भारताची सुपरवुमन मेरी कोम यांचे 'हे' आहे स्वप्न

भारताची सुपरवुमन मेरी कोम यांचे 'हे' आहे स्वप्न

बॉक्सिंग चॅम्पियन एम.सी. मेरी कोम  (M. C. Mary Kom) यांचे नाव जगभरात अभिमानाने घेतलं जातं. बॉक्सिंगसाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशाला सर्मपित केलं आहे. मेरी कोम तीन मुलांच्या आई आहेत.अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी बॉक्सिंगमध्ये नाव कमावलं आहे. सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिकपद कास्य पदक विजेती मणिपूरची मेरी कोम आज भारताची शान आहे. 2014 साली मेरी कोम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. बॉलीवूड अभिनेती प्रियांका चोप्रा हिने या चित्रपटात मेरी कोम यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात मेरी कोम यांच्या जीवनाचा खडतर प्रवास दाखविण्यात आला होता. भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कॉम यांच्याविषयी काही खास गोष्टी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करीत आहोत.


facts-about-boxing-champion-mary-kom-1


मेरी कोम आहेत अतिशय जिद्दी


‘एटीएस होमक्राफ्ट’ च्या हॅपी टेल्स प्रोजेक्ट अंतर्गत ग्रेटर नॉएडा वेस्ट येथे ‘किड्स बॉक्सिंग रिंग’ चे उद्घाटन करण्यात  आले. या उद्घाटन प्रसंगी भारतीय बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम उपस्थित होत्या. या कार्यक्रमात क्रीडा चाहत्यांसोबत मेरी कॉम यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. लहानपणापासून ते अगदी लग्न, मुलं अशा खाजगी गोष्टीदेखील त्यांनी बिनधास्तपणे शेअर केल्या.त्यांच्या यशस्वी जीवनाचा प्रवास ऐकणं अतिशय रोमांचक अनुभव होता. मेरी कोम यांचा जन्म मणिपूरच्या अतिशय दुर्गम खेड्यात झाला होता. त्यांच्या घरातील परिस्थितीदेखील अतिशय हालाखीची होती. मात्र मेरी कोम यांनी केवळ जिद्द आणि धेर्याने जीवनात यश खेचून आणलं आहे.  मेरी कोम यांना मुलांबद्दल प्रचंड प्रेम आहे. जर लहान वयातच मुलांच्या क्रीडा कौशल्याची योग्य पारख झाली तर अशी मुलं लवकर खेळांमध्ये भरघोस यश प्राप्त करू शकतात असं त्यांना वाटतं. यासाठीच देशभरात मुलांनी मैदानी खेळ खेळायला हवेत असं त्यांना वाटतं. मेरी कोम मणिपूरमध्ये स्वतः लहान मुलांना बॉक्सिंगचे ट्रेनिंग देतात. मात्र अजूनही त्यांना त्यांची जागा चालवेल असा बॉक्सिंग प्लेअर सापडलेला नाही याची खंत वाटते. लवकरच त्यांना असा प्लेअर मिळावा अशी त्यांची ईच्छा आहे कारण त्यामुळे त्या या क्षेत्रातून हसतहसत निवृत्त होऊ शकतील.


facts-about-boxing-champion-mary-kom


मेरी कोम यांचं स्वप्न


मेरी कोम यांना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाविषयी विचारलं असता त्यांनी “जोपर्यंत ऑलिंपिकमध्ये भारताला बॉक्सिंगसाठी गोल्ड मेडल मिळत नाही तोपर्यंत माझं स्वप्न पूर्ण होणार नाही" असं त्यांनी सांगितलं. भारताला ऑलिंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळेपर्यंत प्रयत्न करीत राहण्याची त्यांनी ईच्छा व्यक्त केली. या शिवाय मेरी कोम यांना देशातील प्रत्येक महिलेने घर सांभाळून यशाचे शिखर गाठावे असं वाटतं. कारण आजही अनेक महिला लग्नानंतर त्यांच्या करिअरपासून दूर जाण्याचा निर्णय घेताना दिसतात जे फारच चुकीचं आहे. कधी कधी लग्नानंतर काही महिलांना त्यांचे करीअर करणे कठीण जाते, घरच्यांकडून विरोध होतो. मात्र अशा महिलांनी घरच्यांचा विरोध पत्करत प्रयत्न करीत राहयला हवे असं मेरी कोम यांना वाटतं. कारण प्रयत्न केले तर घरातील माणसे आपोआप मदत करू लागतात असा त्यांना विश्वास वाटतो यासाठीच मेरी कोम यांनी देशभरातील महिलांना काही झालं तरी आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहा असा सल्ला दिला आहे.


अधिक वाचा


#StrengthOfAWoman : ‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट


#StrengthOfAWoman - दाढीमिशा असूनही मुलींसाठी ठरत आहे ‘ही’ मुलगी प्रेरणा


रेडिओलॉजिस्ट शिल्पा लाड सांगत आहेत निरोगी जीवनाचा ‘आरोग्यमंत्र’


फोटोसोजन्य - इन्स्टाग्राम