ब्रेकअपसाठी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेट्स (Breakup Status In Marathi)

ब्रेकअपसाठी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेट्स (Breakup Status In Marathi)

प्रेमात पडल्यावर ‘ब्रेकअप’ हा शब्ददेखील नकोसा वाटतो. पण जर काही कारणाने 'ब्रेकअप' झालाच तर ते दुःख पचवणं मुळीच सोपं नसतं. प्रेमभंगामुळे मन आपोआप एका कोषात जाऊ लागतं. वास्तविक ब्रेकअप अचानक कधीच होत नाही. अनेक घटना त्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे नात्यामध्ये प्रेम, स्पष्टता आणि विश्वास असेल तर नात्यात पटकन कडूपणा येत नाही. फार फार तर छोटी-मोठी भांडणं प्रेमात होऊ शकतात जी पुन्हा तुम्हाला एकत्र नक्कीच आणतात. प्रेमामध्ये अशी भांडणं प्रेम आणखी बळकट करण्यासाठी गरजेही असतात. कारण त्यामुळे तुम्हाला एकमेकांचे महत्व समजते. पण कधी कधी काही नाती मुळातच अविश्वास आणि संशयाच्या धाग्यावर बांधलेली असतात जी अगदी काहीच कारण नसताना सहज तुटतात. त्यामुळे तुमचं समोरच्यावर कितीही प्रेम असलं तरी जर ब्रेकअप करणं अपरिहार्य असेल तर एकत्र राहण्यात काहीच उपयोग नाही हे लक्षात ठेवा. नातं हे गरजेचं नसावं तर त्या नात्याची तितकीच गरज असायला हवी. त्यामुळे कधी कधी अशा नात्यात ब्रेक-अप करणं चांगलंदेखील असू शकतं.


ब्रेकअपनंतर होणारा त्रास


ब्रेकअपचा त्रास कमी करण्यासाठी काय कराल


ब्रेकअपमध्येही हसवतील असे काही सोशल मीडिया स्टेट्स


ब्रेक अप सोशल मीडिया स्टेट्स साठी


Breakup Status In Marathi


ब्रेकअपचं कारण काहीही असलं तरी कोणत्याही रोमॅंटिक रिलेशनशिपचा अंत हा त्या दोघांच्यांही मन, शरीर आणि नातेसंबधांसाठी त्रासदायकच असतो. चुक कोणाचीही असली तरी त्रास मात्र दोघांनाही सारखाच होतो. त्यामुळे जीवापाड प्रेम असलेल्या व्यक्तीपासून दूर जाणं हे सोपं नक्कीच सोपं नसतं. ब्रेकअप झाल्यावर काहीच नकोसं वाटू लागतं अगदी हे जग आणि जगणं दोन्ही गोष्टी कठीण होऊन बसतात. मनातील कडू भावना इतक्या तीव्र झालेल्या असतात की आयुष्यात पुन्हा सगळं काही नॉर्मल होईल असं वाटत देखील नाही. मनातील राग, उद्रेक नको त्या ठिकाणी नको त्या मार्गाने बाहेर पडू लागतो.


तसेच मराठी मध्ये बेस्ट अ‍ॅटिट्यूड स्टेटस वाचा


म्हणूनच कितीही प्रेम असलं आणि विरहाचं कितीही दुःखी झालं तरी एखादं नातं तुटल्यावर तिथे फार काळ रेंगाळत राहू नये. मनाला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ देणं ठिक आहे मात्र त्यासाठी संपूर्ण आयुष्य उधवस्त करू नये. चुकीच्या लोकांची वाट पाहण्यापेक्षा आणि चुकीच्या लोकांसाठी जीवन उधवस्त करण्यापेक्षा जीवनात पुढे जाणं हे नेहमीच चागलं. शिवाय तुमचे आई-वडील, मित्रमंडळी अशी अनेक माणसं तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असतात. त्यामुळे एका चुकीच्या माणसासाठी तुमची दुसरी प्रेमाची नाती दाव्याला बांधू नका. आणि जर तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम असेल तर ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा नक्कीच येईल हा विश्वास ठेवा. कारण जर तुमच्यात काही गैरसमज झाले असतील अथवा इतर काही समस्या असेल तर वेळ त्यावर एक उत्तम उपाय ठरेल. दूर गेल्यामुळे तुम्हा दोघांना एकमेकांचे महत्व समजेल आणि तुम्ही पुन्ही एकत्र याल. पण यासाठी ती व्यक्ती तुमच्यासाठी खरंच योग्य आहे का हे तपासण्यासाठी थोडा वेळ घ्या. समोरच्या व्यक्तीला तुमची काहीच किंमत नसेल तर अशा चुकीच्या व्यक्तीसाठी स्वतःचे जीवन व्यर्थ घालवू नका.


%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA %E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8


यासाठीच ब्रेकअपचे दुष्परिणाम आणि त्यातून कसं बाहेर पडायचं  हे जरूर वाचा (How To Overcome Breakup)


ब्रेकअपचा काळ जीवनातील फारच कठीण काळ असतो. मात्र यातून बाहेर नक्कीच शक्य आहे. यासाठी या टीप्स जरूर वाचा.


ब्रेकअपनंतर होणारा त्रास (After Efffects Of A Breakup) 


 • ब्रेकअपचा परिणाम तुमच्या मनावर आणि पर्यांनाने शरीरावर होऊ लागतो.

 • रात्रीची शांत झोप लागत नाही. वेळेवर लक्ष न दिल्यास पुढे यामुळे तुम्हाला निद्रानाशाची समस्या निर्माण होते.

 • भुक लागत नाही. न खाण्याने तुमचे वजन आपोआप कमी होऊ लागते.

 • मन नकारात्मक विचारांनी भरते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होतो.

 • जीवन जगण्यातील रस कमी झाल्यामुळे तुम्हाला कोणतीही नवीन गोष्ट करावी असे वाटत नाही.

 • तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवण्यास मन धजावत नाही.

 • अभ्यासात अथवा कामात मन न लागल्याने करिअरवर चुकीचा परिणाम होतो.

 • रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.

 • स्वतःकडे दुर्लक्ष होते.

 • नाकारले गेल्याची भावना मनात दृढ झाल्यामुळे नवीन नाती निर्माण करण्याचा विश्वास कमी होतो.


ब्रेकअपचा त्रास कमी करण्यासाठी काय कराल (Ways To Get Over A Breakup)


 • सुट्टी काढून मित्रमंडळी अथवा कुटुंबासोबत बाहेरगावी फिरायला जा

 • नियमित व्यायाम आणि मेडीटेशन करा

 • भुक नाही लागली तरी नियमित नास्ता, जेवण करण्याचा कंटाळा करू नका

 • पार्लर अथवा स्पामध्ये जाऊन मसाज करून घ्या ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल

 • नवीन ओळखी वाढवा, लोकांमध्ये मिसळा.

 • नवीन गोष्ट अथवा छंद शिका ज्यामुळे तुमचे मन त्यात रमेल.

 • चॉकलेट अथवा गोड पदार्थ खा

 • स्वतःला ग्रूम करा. ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होईल.


ब्रेक अप झाल्यावर तुम्हाला मित्रमंडळी अनेक सल्ले देतील किंवा तुम्ही तुमच्याच मनाने काहीतरी निर्णय घ्याल. मात्र आम्ही तुम्हाला कोणताही सल्ला न देता तुमच्या भावनांचा आदर करत तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची वाट दाखवत आहोत. कारण तुम्हाला मिळालेला माणसाचा जन्म हा अनमोल आहे. तो अशा फुटकळ गोष्टींमध्ये व्यर्थ घालवू नका. ब्रेकअपचं दुःख विसरण्याचा सोपा मार्ग म्हणजे मनातील भावनांना मुक्त करा ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात मुव्ह ऑन होण्यासाठी मदत होईल. यासाठी तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीजवळ तुमचे मन मोकळे करा अथवा सोशल मीडियावर ब्रेकअप स्टेटस टाकून तुमचे ब्रेक अप जगजाहीर करा ज्यामुळे तुम्हाला इतरांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार नाही.


%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA - Breakup Status In Marathi


वाचा - ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आहे या गोष्टींंची गरज 


ब्रेकअपमध्येही हसवतील असे काही सोशल मीडिया स्टेट्स (Funny Breakup Status)


काही सोशल मीडिया स्टेटस तुम्हाला या त्रासातून पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मदत करू शकतात.


1. सोडून जायचं होतं तर… सांगून जायचं ना पागल. तुला हसत हसत सोडलं असतं.


2. का कोणासाठी झुरायचं, स्वतःसाठी जगायचं आणि आयुष्य मस्त Enjoy करायचं


3. मी कोणाला आवडो ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत कारण...ज्यांना आवडतो त्यांच्या ह्रदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो


4. तुझ्या भावना जर आधी, माहीत असत्या तर.. तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो


5. कृपया प्रेमाच्या नावाखाली तुमचे करिअरपणाला लावू नका कारण...प्रेम वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे.


6. कधी ये फुरसत काढून तुझ्याकडे तुझ्याच ‘शिकायती’ करायच्या आहेत


7. ही दुनियाच वेगळी आहे इथे एकाला विसरण्यासाठी दुसऱ्याची साथ घ्यावी लागते


8. तू अजुनही त्या फालतू आशेवर आहेस की कधीतरी मी परत येईन


9. सोडून जायचे असेल तर बिदांस जा… पण लक्षात ठेव,मागे बघायची सवय मला पण नाही.


10. कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका, पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमवू नका.


11. प्रेम कधीच चुकीचे कधीच नसते, कदाचित चुकीची असू शकते.


12. तुझ्या चेहऱ्यावर रंग एक दिवस नक्की बदलणार, जेव्हा तुझ्या आयुष्यात प्रेम करायला कुणीच नाही उरणार


13. हल्ली लोक खूप मतलबी झाले आहेत, आवड बदलली की निवडही बदलतात.


14. तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता, तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता आणि मला तुझ्यासोबत  आयुष्य


15. वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते, पण एवढं लक्षात ठेव आज तू मला विसरलीस उद्या तुला कोणीतरी विसलेल


Love Poem In Marathi


ब्रेक अप सोशल मीडिया स्टेट्स साठी...(Breakup Status For Whatsapp And Facebook)


चारोळ्या आणि कवितांमधून तुम्ही तुमच्या मनातील भावनांना वाट करून देऊ शकता. 


1. चुकलेलो मी आहे की चुकीची वेळ आहे


जवळची व्यक्ती आज दूर का जात आहे


2. डोळे भरून आले की


तुझं रूप दिसायला लागतं


छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी


हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं.


3. ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे


तरी तुझं मन तुझी वाट पाहणं सोडत नाही


मी हि म्हणते जाऊ दे


मी त्याचं मन मोडत नाही


4. तुझ्यापासून दूर राहणे


किती कठीण आहे आता कळंतय मला


प्रेमातला दुरावा काय असतो


हे आता जाणवतंय मला


5. तु माझी न झाल्याने


तुझ्यावर मी चिडलो होतो


म्हणुन आहेर न देताच


मी तुझ्या लग्नात जेवलो होतो


6. तुझ्यावर प्रेम आहे हे


तुला सांगायचं राहिलं


हे सांगायच्या आधीच


तुला दुसऱ्याबरोबर फिरताना  पाहिलं


7. तुझ्यासाठी आणलेलं


गुलाबाचं लाल फुल


माझ्या हातातच राहिलं


कारण दुसऱ्या कुणी दिलेलं


गुलाबाचं लाल फुल


तुझ्या हातात पाहिलं


8. मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे


छळावे स्वतःला निखारे क्षणाचे व्हावे


जडे जीव ज्याचा


ज्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे


9. कितीही म्हटलं तरी


मला तितकसं व्यवहारी वागता येत नाही


आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं


या चातकाला व्याज मागता येत नाही


10. सख्या रे काय सांगू तुला


जीव माझाच मजवरी उधार झाला


या वेड्या सखीने तर तो ही


मजपासुनी दुर गेला


11. मनातले त्याला कळते असते


तर शब्द जोडावे लागले नसते


शब्द जोडता जोडता जग


सोडावे लागले नसते


12. नाही कळलं प्रेम तुला


मी शब्दातुन मांडलेलं


भावनेचे ते विलक्षण मोती


माझ्या ह्रदयातून सांडलेले


13. नजरेने जरी ओळखलंस तू


शब्दांनी मी बोलणार नाही


तुझ्या माझ्या आयुष्यात


नसती वादळं आणणार नाही


14. मन तुटलं की त्याचा आवाज होत नाही, तुटलेल्या मनाचे तुकडे वेचायला कोरडं मनही धजावत नाही


15. चेहऱ्यावर नेहमीच हसु, पण मनात खुप काही साठलेलं, आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.


ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी


प्रेमभंग कविता (Love Poem In Marathi)


प्रेमभंगावर आजवर अनेक कविता लिहील्या गेल्या आहेत त्यापैकी एक खास कविता तुमच्यासाठी शेअर करत आहोत.


असेन मी नसेन मी


असेन मी नसेन मी


आता वाटणारी माझी बडबड


मी गेल्यावर येईल तुलाच शांतता छळायला


तुझ्याकडे एक एक क्षण मागून


साठवून ठेवणारी मी


त्या एक एक क्षणालाच मुकशील तू


आहे मी तोपर्यंत समजून घेईनच


नसताना मी कोणावर गाजवशील हक्क?


असेन मी नसेन मी


ठेव साठवून असेपर्यंत माझं अस्तित्व


तुझ्या आठवणीत आणि तुझ्या श्वासात


वेळ नाही येत सांगून


माझा बावळटपणा अल्लडपणा आता टोचेल तुला


पण नसताना मी हाच असेल तुझ्या जगण्याचा आधार


डोळ्यात मनात श्वासात घे साठवून आणि सामावून


असेन मी नसेन मी


-दिपाली नाफडे


सेलिब्रेटीजच्या आयुष्यातदेखील सतत अफेअर आणि ब्रेकअप होत असतात नुकतच सेलिब्रेटी नेहा कक्कर हिचं ब्रेकअप झालं. तेव्हा या ते दुःख कुरवाळत न बसता तिने चक्क एक गाणं गाऊन तिच्या भावना मोकळ्या केल्या.

Subscribe to POPxoTV

यासोबतच ब्रेकअप झाल्यावर पाहा ‘या’ 45 मूव्हीज


आम्ही तुम्हाला तुमच्या मनातील कडवट भावना मोकळ्या करण्यााठी काही उपाय सांगितले आहेत. ब्रेकअपची फेज कितीही त्रासदायक असली तरी त्यातून बाहेर येणं नक्कीच शक्य आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यातून बाहेर पडा आणि मस्त रहा. जीवन हे खूप सुंदर आणि चांगल्या गोष्टींनी भरलेले आहे. जीवन आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला तुमचे मन बळकट करण्यासाठी गरज आहे. हेच जीवन आहे तेव्हा तणावमुक्त व्हा आणि जगण्याचा आनंद घ्या.


सौजन्य- या लेखात वापरण्यात आलेल्या कविता, चारोळ्या चंद्रशेखर गोखले  आणि काही नवोदित कवींच्या आहेत.


You Might Like This:


एकटेपणात आधार देतील असे कोट्स आणि स्टेटस (Alone Quotes In Marathi)