#ZodiacFriends: राशीवरून ठरवा तुमचे मित्रही आहेत का अशाच स्वभावाचे

#ZodiacFriends: राशीवरून ठरवा तुमचे मित्रही आहेत का अशाच स्वभावाचे

जगामध्ये बरीच नाती असतात जी आपल्याला आपल्या जन्माबरोबरच मिळतात. फक्त ‘मैत्री’ हे असं एकच नातं आहे जे आपण स्वतः निवडतो. त्यामुळे हे नातं प्रत्येक माणसासाठी खास असतं. ज्यांच्याबरोबर आपण हसतो, रडतो, भांडण करतो आणि सर्वात जास्त मजा करतो ते आपले मित्र असतात. रागावल्यावर एकमेकांचा रूसवा काढणं, मस्ती करणं, एकमेकांची मजामस्करी करणं याचबरोबर मित्रमैत्रिणीच असतत जे आपली काळजी करतात, वाईट प्रसंगात आपली साथ देतात. त्यांनाच आपली आवड निवड आणि अगदी आपला स्वभावही जवळून माहीत असतो. मित्रच असतात जे आपल्याला अगदी जगण्यालाही बळ देत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? कोणत्या राशीनुसार, आपल्या आयुष्यातील मित्र कसे वागतात. त्या त्या राशीनुसार आपण जाणून घेऊया कोणते मित्र कसे वागतात आणि तुमची रास पण कोणती आहे आणि तुम्ही कसे मित्र आहात हे जाणून घ्या.


1. बिनधास्त Aries (मेष)


Aries


जिद्दी, उत्साही आणि थोडे हक्क गाजवणारे अशा या व्यक्ती असतात. पण सतत या व्यक्तींना काहीतरी साहसी करायचं असतं आणि नवे नवे मित्र करण्याची या राशीच्या व्यक्तींना आवड असते. पण जेव्हा कोणाच्या उपयोगी पडण्याची वेळ येते तेव्हा या राशीच्या व्यक्ती या समोरच्या मित्रांची खूपच चांगली काळजी घेतात आणि अगदी अडीअडचणीलादेखील स्वतःहून पुढे येतात.


2. प्रामाणिक Taurus (वृषभ)


Taurus


Taurean अप्रतिम मित्र असतात. जास्त मित्रमैत्रिणी करण्याच्या भानगडीत या व्यक्ती पडत नाहीत. त्यांच्या मित्रमैत्रिणींची संख्या कमी असते. पण जे असतात ते त्यांच्यासाठी खूपच जवळचे असतात. एकदा मैत्री केल्यानंतर शेवटपर्यंत या व्यक्ती मैत्री निभावतात. आपल्या मित्रांना ते आपलं कुटुंब मानतात. त्यामुळेच अगदी लहानपणापासून असलेले मित्र ते टिकवून ठेवतात. या व्यक्तींवर तुम्ही अगदी डोळे बंद करून विश्वास ठेऊ शकता. या व्यक्तींना ‘फ्रेंड्स फॉर लाईफ’ असंही म्हटलं जातं.


3. क्रेझी Gemini (मिथुन)


Gemini


स्टाईल आणि ग्रेस हे या राशीच्या व्यक्तींना सर्वात जास्त प्रिय असतं. या राशीच्या व्यक्ती आपले मित्रमैत्रिणीही असेच शोधायचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला जर कोणत्याही बाबतीत सल्ला हवा असेल. तर यांच्यासारखा मित्र असूच शकत नाही. पण महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तींना भावनिक गोष्टी सांगत बसू नका कारण अशा गोष्टी त्यांना डिप्रेस करतात आणि त्यांना बंधनात अडकल्यासारखंं वाटतं. या राशीच्या व्यक्तींना आपलं स्वातंत्र्य जास्त प्रिय असतं. हे अतिशय मनमौजी स्वरूपाचे असतात आणि यांचा Sense of Humour अप्रतिम असतो. त्यामुळे मित्रांमध्ये ते लोकप्रिय असतात. अशा व्यक्तींच्या मनावर सगळं अवलंबून असतं. मनात वाटलं तर रात्रभर पार्टी करतील नाहीतर एकटे राहतील. पण या व्यक्ती खूपच सोशल असतात. त्यामुळे त्यांना खूपच मित्रमैत्रिणी असतात.


4. भावनिक Cancer (कर्क)


Cancer


या राशीच्य व्यक्तींचं वैशिष्ट्य म्हणजे या राशीच्या व्यक्ती आपल्या सर्वच मित्रमैत्रिणींना समसमान न्याय देतात. म्हणजे कोणालाही एकटं जाणवू देत नाहीत. असं केल्यामुळे त्यांना स्वतःला आणि त्यांच्या जवळच्यांनाही नक्कीच आनंद मिळतो. हा त्यांचा स्वभाव आहे. तुम्ही यांच्यावर अवलंबून राहू शकता आणि तुमचे कोणतेही प्रॉब्लेम्स अथवा भावनिक गोष्टी तुम्ही यांच्याबरोबर शेअर करू शकता. पण या व्यक्ती स्वतःच्या भावना मात्र खूपच कमी जणांबरोबर शेअर करतात. स्वतः भावनिक असल्यामुळे दुसऱ्यांच्या भावना यांना पटकन समजून घेता येतात. त्यामुळे हे असे मित्र आहेत जे तुमच्या भावना खूपच चांगल्या तऱ्हेने समजून घेऊन तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट देतात.


5. उत्साही Leo (सिंह)


leo


तुमचा मूड खराब असेल तर तुम्हाला सिंह राशीच्या मित्राची गरज आहे. या राशीच्या व्यक्ती तुम्हाला केवळ जगण्याचं बळ नाही देत तर खरी प्रेरणा देतात. या व्यक्ती पटकन मिसळतात. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आवडलात म्हणून या राशीच्या व्यक्ती पटकन मिसळल्या आहेत. हे त्या राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व असतं ज्यामुळे सगळे मित्रमैत्रिणी त्यांच्याकडे आकर्षिक होतात. आपल्या मित्रमैत्रिणींसाठी ते कधीही मनात काही वाईट ठेवत नाहीत. दुसऱ्यांना पटकन माफ करून टाकण्याचा यांचा स्वभाव असतो. दुसऱ्यांच्या मनात नक्की काय चालू आहे हे या राशीच्या व्यक्ती समजून घेतात आणि त्याचा आदरही करतात.


6. लॉजिकल Virgo (कन्या)


Virgo


भावनिक आणि इतर गोष्टींपेक्षा या राशीच्या व्यक्ती विचारपूर्वक वागण्याला महत्त्व देतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा शांत आणि detached असतात असं समजलं जातं. पण तुम्हाला जर आयुष्यात योग्य सल्ला हवा असेल तर या राशीच्या मित्रमैत्रिणी असायलाच हव्यात. कारण कोणत्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू समजून घेऊन मगच या राशीच्या व्यक्ती त्यावर उपाय सुचवतात. काही जणांना हे दुसऱ्यांच्या आयुष्यावर नियंत्रण करत आहेत असं वाटू शकतं. पण यांचा सल्ला हा नक्कीच तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी उपयोगी ठरतो.


7. लोकांची आवड Libra (तूळ)


Libra


तूळ राशीच्या व्यक्तींना प्रत्येक तऱ्हेच्या स्वभावाचे मित्र असतात. या राशीच्या व्यक्कती सर्वच लोकांबरोबर मिक्स होतात. प्रेम असो वा व्यवसाय, कुटुंब असो वा ऑफिस प्रत्येक ठिकाणी या राशीच्या व्यक्तींना मित्रमैत्रिणी असतात. या राशीच्या व्यक्ती म्हणजे सर्वांना हव्याहव्याशा अशा असतात. दुसऱ्यांच्या स्वभावाप्रमाणे या राशीच्या व्यक्ती स्वतःला अडजस्ट करून घेतात. त्यामुळे फारच क्वचित या राशीच्या व्यक्तींची भांडणं झालेली दिसून येतात. प्रत्येक माणसाला या राशीची व्यक्ती मित्र अथवा मैत्रीण असणं गरजेचं आहे.


