तुमच्या कामाच्या ठिकाणी कसा असावा ड्रेसिंग सेन्स, ज्यामुळे वाढतो आत्मविश्वास

तुमच्या कामाच्या ठिकाणी कसा असावा ड्रेसिंग सेन्स, ज्यामुळे वाढतो आत्मविश्वास

आजकाल सर्वात पहिले तुमच्या कपड्यांकडे बघून मग तुम्ही कसे असाल ते ठरवलं जातं. त्यामुळे अगदी कुठेही जाताना कसा ड्रेस घालायला हवा किंवा आपले कपडे कसे हवेत आणि आपण कसं दिसायला हवं याकडे आपण सर्वात जास्त लक्ष पुरवत असतो. महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे रोज ऑफिसला जाताना काय घालायचं आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे घालतो त्याने आपला आत्मविश्वास वाढतो का? खरं तर हो. आपण जे कपडे घालतो त्यावरून आपला आत्मविश्वास कसा आहे हे समोरच्या व्यक्तीलाही दिसून येत असतं. तुम्ही ऑफिसला जर फॉर्मल आऊटफिट्स घातले तर तुमचा लुकही प्रोफेशनल दिसतो आणि तसंच पर्सनॅलिटीही उठून दिसते. हेच कारण आहे की, आजकाल कॉर्पोरेट कल्चरमध्ये ऑफिसच्या आऊटफिट्सकडे विशेष लक्ष दिलं जातं. शिवाय तुमची एक वेगळी ओळखही या कपड्यांमुळे निर्माण होते. यासंबंधी NYOU च्या संस्थापक सोनल गढवी आणि भुवनेश्वरी सावंत यांच्याकडून आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. त्या खास तुमच्यासाठी


1. तुमच्या शरीराचा आकार आणि व्यक्तीमत्वामधील दुवा म्हणजे तुमच्या कपड्यांना दिलेलं प्राधान्य. आपण ज्या कंपनीमध्ये काम करत असतो, त्या कंपनीमध्ये आपला आत्मविश्वास दर्शवण्यासाठी रंग, फॅब्रिक्स, प्रिंट्स आणि स्टाईल्स या सगळ्याबरोबर योग्य प्रकारे आपला संवाद अर्थात आपली मैत्री असायला हवी. ऑफिसला जायचं म्हटलं की, अर्थातच तुम्हाला फॉर्मल लुक हवा हे नक्कीच. पण तरीही तुम्ही या फॉर्मल लुकबरोबर नक्कीच क्रिएटिव्ह काही ना काहीतरी करू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली कट स्टाईलदेखील तुम्ही आपल्या फॅशनमध्ये अॅड करू शकता.


2. कधीकधी तुम्हाला जेव्हा आपल्या मुलांच्या शाळेत मीटिंगसाठी जायचं असतं तेव्हाही आपल्याला प्रश्न पडतो की, नक्की काय घालायचं. तर यावरदेखील आपल्याकडे बरेच पर्याय उपलब्ध असतात. शाळेत जायचं म्हणजेदेखील तुम्हाला फॉर्मल जाणंच आवश्यक आहे. अर्थात असं असलं तरीही तुम्हाला ज्यामध्ये कम्फर्टेबल वाटत आहे असेच कपडे तुम्ही घालायला हवेत. तुमची रोजच्या आयुष्यातील भूमिका कोणतीही असो तुमचं प्रतिबिंब झळकेल असेच कपडे तुम्ही वापरायला हवेत. आपण ज्याप्रमाणे बोलतो, वावरतो त्याप्रमाणेच तुम्हाला तुमचे कपडे घालायला हवेत हे नेहमीच तुम्ही लक्षात ठेवायला हवं.


3. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल सगळ्याच ठिकाणी स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर आपलं व्यक्तीमत्व हे योग्य ड्रेसिंग सेन्सने घडवायला हवंच. त्याचप्रमाणे तुमची वागण्याबोलण्याची पद्धत आणि तुम्ही व्यक्ती म्हणून इतरांशी कसं वागता हेदेखील महत्त्वाचं आहे. हे मात्र तितकंच खरं आहे की, तुमच्या ड्रेसिंग सेन्समुळे तुमचा आत्मविश्वास दुणावतो आणि तुम्हाला इतरांच्या तुलनेत वेगळेपणा दाखवून देत असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमचा ड्रेसिंग सेन्स जपायला हवा.


नवीनतम पंजाबी सूट डिझाइन देखील वाचा


आम्ही तुम्हाला काही खास ड्रेसिंग सेन्स सांगणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या ऑफिस लुकसाठी उपयोगी पडतील -


सूट-बूट आहे बेस्ट


suit boot


ऑफिसमध्ये मीटींग असो वा कोणतं प्रेझेटेंशन द्यायचं असो, सूटपेक्षा चांगला पर्याय नाही. सूटमध्ये तुमचं व्यक्तीमत्व तुमच्या कामाप्रती तुम्ही गंभीर असल्याचं दर्शवते आणि ऑफिस लुकही पूर्ण करते. तुम्हाला प्लेन सूट कंटाळवाणा वाटत असल्यास तुम्ही स्ट्राइप्स सूट्स ही घालू शकता.  


फ्लोरल प्रिंटेड ड्रेस


prints


हो… फ्लोरल प्रिंट. हे फक्त कॅज्युअल वेअरिंगमध्ये नाहीतर ऑफिस आऊटफिट्समध्येही एकदम फिट बसतात. फक्त याचा रंग जास्त भडक नसावा. हलक्या रंगाचे किंवा साध्या फ्लोरल डिझाईनचे ड्रेस ऑफिसमध्ये घातल्यास तुम्ही नक्कीच स्टायलिश दिसाल. त्यासोबत जर तुम्ही ब्लॅक सँडल्स घातल्यास तेही छान दिसतात.


टॉप अँड बॉटम


top and bottom


आम्ही इकडे टॉप टू बॉटम नाहीतर टॉप अँड बॉटमबद्दल बोलत आहोत. ऑफिसमध्ये जर तुम्हाला  कॅज्युअल लुक कॅरी करायचा असल्यास तुम्ही एखादा पानांच्या डिझाईनचा टॉप आणि त्यावर मॅच करणारी बॉटम घालून बघू शकता.  


स्ट्राइप्स ड्रेस


striped dress


आजकाल स्ट्राईप्स फारच ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्ही ऑफिसला जाताना एखादा स्ट्राईप्सचा ड्रेस घातल्यास तो जास्त रंगीबेरंगी नसेल याची काळजी घ्या. शक्य असल्यास स्ट्राईप्समध्ये सोबर रंगाची निवड करा.


स्कर्ट टॉप


skirt top


लेडीजसाठी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये स्कर्टची फॅशन सर्वात जुनी आहेत. फक्त यामध्ये कॅरी करण्याच्या पद्धतीत बदल येत असतो. जर तुमच्याकडे एखादा ब्लॅक पेन्सिल स्कर्ट असेल तर त्यावर तुम्ही कोणत्याही रंगाचा प्लेन टॉप मॅच करून घालू शकता. जर तुमची मीटींग असेल तर त्या दिवशी तुम्ही ब्लॅक स्कर्टवर पांढरा टॉप घालू शकता. ज्यामुळे तुमचा लूक एकदम प्रोफेशनल वाटेल.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


ऑफिसमध्ये घालण्यासाठी परफेक्ट आऊटफिट्स


उन्हाळ्यात हे 5 कपडे तुम्हाला ठेवतील कुल आणि ट्रेंडी


कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज