ADVERTISEMENT
home / Budget Trips
कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी  ’25’ पर्यटन स्थळं

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं

उन्हाळ्याची सु्ट्टी सुरु झाली की सर्वांना वेध लागतात ते बाहेरगावी फिरायला जाण्याचे. मुंबईतील कडक उन्हापासून कुठेतरी दूर जावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मुलांच्या शाळांना सुट्टी लागल्याने उत्तम हवामान असलेली प्रेक्षणीय घरच्यांना खुणावू लागतात. वेकेशन ट्रीपवर जाण्याची सर्वांनाच इच्छा असते. पण ऑफिसमधून मिळालेल्या मोजक्या दिवसाच्या सुट्टीत आणि कमी बजेटमध्ये नेमकं कुठे जायचं हा प्रश्न फार मोठा असतो. खरंतर कुटुंबासोबत काही दिवस बाहेरगावी गेल्याने सर्वांनाच फ्रेश वाटतं. जर तुम्हाला मनापासून भटकंती करायची असेल तर थोडीशी तडजोड करण्याची तयारी ठेवा. कारण काही सोयीसुविधांबाबत तडजोड केल्यास तुम्हाला भारतातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणं पाहता येऊ शकतात. यासाठीच कमी बजेटमध्ये भारतात नेमके कुठे कुठे जाता येईल याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. ही भारतातील अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही अगदी दहा ते पंधरा हजाराच्या बजेटमध्ये जाऊ शकता. त्यामुळे कमी बजेटमध्ये देखील तुम्हाला भारतातील निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद लुटता येऊ शकतो. या बजेटमध्ये येण्या-जाण्याचा खर्च समाविष्ठ केलेला नाही. कारण तुम्ही येण्या-जाण्यासाठी कोणता मार्ग आणि कोणता पर्याय निवडता यावर तो खर्च अवलंबून आहे. जर तुम्ही यासाठी रेल्वे अथवा विमानाचे आधीच बुकींग केले तर तुमचा खर्च वाढणार नाही हे मात्र खरं. त्यामुळे येण्या-जाण्यासाठी तुमच्या बजेटनुसार साधने आणि मार्ग निवडा आणि भारतातील या अप्रतिम पर्यटन स्थळांना भेट द्या.

1. पॉडेंचरी  (Puducherry)

aurobindo-ashram pondechary

पॉंडेचरी हे ठिकाण फ्रेंच आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. या पर्यटन स्थळी राहण्याचा खर्च जास्त नक्कीच नाही. कारण पॉंडेचरीमध्ये असे अनेक आश्रम आहेत. जिथे तुम्ही अगदी कमी खर्चात राहू शकता. त्यामुळे या ठिकाणी अगदी दहा हजारांमध्येही तुम्ही दोन-चार दिवस तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच राहू शकता. पॉंडेचरीमधील शांतता आणि स्वच्छता तुम्हाला एखाद्या फ्रेंच सिटीत गेल्याचा अनुभव देऊ शकते. त्यामुळे या सुट्टीत बॅग उचला आणि पॉंडेचरीला जाण्याचा बेत आखा.

2.मॅकलॉडगंज (Mcleodganj)

mcleodganj

ADVERTISEMENT

हिमाचलप्रदेशला निसर्गाने खास सौंदर्य बहाल केलं आहे. मॅकलॉडगंड हिमाचल प्रदेशच्या उंचच उंच पर्वत रांगांमध्ये वसलेलं आहे. निसर्गसौंदर्यासोबतच प्राचीन मंदिरे, थंड पाण्याचे झरे आणि ट्रेकिंग ही इथली खासित आहे. यासोबत या ठिकाणी भेट देणं फार खर्चिक मुळीच नाही. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दहा हजाराच्या बजेटमध्ये अगदी मजेत दोन ते चार दिवस या ठिकाणी  राहू शकता. येथील भाग्शू फॉल्स, शिवा कॅफे, नाइट कॅंपिग आणि त्रिउंट ट्रेकिंग लोकप्रिय आहेत.

3.गोवा (Goa)

goa-beach

जर तुम्हाला अगदी कमी खर्चात फिरायला जायचे असेल तर गोवादेखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. गोव्यात अत्यंत कमी दरात तुम्हाला होम स्टे अथवा हॉटेलची सोय उपलब्ध होऊ शकते. शिवाय गोव्यात फिरण्यासाठी स्कुटर अथवा गाडी भाड्याने मिळते. ज्यामुळे दोन ते चार दिवस समुद्रकिनारी मुलांसोबत तुम्ही नक्कीच सुटीचा आनंद घेऊ शकता. शिवाय गोव्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे अगदी कमी बजेटमध्ये तुमची एक छान ट्रिप होऊ शकते.  

वाचा – महाराष्ट्रातील 15 प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे

ADVERTISEMENT

4.कॅसोल (Kasol)

kasol

हिमाचल प्रदेशमधील या छोटयाशा गावाला मिनी इजरायली असं देखील म्हणतात. कॅसोलमध्ये उंच डोंगरांवर ट्रेकिंग करण्याची संधी तुम्हाला मिळू शकत. इथल्या पार्वती वॅली, तोष घाटीमध्ये सायंकाळी फिरण्याचा आनंद सुखद असू शकतो. शिवाय या ठिकाणी खीरगंगा येथील गरम पाण्याचे झरे आणि पांडव मंदिर प्रसिद्ध आहेत. अगदी कमी खर्चात जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला जरूर भेट द्या.

5.लेंसडाऊन  (Lansdowne)

lansdowne

लेंसडाऊन हे उत्तराखंडमधील एक सुंदर हिलस्टेशन आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं हे शहर तुमच्या मनाला नक्कीच भुरळ घालू शकतं. बर्फाच्छित पर्वतरांगा, प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी हे शहर अगदी उत्तम आहे. या ठिकाणी वॉर मेमोरिअल, टिप इन टॉप पॉईंट,भुल्ला ताल, कालागढ वाईल्ड सेंचुरीला भेट देऊ शकता. त्यामुळे अगदी स्वस्तात विकएंड घालवण्यासाठी हे हिलस्टेशन अगदी मस्त आहे.

ADVERTISEMENT

6.वृंदावन (Vrindavan)

prem-mandir-vrindavan

भगवान कृष्णाचं जन्मस्थान असल्याने वृंदावन लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही धार्मिक वृत्तीचे असाल तर कुंटुबासोबत जाण्यासाठी हे ठिकाणी अगदी छान आहे. अगदी स्वस्तात ट्रस्टच्या रूम्स मिळू शकतात. या ठिकाणी प्रार्थना आणि नामस्मरणामुळे तुम्हाला नेहमीच्या धावपळीतून दूर मन शांत करणारा अनुभव मिळू शकतो. इथली विलक्षण शांतता आणि अध्यात्मिक वातावरण तुम्हाला नक्कीच भारावून टाकेल.

7.आग्रा (Agra) 

agra

जगातील सात आश्चर्यापैकी एक ताजमहल पाहण्याची इच्छा असेल तर आग्राला जरूर भेट द्या. या ठिकाणी एक ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. आग्रात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे रोजच्या धकाधकीपासून दूर कमी बजेटमध्ये फिरायला जाण्यासाठी आग्रा एक उत्तम पर्याय असू शकेल.

ADVERTISEMENT

8.वाराणसी (Varanasi)

varanasi

वाराणसी जगातील एक प्राचीन शहर असून ते भदवान शंकराची भूमी या नावाने प्रसिद्ध आहे. असं म्हणतात या ठिकाणी येणाऱ्यांना पुण्याची प्राप्ती होते. काशी विश्वनाथाचे मंदिर, गंगाघाट अशी अनेक धार्मिक स्थळं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शिवाय या ठिकाणी राहणं मुळीच खर्चिक नाही.

9.कन्याकुमारी (Kanyakumari)

kanyakumari

Also Read: 10 Offbeat Places In Maharashtra In Marathi

ADVERTISEMENT

दक्षिण भारतातील कन्याकुमारी हे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. या ठिकाणी तिन समुद्रांचा संगम झालेला आहे. विवेकांनंद रॉक मेमोरिअलवरदेखील तुम्हाला निसर्गाच्या पंचमहाभूतांचा अनोखा अनुभव घेता येऊ शकतो. भारतात कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी कन्याकुमारी एक मस्त पर्याय आहे. थोडं जास्तीचं बजेट आणि सुट्टी असेल तर कन्याकुमारीहून तुम्ही केरळमध्ये जाण्याचा विचारदेखील करू शकता. नाहीतर एक ते दोन दिवसासांठी कन्याकुमारीला कमी पैशात फिरण्याचा आनंद लुटा.

10. ऋषीकेश (Rishikesh)

rishikesh

जर तुमच्याकडे फिरण्यासाठी तीन-चार दिवस असतील तर तुम्ही ऋषीकेशला अवश्य जा. हरिद्वार, डेहराडून आणि मसुरी असे तुम्ही या दिवसात फिरू शकता. धार्मिक स्थळांमुळे तुम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी कमी पैशात आणि सहज सोय होऊ शकते.

11. बिंसर (Binsar)

binsar

ADVERTISEMENT

जर तुम्हाला धार्मिक स्थळासोबत जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर भारतातील बिंसर या हिलस्टेशनला नक्की जा. कारण या ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला जास्त बजेटची गरज नाही.

12. हम्पी (Hampi)

hampi

कर्नाटकमधील हम्पीदेखील सुट्टीत जाण्यासाठी एक चांगले पर्यटन स्थळ असू शकते. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ जुनी स्मारके, मंदिरे यांनी समृद्ध आहे. या ठिकाणी स्वस्त दरात हॉटेल्स उपलब्ध असल्यामुळे कुटुंबासोबत दोन ते तीन दिवस या शहरात राहण्यासाठी तुम्हाला दहा हजारांपेक्षा कमी  येऊ शकते.

13. अमृतसर (Amritsar)

पंजाबमधील सुवर्णमंदीरात जाणे  एक मन शांत करणारा अनुभव असू शकतो. मनाला शांतता आणि आनंद देणाऱ्या या ठिकाणी अगदी विनामुल्य राहण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय या ठिकाणी लंगरमध्ये तुम्हाला स्वादिष्ट भोजनदेखील मिळू शकतं. अमृतसरमध्ये वाघा बॉर्डर परेड पाहण्याचा आनंद लुटा. अमृतसरमध्ये गेल्यावर तुमच्यासाठी एखादा मस्त पंजाबी सूट घ्यायला मात्र मुळीच विसरू नका.

ADVERTISEMENT

14. माउंट अबू

mount-abu

उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्यासाठी राजस्थानमधील हे एकमेव हिलस्टेशन तुम्हाला नक्कीच खुणावू शकते. माउंट अबूमधील वातावरण नेहमीच मनमोहक असते. या ठिकाणी डोंगरदऱ्या आणि दिलवाडा मंदिर आणि त्याची रचना तुम्हाला नक्कीच आवडेल. कुंटुंबासोबत कमी बजेटमध्ये एक ते दोन  दिवस तुम्ही माऊंट अबूमध्ये आरामात राहू शकता.

जर तुमचं बजेट दहा हजारांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता.

15. जयपूर  (Jaipur)

jaipur

ADVERTISEMENT

राजस्थानची राजधानी आणि पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं जयपूर कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. पण जर जयपूरचा शाही थाट अनुभवयाचा असेल तर बजेट थोडं वाढू शकतं. जयपूरमध्ये राजवाडे, प्राणीसंग्रहालय, म्युझियम, गार्डन, मंदिरं अशा अनेक ठिकाणांचा तुम्ही आनंद लुटू शकता. जयपूरमध्ये गेल्यावर राजमंदिर या प्रसिद्ध सिनेमागृहात चित्रपट पहायला मिळुच विसरू नका. आणि हो, जयपूरमधील स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद जरूर घ्या.

16. उटी  (Ooty)

कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या सीमेवर असलेलं एक सुंदर शहर म्हणजे उटी. मनाला मोहवणाऱ्या उंचच उंच पर्वतांच्या कुशीत वसलेलं हे शहरात राहणं फार खर्चिक नाही. उटीमधील होममेड चॉकलेट खूप प्रसिद्ध आहे. शिवाय सुट्टीत कुंटुबासोबत दोन-चार दिवस घालविण्यासाठी उटी अगदी  परफेक्ट आहे.

16. उदयपूर (Udaipur)

udaipur

राजस्थान हे राज्य इतकं मोठं आहे की आठ ते दहा दिवसात ते फिरणं मुळीच शक्य नाही. त्यामुळे दोन-चार दिवस राजस्थानमधील विविध शहरं फिरणं सोयीचं ठरेल. राजस्थानच्या उदयपूरला तुम्ही कमी बजेटमध्ये नक्कीच भेट देऊ शकता. उदयपूरमध्ये तुम्हाला राजस्थानच्या शाही जीवनशैलीचा अनुभव घेता येऊ शकतो. उदयपूरमधील सिटी पॅलेस, लेक पिचोला, जगदिश मंदिर अशी अनेक ठिकाणं तुम्ही दोन ते तीन दिवसात फिरू शकता.

ADVERTISEMENT

17.मेघालय (Meghalaya)

shillong

जर तुम्ही कधीच नॉर्थ इस्टला प्रवास केला नसेल तर या सुट्टीत मेघालयला जाण्याचा बेत आखा. मेघालय भारताच्या उत्तरेचं एक सुंदर शहर आहे. मेघालयातील शिलॉंगमधील झरे आणि डोंगररांगा तुमच्या मनाला नक्कीच भुरळ घालतील.

