कोरड्या आणि शुष्क त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ होममेड मॉश्चराईझर (Best Moisturizer For Dry Skin In Marathi)

कोरड्या आणि शुष्क त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ होममेड मॉश्चराईझर (Best Moisturizer For Dry Skin In Marathi)

प्रत्येकीलाच मऊ आणि चमकदार त्वचा हवी असते. पण प्रत्येकीची त्वचा ही समान नसते. कोणाची त्वचा नॉर्मल असते तर कोणाची संवेदनशील, कोणाची त्वचा तेलकट असते तर कोणाची कोरडी. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला त्वचेची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. कारण कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला अनेक त्वचा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कोरड्या त्वचेवर नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी असल्यामुळे ती लवकर शुष्क आणि निस्तेज दिसू लागते. शिवाय कोरड्या त्वचेवर पांढरे अथवा काळे डागदेखील लवकर पडतात. कारण त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेवर खाज येते आणि लवकर इनफेक्शनचादेखील त्रास इतर त्वचाप्रकारापेक्षा अधिक असतो. बऱ्याचदा वातावरणात अचानक झालेले बदल, त्वचेची नियमित काळजी न घेणं, अती प्रमाणात साबणाचा वापर करणं, अती गरम पाण्याने अंघोळ करणं अशा अनेक गोष्टींंमुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. कोरड्या त्वचेची सतत काळजी न घेतल्यास ती अधिक खराब दिसू लागते. पांढरट आणि निस्तेज त्वचेमुळे तुमचा चेहरा फ्रेश दिसत नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला कोरड्या त्वचेची काळजी नियमित घेण्यासाठी काही टिप्स आणि स्कीन केअर रुटीन सांगत आहोत. नियमित हे रुटीन फॉलो केलं तर तुमची त्वचादएखील मऊ आणि मुलायम दिसू लागेल.


स्कीन केअर रूटीन


कोरड्या त्वचेसाठी बेस्ट मॉश्चराईझर


होममेड मॉश्चराईझर


कोरड्या त्वचेसाठी आहारात करा असे बदल


कोरड्या त्वचेबाबत असलेले काही प्रश्न


कोरड्या त्वचेसाठी स्कीन केअर रूटीन (Dry Skin Care Routine)


कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टी पाळाव्या लागतात. यासाठी फॉलो करा हे स्कीन केअर रूटीन


क्लिझिंग (Cleansing)


दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमची त्वचा सौम्य क्लिझरने स्वच्छ करा. तुमच्या क्लिझरमध्ये अती प्रमाणात केमिकल्स नाहीत याची दक्षता घ्या. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले होममेड फेसवॉश अथवा कच्चा दूधाने चेहरा स्वच्छ केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. यासह तुम्ही स्वयंपाकघरातील कॉफीचा उपयोगही स्क्रब म्हणून करून घेऊ शकता. कॉफी चे फायदे होतात.


मॉश्चराईझिंग (Moisturising)


%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97


अंघोळ केल्यावर त्वचेला चांगले मॉश्चराईझर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल. अंघोळ केल्यावर त्वचेची छिद्रं मोकळी होतात. ज्यामुळे मॉश्चराईझर त्वचेत लवकर मुरतं. नियमित मॉश्चराईझर लावण्याची सवय केल्यास तुमची त्वचा लवकर कोरडी दिसत नाही. कोरड्या त्वचेवर सुरूकुत्या लवकर निर्माण होतात. त्यामुळे लवकर सुरकुत्या येऊ नयेत असं वाटत असेल तर त्वचेला मॉश्चराईझरने मऊ ठेवा.


वाचा - क्लीन्झर म्हणून गुलाब पाणी


सनस्क्रीन लोशन (Sunscreen Lotion)


कोरड्या त्वचेवर उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे. कारण तसे न केल्यास तुम्हाला सनटॅनचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्वचा समस्या दूर ठेवण्यासाठी घराबाहेर पडण्याआधी कमीतकमी दहा ते पंधरा मिनीटे त्वचेवर सनस्क्रीन लावा. कोरड्या त्वचेसाठी ड्राय स्कीन सनस्क्रीनची निवड करा.


दिवसभर भरपूर पाणी प्या (Drinking Plenty Of Water)


%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE - Best Moisturizer For Dry Skin In Marathi


नियमित पाणी पिण्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. कोरडी त्वचा उन्हाळ्यात फार लवकर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या.


बाजारात विविध प्रकारचे मॉश्चराईझर उपलब्ध असतात. ड्राय, ऑयली, नॉर्मल अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी मॉश्चराईझर तुम्हाला कोणत्याही कॉस्टमॅटिक शॉपमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात.