8. इमानदार Scorpio (वृश्चिक)


Scorpio


या राशीच्या व्यक्ती अतिशय खऱ्या, इमानदार आणि प्रामाणिक मित्रमैत्रिणी असतात. यांची स्मरणशक्ती कमालीची असते. त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींच्या आवडीनिवडी या व्यक्तींना खूपच चांगल्या लक्षात राहातात. कोणत्याही मित्र अथवा मैत्रीणीने या राशीच्या व्यक्तींना चुकीची वागणूक दिली असेल तर या व्यक्ती ती वागणूक कधीच विसरत नाही. पण तरीही समोरच्या व्यक्तीच्या संकटाच्या वेळी सर्वात पहिले मदत करायला यांचाच हात पुढे असतो. कोणीही खोटं बोललेलं यांना सहन होत नाही. पण तुम्ही या राशीच्या व्यक्तींचं मन एकदा जिंकून घेतलंत की, तुम्हाला कधीही मैत्रीमध्ये या राशीच्या व्यक्ती एकटं सोडत नाहीत. तुम्ही चुकत असाल तर तुमची कानउघडणी करायला या व्यक्ती मागेपुढे पाहत नाहीत. पण ते तुमच्या चांगल्यासाठीच असतं हेदेखील तितकंच खरं आहे.


9. निर्मळ मनाचे Sagittarius (धनु)


Sagittarius


‘जगा आणि जगू द्या’ याप्रमाणे जगणाऱ्या या राशीच्या व्यक्ती असतात. जे यांच्या मनात असतं तेच यांच्या ओठावरही असतं. अगदी कटू सत्यदेखील या राशीच्या व्यक्ती पटकन तोंडावर बोलू शकतात. त्यामुळे यांच्या जवळचे मित्रमैत्रिणी त्याचं वाईट वाटून घेत नाहीत. आपल्या चांगल्यासाठीच या व्यक्ती बोलत आहेत, याची त्यांना माहिती असते. या व्यक्तींवर मित्र म्हणून तुम्ही पूर्ण विश्वास ठेऊ शकता. पण या राशीच्या व्यक्ती इतका भविष्याचा विचार करतात की, वर्तमानात जगायचं विसरून जातात. त्यामुळे मित्र म्हणून काही वेळा किरकिऱ्यादेखील अशा व्यक्ती असतात.


10. अनोखे Capricon (मकर)


Capricorn


या राशीचे मित्र तुमचा कोणताही प्लॅन असल्यास, तो यशस्वी करण्यास तुम्हाला नक्की साथ देतात. इतकंच नाही तर आपल्या मित्रमैत्रिणींना योग्य तऱ्हेने सांभाळण्याचं आणि काळजी घेण्याचं काम या राशीच्या व्यक्ती करतात. या राशीच्या व्यक्ती निस्वार्थी असतात. तुमची मदत केली तर तुमच्याकडून त्यांना परत काही हवं असेल अशी त्यांची अजिबात अपेक्षा नसते. त्यामुळे असे मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यात असणं हे तुमचंही भाग्यच आहे.


11. दयाळू Aquarius (कुंभ)


Aquarius


बऱ्याच लोकांना या राशीच्या व्यक्ती शांत आणि भावनाशून्य वाटतात. पण या व्यक्ती अतिशय दयाळू असतात. आपल्या मित्रांची मदत करण्यासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी या राशीच्या व्यक्ती खूपच चांगल्या अगदी शेवटच्या मिनिट्सवर ट्रीप आखू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ट्रीप्स तुमच्या कायम लक्षात राहतील इतक्या छान या व्यक्ती ऑर्गनाईज करतात. कोणत्याही योजना आखण्याच्या बाबत या व्यक्ती अतिशय चांगल्या असतात. तुमचा एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असल्यास, या राशीच्या व्यक्ती तो कार्यक्रम कायम लक्षात राहावा अशी योजना आखतात.


12. संवेदनशील Pisces (मीन)


Pisces


या राशीच्या व्यक्ती अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक असतात. त्यामुळे आपली मैत्री अतिशय प्रामाणिकपणे हे निभावतात. आपल्या मित्राच्या संकटांना या राशीच्या व्यक्ती आपलं संकट मानतात. त्यामुळे कोणतंही संकट हे अगदी व्यवस्थितपणे हाताळू शकतात आणि त्यातून मार्ग काढू शकतात. या व्यक्ती अतिशय सकारात्मक असल्यामुळे असे मित्र नेहमीच आयुष्यात असावे असं वाटतं.


फोटो सौजन्य - Shutterstock


हेदेखील वाचा -


आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळायला हवी जाणून घ्या


राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली


जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'