18. श्रीनगर  (Srinagar)

काश्मीरनधील श्रीनगरला भेट देणं हा एक स्वर्गीय अनुभव असू शकतो. श्रीनगरचे अदभूत सौंदर्य तुमच्या स्वागतासाठी सदैव तयार आहे. डलझील, शालीमार बाग, परीमहल, ट्युलिप गार्डन पाहण्यासाठी या सुट्टीत श्रीनगरला जरूर जा. कारण कुंटुबासोबत दोन-चार दिवस राहणं फार महाग नाही.

19. केरळ (Kerala)

kerala

ADVERTISEMENT

केरळला देवभूमी म्हटलं जातं. केरळ फिरण्यासाठी भरपूर पैसे आणि आठभराची सुट्टी गरजेची असली तरी केरळच्या काही शहरांना तुम्ही शॉर्ट टूरने भेट देऊ शकता. कन्याकुमारी पासून कोचिन पर्यंतचं तुमचं एखादं आवडतं शहर निवडा आणि दोन-चार दिवस भटकून या. केरळचे मसाले, केळ्याचे वेफर्स, सिल्कच्या साड्या यांची शॉपिंग करायला मुळीच विसरू नका.

20. लडाख (Ladakh)

ladakh

लडाख बाईकवरून फिरणं म्हणजे अगदी स्वर्ग सुख. कॅंपिंग आणि वॉटर राफ्टिंगसाठी लडाखला जरूर जा. मात्र विमानाने लडाखला  जाणार असाल तर अचानक होणारा वातावरणातील बदल सहन करण्याची तयारी ठेवा. हा बदल सहन करण्यासाठी एक दिवस आरामासाठी जरूर ठेवा. यंदाच्या सुट्टीत चार दिवस लडाखला तुमच्या कुंटुंबासोबत जरुर जा. आधीच विमानाचं तिकीट बुक केलं असेल तर लडाखला जाण्याचा खर्च फार होणार नाही.  

21. गंगटोक (Gangtok)

gangtok

ADVERTISEMENT

हिमालयाच्या पर्वतरांगा भटकण्यासाठी या सुट्टीत सिक्कीमची राजधानी गंगटोकला जरूर जा. गंगटोकचे तलाव, धबधबे तुमच्या मनाला प्रसन्न करतील गंगटोकमध्ये तुम्ही मनसोक्त शॉपिंगदेखील करू शकता. शिवाय गंगटोक पर्यटन तुमच्या बजेटमध्ये देखील आहे.

22. कच्छ (Kutch)

kutch

गुजरातमध्ये फिरण्याची इच्छा असेल तर यावर्षी कच्छला भेट द्या. कच्छमध्ये नऊशे गावे आहेत. त्यामुळे तुम्हाला कमी खर्चात गुजरातमध्ये  फिरण्याचा आनंद लुटता येईल.

23. हॅवलॉक आयलंड (Havelock Island)

अंदमान मधील हे बेट अंडरवॉटर एडवेंचरसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रीजीवनाचे अदभूत दर्शन तुम्हाला नक्कीच घडू शकते. समुद्र किनारे आणि बेट तुम्हाला जरूर आवडेल. तेव्हा यंदाच्या सुट्टीत अंदमानला फिरायला जायला काहिच हरकत नाही.

ADVERTISEMENT

24. मनाली (Manali)

हिमालयातील डोंगररांगामध्ये फिरणं तसं फार महाग मुळीच नाही मात्र जर तुम्हाला थोडी लॅव्हिश ट्रिप हवी असेल तर हिमाचलच्या मनालीला भेट द्या. थोडं बजेट वाढू शकतं. मात्र मुंबईच्या उकाड्यातून जरा दूर थंडगार विश्रांती घेण्यासाठी  मनाली अगदी परफेक्ट आहे.

25. कोडाइकनाल  (Kodaikanal)

दक्षिण भारतातील अनेक पर्यटनस्थळं खरंच खूप सुंदर आहेत. तमिळनाडूतील कोडाइकनाल हिलस्टेशनला यंदा अवश्य भेट द्या. कमी बजेटमध्ये दोन ते दिवस तुम्हाला अगदी सुंदर ठिकाणी आल्याचा अनुभव घेता येऊ शकतो.

आम्ही सूचवलेल्या या पंचवीस पर्यटन स्थळांपैकी तुम्ही कोणत्या ठिकाणाची निवड केली आणि तुमच्या वेकेशनचा अनुभव कसा होता हे आम्हाला जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT
22 Apr 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT