ADVERTISEMENT
home / Nail Care
ब्राईट नेलपॉलिशचा नवा ट्रेंड, तुम्ही वापरले आहेत का हे रंग

ब्राईट नेलपॉलिशचा नवा ट्रेंड, तुम्ही वापरले आहेत का हे रंग

आपल्या सगळ्यांना वाटतं की, आपले हात आणि नखं नेहमी सुंदर दिसावीत. त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन मेनिक्युअर करून घेतो तर कधी घरच्या घरी आपल्या नखांची आणि हातांची काळजी घेऊन सुंदर करतो. हात सुंदर दिसण्यामध्ये सर्वात मोठा भाग हा आपल्या नखांचा असतो आणि नखं सुंदर नक्की कशामुळे दिसतात? तर त्याला लावलेल्या नेलपॉलिशच्या रंगामुळे. प्रत्येकाच्या हाताला गुलाबी अथवा लाल रंगाचं नेलपेंट नक्कीच चांगलं दिसतं आणि सर्व प्रकारच्या कपड्यांबरोबर ते सूटदेखील होतं. खरं तर हेच रंग जास्त प्रमाणात वापरले जातात. पण आता फॅशनचा बदलता ट्रेंड पाहिला तर लाल आणि गुलाबी रंग नक्कीच मागे पडले आहेत असं म्हणावं लागेल. आजकाल ब्राईट आणि निऑन कलर्सना जास्त मागणी आहे. त्यामुळे सध्या हेच रंग ट्रेंड्समध्ये आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही विविध रंगाच्या आजकाल ट्रेंड्समध्ये असलेल्या नेलपॉलिशबद्दल सांगणार आहोत. तुम्हीदेखील हे रंग वापरून पाहा.

ऑरेंज नेलपेंट

Orange

उन्हाळ्यात कूल दिसण्यासाठी ऑरेंंज अर्थात भगवा रंग उत्कृष्ट आहे. आजकाल टीनएजर्समध्ये हा रंग खूपच प्रसिद्ध आहे. याची ब्राईट शेड हाताच्या सौंदर्यामध्ये नक्कीच भर घालते. जर तुम्ही आतापर्यंत या रंगाच्या नेलपॉलिशचा उपयोग कधी केला नसेल तर आजच तुमच्या मेकअप किटमध्ये याचा समावेश करून घ्या.

ब्राइट यलो नेलपेंट

bright yellow

ADVERTISEMENT

ऑरेंजप्रमाणेच यलो अर्थात गडद पिवळा रंगदेखील तरूणाईमध्ये लोकप्रिय आहे. तसं तर आजकाल आऊटफिट्समध्ये समर यलो अथवा मस्टर्ड यलोची चलती आहे. त्यामुळे अशा आऊटफिट्सवर तुम्ही तुमच्या नखांना या रंगाने रंगवलतं तर त्याचं सौंदर्य अजून वाढेल यात शंका नाही.

निऑन ग्रीन नेलपेंट

Neon Green

निऑन कलर्स जेव्हापासून बाजारामध्ये आले आहेत तेव्हापासूनच हे रंग ट्रेंडमध्ये आहेत. त्यामध्येही सर्वात जास्त आकर्षून घेणारा रंग म्हणजे निओन ग्रीन (हिरवा). हा रंग तरूणाईमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तुम्ही एखाद्या पार्टी अथवा कार्यक्रमाला जात असाल, तर हा रंग नक्कीच तुमच्या नखांना लाऊन पाहा. तुमचा लुक एकदम वेगळा होतो. शिवाय हा रंग असा आहे की, त्याकडे दुर्लक्ष करणं समोरच्या माणसाला शक्यच नाही.

Also Read: Nail Designs In Marathi

ADVERTISEMENT

मिंट ब्लू नेलपेंट

mint blue

हा रंग दिसायला अगदी लाईट आणि सॉफ्ट आहे. पण जेव्हा पूल पार्टी अथवा बीच पार्टी असते. तेव्हा या रंगाचा वापर करणं नक्कीच चांगलं. .तुमचा हात जर थोडा सावळा अथवा डस्की असेल तर हा रंग तुमच्या त्वचेवर उठून दिसतो. त्यामुळे एखाद्या पार्टीला जाताना हा रंग तुम्ही नक्की तुमच्या नखांवर लाऊन पाहा.

ब्लॅक नेलपेंट

Black

सर्वात महत्त्वाचा आणि सर्वच मुलींचा आवडता रंग म्हणजे ब्लॅक अर्थात काळा. कोणत्याही आऊटफिट्सवर उत्कृष्ट दिसणारा रंग म्हणजे काळा रंग. तुम्ही जर गोऱ्या रंगाचे असाल तर तुमच्या हातावर हा रंग खूपच स्टायलिश वाटतो. पण त्याचा अर्थ असा नाही की, सावळ्या रंगाच्या व्यक्तींना हा रंग शोभून दिसत नाही. तर तसं नाही काळ्या रंगाचं नेलपेंट हे प्रत्येकालाच चांगलं दिसतं. काळा रंग हा सदाबहार रंग असून सध्याच्या ट्रेंडमध्ये याच रंगाची चलती आहे.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा

नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

ADVERTISEMENT

नेलपेंटसचे हे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत

25 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT