वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टीप्स

वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टीप्स

एखादा पदार्थ करणं म्हणजे त्यात सोलणं, कापणं, वाटणं अशी अनेक काम असतात. कदाचित याच कारणामुळे working women आणि किचन यांचं नातं जुळत नाही. अनेकदा आवड असूनही नोकरी करणाऱ्या महिलांना किचनमध्ये आपल्या आवडीची डीश बनवणं हे थकवणारं काम वाटतं. खासकरून दिवसभर काम करून घरी आल्यावर अनेकदा वर्किंग वुमनना किचनमध्ये जाण्याचा कंटाळा येतो. तसंच रोज समोर उभा राहणार प्रश्न असतोच की आज काय बनवायचं. त्यामुळे वर्किंग वुमनच हळूहळू किचनशी नातं तूटू लागतं. जर तुम्हीही वर्किंग वुमन आहात आणि अशा समस्यांचा रोज सामना करावा लागत असेल तर तुम्हाला पुढील टीप्स उपयोगी पडू शकतात. ज्यामुळे पुन्हा एकदा तुमचं किचनशी नातं जुळेल.


1. Menu प्लॅन‌िंग


menu-planner


ज्या डिशेश येत्या आठवड्यात बनवायच्या असतील त्यांचं प्लॅनिंग वीकेंडलाच करून घ्यावं. मग त्यासाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट बनवून घ्या. वीकेंडला ग्रॉसरी शॉपिंग करताना हे सर्व सामान खरेदी करा. यामुळे तुमच्या डोक्यात आठवड्याभराचा मेन्यू राहील आणि तुमच्याकडे आवश्यक सामानही घरातच उपलब्ध असेल. त्यामुळे वेळही वाचेल. वीकेंडला 2-3 तासांसाठी केलेल्या प्लॅनिंगने तुम्हाला आठवडाभर मेन्यूबाबतही निवांतपणा अनुभवता येईल.


क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)


2. कापणं आणि सोलणं


cutted-veg


सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत सर्वात जास्त वेळ लागतो तो भाज्या कापण्यात आणि सोलण्यात. वीकेंडला तुम्ही ही कामंही करून ठेऊ शकता. जसं मटर सोलून एअरटाईट डब्यात ठेवणं. तसंच कोंथिबीर आणि पुदीना मोकळा वेळ मिळाल्यावर निवडून फ्रिजमध्ये स्टोर करणं. वीकडेजला आदल्या दिवशी भाजी चिरून ठेवल्यासही काम सोपं होईल.


3. सोनेरी कांदा


onion


आपल्या प्रत्येक indian recipes मध्ये जास्तकरून कांद्याचा वापर केला जातो. त्यामुळे कांदा परतायला वेळ लागतो.जर तुम्ही कांदा आधीच परतून किंवा भाजून एअरटाईट डब्यात फ्रिजरमध्ये स्टोर करून ठेवू शकता. याचा वापर तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये करू शकता.  


4. प्युरी आणि सॉस


tomatoe-paste %281%29


जास्तकरून रेसिपीजसाठी आपल्याकडे कांदा, आलं-लसूण, टोमॅटो प्युरी आणि सॉसची गरज लागते. प्रत्येकवेळी प्युरी बनवायला वेळ लागतो. त्यामुळे रिकाम्या वेळात किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण यांची प्युरी बनवून फ्रिजमध्ये स्टोर करून ठेऊ शकता. जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरू शकता. जर तुम्हाला वेळ मिळत नसल्यास आजकाल बाजारात बऱ्याच ब्रँड्सच्या रेडीमेड प्युरीज मिळतात. त्याही तुम्ही फ्रिजमध्ये स्टोर करून ठेऊ शकता. सकाळी सकाळी अचानक एखादा चविष्ट पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही कमी वेळात तयार करू शकता.   


5. कधी कधी कडधान्य


sprouts


आजकाल भिजवलेली कडधान्य बाजारात सहज उपलब्ध असतात. पण घरच्याघरी कडधान्य भिजवणं दोन मिनिटाचं काम आहे. तुम्ही तुमच्या आवडीने मूग, छोले, चणे इ. मोड आणून फ्रिजरमध्ये स्टोर करू शकता. जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि भूक लागेल तेव्हा तुम्ही कडधान्याचं हेल्दी स्नॅक्स बनवून खाऊ शकता. यामुळे वेळही वाचेल आणि हेल्द आणि टेस्ट यांचं चांगलं कॉम्बिनेशनही मिळेल.


6. पोळ्या बनवणं होईल सोप्पं


dough


कणीक मळणं हे अनेकदा महिलांना कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर कणीक भिजवण्याऐवजी रात्रीच जास्त कणीक भिजवून सकाळी त्याच्या पोळ्या बनवू शकता. यामुळे वेळही वाचेल आणि पोळ्याही पटापट होतील. पण लक्षात ठेवा पोळ्या बनवायच्या निदान अर्धा ते एक तास आधी ती कणीक बाहेर काढून ठेवा. म्हणजे पोळ्या कडक होणार नाहीत.  


7. चटण्या आणि लोणची


pickle


किचनमध्ये हमखास तोंडी लावण्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे चटणी आणि लोणची. या दोन्हींचा वापर तुम्ही साईड डीश म्हणून करू शकता. मुलांच्या टीफीनमध्ये कधी पराठ्यासोबत लोणचं किंवा लोणचं पोळी असंही बदल म्हणून देऊ शकता. तसंच जॅमचंही ऑप्शन चांगलं आहे.  


8. साऊथ इंडियन पदार्थ


south-indian


जर तुम्हाला आणि घरच्यांना साऊथ इंडियन पदार्थांची आवड असेल तर तुम्ही ईडली डोस्याचं पीठ बनवून ठेऊ शकता. सकाळी नाश्त्यासाठी किंवा टीफीनमध्ये चेंज हवा असल्यास तुम्ही काही वेळातच डोसा, ईडली किंवा उतप्पासारखं हेल्दी ऑप्शन तुम्हाला मिळेल. आजकाल दुकानातही ईडली-डोसा पीठ आरामात मिळतं. तेही तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेऊ शकता.


9. अत्यंत उपयोगी ब्रेड 


bread


वर्कींग वुमन्सना अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे ब्रेड. तुमच्या घरी झटपट काही बनवायचं असल्यास ब्रेडसारखी गोष्ट नाही. कमी वेळेत तुम्ही सँडविच, ब्रेड ऑम्लेट किंवा फ्रेंच टोस्ट बनवून झटपट स्नॅक्स बनवू शकता. अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी एखादी डीश करायची असल्यास ब्रेडचा उपयोग होतोच.  


10. नॉनव्हेजसाठी


non-veg


नॉनव्हेज आवडत असल्यास तुम्ही अचानक एखादा पदार्थ करायचा ठरवल्यावर धावपळ टाळण्यासाठी प्री प्लॅनिंग करू शकता. फ्रिजमध्ये अंडी, मासे आणि काही प्रमाणात मीट स्टोर करू ठेवा. वेळ वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी एकदा फ्रिज साफ करून तुम्ही या गोष्टी स्टोर करू शकता किंवा शक्य असल्यास मॅरीनेट करून ठेवा. हे पदार्थ तुम्ही दोन ते तीन दिवसाच्या काळात वापरू शकता.


हेही वाचा - 


जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर या '20' किचन ट्रीक्स आणि टीप्स 


तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने 


स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज