निरोगी जीवन आणि चिरतरूण दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते. रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ लागते. निद्रानाशामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठीच आम्ही तुम्हाला शांत झोप येण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
शांत झोप लागण्यासाठी काही टीप्स
आरोग्यशास्त्रानुसार माणसाने किमान सात ते आठ तास शांत झोप घेणंं गरजेचं आहे. मात्र आजही अशी अनेक माणसं आहेत जी रात्री किमान दोन ते तीन तासदेखील नीट झोपू शकत नाहीत. काहींंना अंथरूणावर पडल्या पडल्या झोप लागते तर काहीजण रात्रभर तळमळत राहतात. आजकाल झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. निद्रानाशाची अनेक कारणे असू शकतात. निद्रानाशामुळे मानसिक आजारही उद्भवतात. मानसिक आजाराची लक्षणे, मानसिक आजार उपाय मराठीत तुम्हाला माहिती मिळेल.
लक्षात ठेवा जरी तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल तर चुकूनही झोपेच्या गोळ्या घेऊ नका. कारण याचे अनेक दुष्परिणाम तुम्हाला भविष्यात सहन करावे लागू शकतात. त्याऐवजी आम्ही सूचवलेल्या सोप्या टीप्स फॉलो करा.
प्रयत्नपूर्वक तुमची झोपेची वेळ पाळण्याचा प्रयत्न करा. वास्तविक आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेवर झोपणे कितीही कठीण असले. तरी प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही. यासाठी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्ही रात्री झोपण्याआधी अंघोळ केली तर तुम्हाला रात्री शांत आणि निवांत झोप लागू शकते. कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल. अंघोळीमुळे तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल.
काही लोकांना झोपेपर्यंत टिव्ही अथवा कोणतेही गॅझेट्स बंद करा. बेडरूममध्ये टिव्ही अथवा इतर गॅझेट्स ठेऊ नका. ज्यामुळे तुम्ही उशीरापर्यंत टिव्ही पाहणार नाही. शिवाय झोपण्याआधी कमीत कमी अर्धा तास सर्व गॅझेटस बंद करून ठेवा. कारण गॅझेटच्या प्रकाशाचा तुमच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि मेंदूला झोपेचा सिग्नल मिळत नाही.
झोपताना नेहमी आवडीचे काम करा. कारण मनपसंत काम केल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. किंवा प्रिय व्यक्तीसोबत गप्पा मारा ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
जर तुम्ही ऑफिसमध्ये बैठ्या स्वरूपाचे काम करत असाल तर तुमची शारीरिक हालचाल कमी होते. यासाठी नियमित व्यायाम करा ज्यामुळे अंथरूणावर पडल्यावर तुम्हाला लगेच झोप लागेल.
काही लोकांना झोपण्याआधी पुस्तक वाचल्यामुळे झोप येते. शिवाय झोपताना नेहमी सकारात्मक विचार मनात घोळवल्यास सकाळी फ्रेश वाटते. यासाठी झोपण्यापूर्वी एखादे सकारात्मक विषयाचे पुस्तक वाचा.
रात्री झोपताना जड आहार घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. जर चुकून रात्रीचे जेवण भरपूर झाल्यास शतपावली न करता झोपू नका. रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवा.
वाचा - Home Remedies To Get Rid Of Snoring In Marathi
झोपताना मनात चांगले विचार असतील तर चांगली झोप लागते. चिंता,काळजीचे विचार तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत. यासाठी झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार, प्रार्थना अथवा मेडीटेशन करा ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि गाढ झोपदेखील लागेल.