वाचा - मुरुमांच्या चट्टे म्हणजे काय


कोरड्या त्वचेसाठी बेस्ट मॉश्चराईझर (Best Moisturizer For Dry Skin)


कोरडी त्वचा असेल तर खाली दिलेली हे मॉश्चराईझर क्रीम अथवा लोशन जरूर वापरा.


बायोटिक मॉर्निंग नेक्टर फ्लॉसेस स्कीन लोशन  (Biotique Morning Nectar Flawless Skin Lotion)


%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95 %E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97 %E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0 %E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8 %E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8 %E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B6


बायोटिक मॉर्निंग नेक्टर फ्लॉसेस स्कीन लोशन त्वचेत खोलवर जातं आणि त्वचेचं योग्य पोषण करतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक तेलाचा पुरवठा होतो आणि त्वचा हायड्रेड राहण्यास मदत होते. तुम्ही हे लोशन दररोज वापरू शकता. हे मॉश्चराईझर लावल्याने तुमची त्वचा तेलकट दिसत नाही कारण तुमच्या त्वचेत ते लगेच मुरतं. अंघोळ केल्यावर किंवा चेहरा आणि मान स्वच्छ केल्यावर सकाळी आणि संध्याकाळी हे मॉश्चराईझर तुमच्या त्वचेवर लावू शकता.


निवीया सॉफ्ट मॉश्चराईझिंग क्रीम (Nivea Soft Moisturizing Creme)


%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F %E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97 %E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE


निवीया सॉफ्ट मॉश्चराईझिंग क्रीममध्ये व्हिटॅमिन ई आणि जोजोबा ऑईलचे गुणधर्म आहेत. शिवाय निवीया क्रीमचा सुंगध खूपच छान असतो. उत्पादनावर दिलेल्या माहितीनुसार ही क्रीम डर्मोटोलॉजीस्ट टेस्टेड आहे. सर्वच प्रकारच्या त्वचेवर हे क्रीम योग्य आहे. त्वचेत ते खोलवर मुरतं आणि त्वचेला ताजं ठेवतं. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून जर तुम्ही हे मॉश्चराईझर क्रीम लावलं तर सकाळी तुमचा चेहरा अगदी फ्रेश आणि उजळ दिसू शकतो. सकाळी हे मॉश्चराईझर क्रीम लावल्याने दिवसभर तुमची त्वचा मऊ राहते. हिवाळ्यात संपूर्ण शरीरावर तुम्ही हे क्रीम लावू शकता. हात आणि पायांवर हे क्रीम लावल्याने तुम्हाला अगदी मुलायम त्वचेचा अनुभव मिळु शकतो.


वीएलसीसी हनी मॉश्चराईझर (VLCC Honey Moisturiser)


%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80 %E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9D%E0%A4%B0


या क्रीममध्ये मधाचा वापर केलेला असल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहते. शिवाय व्हिटॅमिन ई, जोजोबा ऑईल, बदाम, ऑलिव्ह ऑईल आणि मेथीच्या गुणधर्मांमुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होते. या क्रीममुळे तुम्हाला सुरकुत्या तर येतंच नाही शिवाय चेहऱ्यावरील काळसरपणाही कमी होतो. हे मॉश्चराईझर लावताना जरी तेलकट वाटलं तरी तं स्कीनमध्ये अगदी पटकन मुरतं. मात्र लक्षात ठेवा हे लावताना ते अगदी थोडीसंच लावा म्हणजे तुम्हाला त्वचा फार तेलकट झाली आहे असं वाटणार नाही. या मॉश्चराईझरमुळे तुमच्या त्वचेवर फार घाम येत नाही. त्यामुळे कोरड्या आणि संवेदनशील त्वचा असल्यास उन्हाळ्यातदेखील हे मॉश्चराईझर तुम्ही नक्कीच वापरू शकता.


वाचा - तेलकट त्वचेसाठी बॉडी लोशन


लोटस कोकोमॉईस्ट - कोको बटर मॉश्चराईझिंग लोशन (Lotus Cocomoist- Cocoa Butter Moisturizing Lotion)


%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B %E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%B0 %E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97 %E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%A8


यातील गुलाबपाणी, कोको बटर, बदाम तेल आणि मध यांच्या गुणधर्मांमुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. हे सर्व पदार्थ कोरड्या त्वचेसाठी फारच उपयुक्त आहेत. शिवाय हे माश्चराईझर तुमच्या त्वचेवर पटकन मुरतं. नियमित या मॉश्चराईझरचा वापर केल्यास तुम्हाला सुंगधित आणि नितळ त्वचा मिळु शकते.


अॅमवे अॅटीट्यूड मॉश्चराईझर (Amway Attitude Moisturiser)


%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%87 %E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1 %E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9D%E0%A4%B0


अॅमवे एटीट्यूड मॉश्चराईझर क्रीममुळे तुमच्या कोरड्या त्वचेला योग्य पोषण मिळते. ही क्रीम खास कोरड्या त्वचेसाठीच तयार करण्यात आली आहे. या मॉश्चराईझरचा हायड्रेडींग फॉर्म्युला तुम्हाला धुळ आणि प्रदूषणापासून दूर ठेवतो. तोंड धुतल्यावर आणि टोन केल्यावर सकाळी अथवा संध्याकाळी तुम्ही या मॉश्चराईझरचा वापर करू शकता.


वाचा - नक्की वापरुन पाहा हे 10 फूट स्क्रब (Best Foot Scrubs In India In Marathi)


लॅक्मे स्कीन ग्लॉस विंटर इंटेन्स मॉश्चराईझर (Lakme Skin Gloss Winter Intense Moisturizer)


या मॉश्चराईझरचं टेक्चर खूपच लाईट आहे. सकाळी एकदाच जर तुम्ही हे मॉश्चराईझर त्वचेवर लावलंत तर दिवसभर तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहू शकते. यासाठी तुम्हाला सतत चेहरा मॉश्चराईझ करण्याची गरज नाही. जर तुम्ही रात्री झोपताना या मॉश्चराईझरचा वापर केला तर तुम्हाला सकाळी फ्रेश आणि सॉफ्ट लुक मिळू शकतो. मात्र ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांनी या मॉश्चराईझरचा वापर करू नये. कारण यामुळे तुमची त्वचा अधिक तेलकट दिसू लागेल.


बाजारात कोरड्या त्वचेसाठी मॉश्चराईझर सहज उपलब्ध असतील तरी काही घरगुती उपचार करूनदेखील तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.


होममेड मॉश्चराईझर (Homemade Moisturizer For Dry Skin)


घरातील दैनंदिन वापरातील खाद्यघटक वापरून तुम्ही होममेड मॉश्चराईझर तयार करू शकता. 


बदामाचे तेल (Almond Oil)


%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2


बदामाच्या अनेक पोषक गुणधर्म असतात. बदामाच्या तेलामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. बदामाचे तेल कोरड्या त्वचेसाठी उत्तम असते. कारण तुमची त्वचा त्यामुळे लवकर मऊ होऊ शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी अंगाला बदामाचे तेल लावा.बदामाचे तेल फार चिकट नसल्यामुळे तुम्ही ते दिवसादेखील अंगाला लावू शकता.


मध (Honey)


%E0%A4%AE%E0%A4%A7 - Best Moisturizer For Dry Skin In Marathi


मध हे अतिशय उत्तम क्लिंझर आणि मॉश्चराईझर आहे. मधाचे वैशिष्ट्य असं की यामुळे तुमची त्वचा मऊ आणि नितळ होते. यासाठी आठ चमचे गुलाबपाण्यात दोन चमचे मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.


लोणी (Homemade Butter)


घरी तयार केलेले लोणी खाण्यासोबत त्वचेवर लावण्यासाठीदेखील चांगले असते. लोण्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने मऊ आणि मुलायम होते. अंघोळीच्या आधी त्वचेला लोणी लावा आणि अर्धा तासाने कोमट पाण्याने अंघोळ करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एक नैसर्गिक चमक येईल.


नारळाचे दूध (Coconut Milk)


%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7


नारळाच्या दूधामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण तर होतंच शिवाय तुमची त्वचा मऊ आणि मुलायमदेखील होते. दररोज सकाळी चेहऱ्यावर नारळाचं दूध लावल्यास दिवसभर तुमची त्वचा फ्रेश राहते.


केळं (Banana)


%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%82


निरोगी शरीरासाठी केळी जितकी परिणामकारक असतात तितकीच ती तुमच्या त्वचेवरदेखील उत्तम असतात. केळं हेदेखील एक नैसर्गिक मॉश्चराईझर आहे. केळ्यामधील व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्समुळे कोरड्या त्वचेवर याचा चांगला परिणाम होतो.


Also Read: Winter Skin Care Tips In Marathi


कोरफड (Aloe Vera)


%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%A1


कोरफड एक उत्तम आयुर्वेदिक वनस्पती आहे. कोरफडीचे त्वचेवर फार परिणाम दिसून येतात. कोरफड लावल्याने त्वचा मुलायम तर होतेच शिवाय त्यावरील डेड स्कीनदेखील निघून जाते. कोरफडीतील अॅंटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा कोरडी पडत नाही.


ग्लिसरिन (Glycerin)


ग्लिसरीनमुळे तुमची त्वचा मऊ राहते. हिवाळ्यात त्वचा मुलायम करण्यासाठी तीन चमचे ग्लिसरीनमध्ये एक छोटा चमचा मध मिसळा. हे मिश्रण नियमित त्वचेला लावल्यास त्चचा कोरडी पडणार नाही. शिवाय त्वचेला उत्तम पोषणदेखील मिळेल.


कोरड्या त्वचेसाठी आहारात करा असे बदल (Make Changes In The Diet For Dry Skin)


%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4


संतुलित आहार आरोग्याप्रमाणेच तुमच्या त्वचेसाठीदेखी  फार महत्वाचा आहे. चुकीचा आहार आणि ताण-तणाव याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. ताणामुळे तुम्ही वयापेक्षा लवकर म्हातारे दिसू लागता. डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील तर आहारात हे आवश्यक बदल जरूर करा. मानवी शरीर सत्तर टक्के पाण्यान तयार झालेले आहे. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी आणि द्रवयुक्त पदार्थांची गरज असते. यासाठी आहारात रसयुक्त फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा ज्यामुळे तुमची त्वचा तजेलदार आणि फ्रेश दिसेल. संत्री फळे, पपई, कलिंगड, टरबूज, द्राक्षे अशी फळे आणि पालक, मेथी, मुळा, लालमाठ अशा पालेभाज्यांचा समावेळ करा.


वाचा - केसांची काळजी कशी घ्यावी


कोरड्या त्वचेबाबत असलेले काही प्रश्न - FAQs


कोरड्या त्वचेची उत्तम काळजी कशी घ्यावी?


मॉईश्चराईज, कमी वेळ आंघोळ किंवा शॉवर आणि सेटेंड साबण टाळा. कोरड्या त्वचेची अनेक कारण आहेत पर्यावरणातील बदल जसं उन्हाळा आणि हिवाळा. जास्त काळ स्विमिंग करणं, शॉवर घेणं किंवा आंघोळ करणं. त्यामुळे हे शक्यतो टाळा. थंड पाण्याने कमीत कमी वेळ आंघोळ करा आणि त्वचेची काळजी घ्या.


कोरडी त्वचेची फक्त हिवाळ्यातच काळजी घेणं गरजेचं आहे का?


असे मुळीच नाही. कारण त्वचा कोरडी पडण्याची समस्या कोणत्याही ऋतूत होऊ शकते. हिवाळ्यात नियमित त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहेच. मात्र जर तुम्ही सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेतली तर हिवाळ्यात तुम्हाला त्वचा कोरडी पडण्याचा त्रास कमी जाणवले. शरीराप्रमाणेच तुमच्या त्वचेलादेखील पोषणाची गरज असते.


कोरड्या त्वचेला खाज का येते ?


कोरड्या त्वचेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. सहाजिकच त्वचेला खाज येते. मात्र त्वचेला खाज येत असेल तर ती जास्त प्रमाणात खाजवू नका. कारण खाजवल्यामुळे त्वचा समस्या अधिक प्रमाणात वाढू शकतात. त्याऐवजी कोरडी त्वचेची जास्त काळजी घ्या. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम दिसेल.


अती गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे काय होतं ?


अती गरम पाण्याने अंघोळ करणं हे नेहमीच चुकीचं असतं. कारण अती गरम पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल मुळापासून काढून टाकलं जातं. त्वचेच्या पोषणासाठी नैसर्गिक तेलाची गरज असते. मात्र तुम्हाला गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी सवय असेल तर कोमट पाणी तुम्ही नक्कीच वापरू शकता. शिवाय अती गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो जे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मुळीच चांगले नाही.


नियमित त्वचेची काळजी घेणं लक्षात ठेवण्यासाठी काय करावे ?


बऱ्याचदा घरात अनेक सौंदर्यउत्पादने असतात. शिवाय घरगुती उपचार करून त्वचेची काळजी घेणं शक्य असतं. मात्र कंटाळा आणि कामाचा व्याप यातून स्किन केअरसाठी वेळ काढला जात नाही. यासाठी दररोज सकाळी अंघोळ केल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला मॉश्चराईझर लावणं विसरू नका. कारण या दोन वेळी तुम्ही जाणिवपूर्वक त्वचेची काळजी नक्कीच घेऊ शकता.


You Might Like These:


तुमच्या तेलकट त्वचेसाठी काय आहेत घरगुती उपाय (Home Remedies For Oily Skin In Marathi)


भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी


जाणून घ्या मॉश्चराईझर अथवा बॉडीलोशनचे इतर फायदे


त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान (Skin Care Tips In Marathi)


केसांच्या वाढीसाठी माहीत असायला हव्यात उत्कृष्ट मसाजच्या पद्धती


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम