची त्वचा ग्लो करू लागते.

फळं शरीरासाठी अतिशय पोषक असतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि सुंदर दिसायचे असेल तर ही फळं जरूर खा. मात्र लक्षात ठेवा आजकाल बाजारात मिळणारी फळं ही केमिकलयुक्त पद्धतीने पिकवली जातात. त्यामुळे फळे खरेदी करताना सावध रहा. कोणती फळे खरेदी करावीत हे तपासण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ज्या फळांवर माशा बसतात ती फळं नैसर्गिक पद्धतीने पिकलेली असतात. कारण केमिकलयुक्त फळांवर माशा कधीच बसत नाहीत.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

#BeatTheHeat : उन्हाळ्यातील उष्णतेपासून असं करा स्वतःचं रक्षण

उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी प्या ‘लिंबूपाणी’

Effective Tips & Diet Plan To Reduce Weight In Marathi

वजन कमी करण्यासाठी औषध आणि वेट लॉस डाएट चार्ट

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम  आणि शटरस्टॉक

09 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this