ADVERTISEMENT
home / Diet
डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं

डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं

मला  एका महिन्यात बारीक व्हायचे आहे. उद्यापासून मी डाएट सुरु करेन असा विचार अनेक जणी करतात आणि घाईघाईने कसलाही विचार न करता डाएट सुरु करतात. पण अगदी काहीच दिवसात डाएटचे हे गणित कोलमडते. मग काय एकादशी दुप्पट खाशीसारखेच डाएटचे पदार्थ सोडून इतर सगळ्या चटकमटक गोष्टी खाल्ल्या जातात. तुमच्या बाबतीतही असे कधी झाले आहे का? किंवा डाएट करण्याचा विचार करुन तुम्ही अजूनही डाएट सुरु केले नाही किंवा तुमच्याकडून डाएट फॉलो केले जात नाही. मग ही आहेत या मागची काही प्रमुख कारणं

मानसिकता नसणे

not prepared for diet

जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट जबरदस्तीने करायला सांगितली की तुम्ही ती कधीच करत नाही. हा मानवी स्वभाव आहे. डाएटच्या बाबतीतही तसेच आहे. जर तुम्हाला अचानक येऊन कोणी हे खाऊ नका ते खाऊ नका की,त्या गोष्टी आपण करायलाच जात नाही. उलट न सांगितलेल्याच गोष्टी आपण खातो. कारण डाएट करण्याची इच्छा तुमच्या मध्ये निर्माण झालेली नसते. हे झाले फुकटच्या सल्ल्याबाबत पण जेव्हा तुम्ही जीममध्ये जाता आणि तुमचा जीम ट्रेनर तुम्हाला या डाएट करण्याचा सल्ला देतात तेव्हा मात्र पैसे गेलेत म्हणून जबरदस्तीने डाएट फॉलो केला जातो.

7 दिवसात कमी करता येईल 6 ते 7 किलो वजन, वाचा हा डाएट

ADVERTISEMENT

चालढकल वृत्ती

आजचा दिवस जाऊ दे उद्यापासून डाएट करेन, असा विश्वास कित्येक जणी स्वत:ला देतात. पण तो उद्याचा दिवस काही कधीच उजाडत नाही. चालढकल करण्याच्या सवयीमुळे तुम्ही चांगले खाण्याापासून लांब जाता. मग काय तुमच्या शरीराला डाएट गरजेचा असला तरी तुम्ही तो करायला पाहात नाही. आणि सगळाच गोंधळ होऊन बसतो. तुमच्या डाएटला अडथळा आणण्याचे काम तुमची चालढकलवृत्ती आहे. त्याकडे लक्ष द्या आणि मगच डाएटचा शुभारंभ करा.

अगदी थोडसं खाल्लं तर काही बिघडत नाही

skiping diet

आपल्याकडे हे म्हणण्याची पद्धतच आहे. अगं खा इतकंस खाल्लंस तर काही मांस वाढणार नाही. हे इतकं इतकं म्हणता म्हणता कितीतरी खाल्ल जातं आणि मग डाएटचे बारा वाजतात. त्यामुळे जर तुम्ही डाएटवर असाल तर कानाला खडा लावून अशी सवय लावून घेणार नाही हे मनाशी ठरवा म्हणजे तुम्हाला डाएट करताना अडचणी येणार नाही.

परफेक्ट फिगरसाठी करा हा परफेक्ट डाएट

ADVERTISEMENT

 बदल न दिसल्यास डाएटला सोडचिठ्ठी

अनेकांना बदल हा अगदी क्विक लागतो. म्हणजे आजपासून डाएट सुरु केले की, लगेच ते दुसऱ्यादिवशी माप घेऊन पाहतात. जर त्या मापामध्ये त्यांना बदल दिसला नाही की, त्यांची निराशा होते. मग हा डाएट माझ्या काहीच कामाचा नाही. या निर्णयावर पोहोचतात. पण तुमच्या इतक्या वर्षांच्या शरीर रचनेला बदलण्याचे काम डाएट करुन एका दिवसात मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत ही घ्यावीच लागेल.  अनेक जण बदल दिसत नाही म्हणून लगेच डाएटला सोडचिठ्ठी देतात जे अजिबात चांगले नाही.

कार्यक्रमानुसार डाएट

कोणाच्या तरी लग्नासाठी, पार्टीसाठी, कुठल्यातरी कपड्यात फिट बसण्यासाठी काहींना वजन कमी करायचे असते. त्यामुळे ते त्यानुसार वेळापत्रक आखून डाएट करायचे ठरवतात. पण नेमकं त्याच दिवसात त्यांना डाएटला न्याय देता येत नाही आणि सगळया गोष्टी बिनसतात. एकतर अशापद्धतीने वजन कमी करणे चुकीचे आहे. शिवाय इच्छित रिझल्ट मिळाला नाही की,पुन्हा कधीही डाएट करायला त्यांचे मन धजावत नाही.

वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

खाणं बघून स्वत:ला सावरणे जाते कठीण

cheating diet

ADVERTISEMENT

पाणीपुरी, शेवपुरी, बर्गर, पिझ्झा असे चमचमीत पदार्थ पाहिले की, खाण्याचा मोह आवरता येत नाही हे कठीण आहे. मग काय डाएटवर असूनही लोक बकाबक हे पदार्थ खातात आणि जास्त व्यायाम करुन ते घालवण्याचा विचार करतात पण त्याने काहीच होऊ शकत नाही. उलट तुमच्यावर त्याचे विपरीत परिणामच होतात.

 *ही काही कारणे आहेत जी तुम्हाला तुमच्या आवश्यक डाएटपासून लांब ठेवतात. पण डाएट करताना तुम्ही डाएट का करत आहात? तुम्हाला त्याची काय गरज आहे याचा विचार करुन मनाशी निश्चय करा. उपाशी राहण्यापेक्षा डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करा ज्याने तुम्हाला नको ते खाण्याची इच्छाच होणार नाही. पण डाएट करताना योग्य सल्ला घ्यायला विसरु नका.

 

 

ADVERTISEMENT

 

 

 

 

ADVERTISEMENT

 

 

 

22 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT