ADVERTISEMENT
home / Care
काय फरक असतो हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूदनिंगमध्ये (Hair Smoothening At Home In Marathi)

काय फरक असतो हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूदनिंगमध्ये (Hair Smoothening At Home In Marathi)

लांबसडक, सरळ आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. काहीचं जन्मतःच सरळ केस असतात तर काहींचे नसतात. तरीही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्ट्रेट केस करून घेऊ शकता. पण त्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. केस स्ट्रेट करण्यासाठी सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग. खरंतर हेअर स्ट्रेटनिंग ही एक अशी हेअर स्टाईलिंग टेक्निक आहे, ज्याच्या वापराने तुमच्या केसांंना स्ट्रेट केलं जातं. ज्यामुळे तुमचे केस स्मूथ आणि सुंदर दिसू लागतात.

तुम्हाला विश्वास बसणार नाही…पण 1950 च्या दशकात हा ट्रेंड खूपच प्रसिद्ध झाला होता. तेव्हा केस स्ट्रेट करण्यासाठी अनेक पद्धती वापरण्यात येत असत. जसं हॉट कॉम्बिंग, हेअर आर्यन, ब्लो-ड्रायर स्टाईलिंग, रोलर सेट आणि ब्राझिलियन स्ट्रेटनिंग इ. एवढंच नाहीतर काही शँपू, कंडीशनर, हेअर जेल आणि सिरम तुमच्या केसांना थोड्या वेळासाठी सरळ म्हणजेच स्ट्रेट करू शकतात.

बऱ्याच दिवसासाठी सरळ केस हवे असतील, मात्र तुम्हाला हेअर स्ट्रेटनिंग किंवा हेअर स्मूदनिंगशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माहीत असेलच की,  हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूदनिंगमध्ये या दोन वेगळ्या पद्धती आहेत. काहीवेळा यातील फरक न कळल्यामुळे अनेकजणांना हे एकच आहे असं वाटतं. पण आम्ही तुम्हाला या लेखात  याबाबतची सर्व माहीती देणार आहोत. ज्यामुळे तुमचं या दोघांबाबतच सर्व कन्फ्यूजन दूर होईल.

टेम्पररी स्ट्रेटनिंगसाठी हेअर प्रोडक्ट्स

ADVERTISEMENT

टेम्पररी स्ट्रेटनिंगसाठी घरगुती उपाय

काय आहे हेअर स्मूदनिंग

कॅरटीन ट्रीटमेंट

ब्राझीलियन हेअर ट्रीटमेंट 

ADVERTISEMENT

काय आहे हेअर स्ट्रेटनिंग? (What Is Hair Straightening)

हेअर स्ट्रेटनिंग म्हणजे केस सरळ करून घेणे. याचा वापर जास्तकरून ती लोक करतात ज्यांचे केस कुरळे किंवा थोडे फ्रिजी असतात. या प्रकारच्या केसांना दोन प्रकारे स्ट्रेट करता येते. पहिली पद्धत म्हणजे काही वेळासाठी केसांना सरळ करणं म्हणजे टेम्पररी स्ट्रेटनिंग आणि दुसरं म्हणजे परमनंटली केसांना स्ट्रेट करणे म्हणजेच परमनंट हेअर स्ट्रेटनिंग किंवा परमनंट हेअर रिबॉडींग.

पांढर्‍या केसांना कशा कारणीभूत आहेत याबद्दल देखील वाचा

कमी वेळासाठी केस स्ट्रेट करायचे असल्यास (Temporary Hair Straightening At Home)

Hair-Smoothening-At-Home-In-Marathi

तुमचे केस कुरळे किंवा फ्रिजी आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर नेहमी केस धुतल्यावर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल. अशावेळी केस धुतल्यावर ओले असेपर्यंत ते सरळ वाटतात. पण सुकल्यावर मात्र ते त्यांच्या ओरिजिनल शेपमध्ये येतात आणि केसांचा सरळपणा गायब होतो. तुम्ही केस स्ट्रेट करण्यासाठी हीटींग टूलचा वापर करून शकता. पण त्यामुळे हळूहळू त्याची प्राकृतिक चमक कमी होऊ लागते आणि ते डॅमेज होतात. म्हणूनच केसांना जर काहीवेळासाठी स्ट्रेट करायचं असल्यास तुम्ही शँपू किंवा कंडीशनरचा वापर करू शकता.

ADVERTISEMENT

टेम्पररी स्ट्रेटनिंगसाठी हेअर प्रोडक्ट्स (Best Product For Hair Straightening) 

तुम्ही घरच्या घरी केस स्ट्रेट करण्यासाठी पुढील प्रोडक्ट्स वापरू शकता. 

ट्रेसमे कॅरटीन स्मूथ विथ आर्गन ऑयल शँम्पू (Tresemme Keratin Smooth With Argan Oil Shampoo)

हा शँपू खास केस आणि स्मूथ बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ट्रेसमेच्या या शँपूमध्ये सल्फेटची मात्रा कमी असल्याने केसांतील कॅरटीन बनण्यास मदत होते आणि त्यांचे पोषणही होते. तसंच यासोबत केसांना आवश्यक पोषक तत्त्वही मिळतात. हा शँपू केसांचा फ्रिजीपणा संपवून ते स्ट्रेट करतो. ज्यामुळे तुमच्या केसांची स्टाईलिंग करणं एकदम सोपं होतं. 

keratin-smooth-shampoo-tresemme-original

किंमत- ₹ 125

ADVERTISEMENT

ट्रेसमे कॅरटीन स्मूथ विथ आर्गन ऑईल कंडीशनर (Tresemme Keratin Smooth With Argan Oil Conditioner)

ट्रेसमे कॅरटीन स्मूथ विथ आर्गन ऑईल शँपूसोबतच तुम्ही याच्या कंडीशनरचा वापर करून केस अजून सुंदर बनवू शकता. हे कंडीशनर ना फक्त तुमच्या केसांचं पोषण करतं पण त्यांचा लुकही बदलतं. ज्यामुळे असं वाटेल की, तुम्ही पार्लरमध्ये जाऊन ब्लो ड्राय करून आला आहात. शँपू आणि कंडीशनर यांच्या कॉम्बिनेशनने तुमचे फ्रिजी केस होतील गायब आणि वेलकम करा स्ट्रेट आणि स्मूथ केसांचं.

keratin-smooth-with-argan-oil-conditioner-tresemme-original-Hair-Smoothening-At-Home-In-Marathi

किंमत- ₹ 198

ADVERTISEMENT

टेम्पररी स्ट्रेटनिंगसाठी घरगुती उपाय (Tips For Hair Smoothening At Home In Marathi)

Hair-Straightening-At-Home-In-Marathi

जर तुम्ही केसांसाठी घरगुती उपायांवर विश्वास ठेवत असाल तर आम्ही सांगणार आहोत काही असे घरगुती उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्याघरी कुरळे किंवा फ्रिजी केस स्ट्रेट करू शकता. पाहा केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय –

1. मध, दूध आणि स्ट्रॉबेरी हे प्राकृतिक स्ट्रेटनरच्या रूपात वापरले जातात. यासाठी तुम्हाला एक कप दूध, दोन मोठे चमचे मथ आणि थोडी मॅश केलेली स्ट्रॉबेरी मिक्स करून घ्या. ही पेस्ट तुमच्या केसांना कमीत कमी 2 तास लावून ठेवा. मग हलक्या शँपूने केस धूवून टाका.  

2. कोकोनट मिल्क आणि लिंबाचा रस एका बाऊलमध्ये चांगला मिक्स करून घ्या आणि काही तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झाल्यावर केसांना मास्कप्रमाणे लावा. काही वेळाने केसांना 15 मिनिटं स्टीम द्या. मग शँपूने केस धुवा. हिवाळ्याच्या दिवसता हा उपाय करू नका.

ADVERTISEMENT

3. बेसन, मुलतानी माती आणि मोहरीच्या तेलाच्या मदतीने तुम्ही प्राकृतिकरित्या स्ट्रेट केस मिळवू शकता. यासाठी तुम्हाला लागेल तब्बल 4 मोठे चमचे बेसन आणि तेवढ्याच प्रमाणात मुलतानी माती. हे दोन्ही घटक मिक्स करून घ्या आणि त्यात मोहरीचं तेल घालून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि मग केस शँपूने चांगले धूवून घ्या.

4. मुलतानी मातीत अंड आणि तांदूळाचं पीठ मिक्स करून केसांना स्ट्रेट लुक देऊ शकता. यासाठी एक कप मुलतानी मातीत एक अंड आणि पाच चमचे तांदूळाचं पीठ मिक्स करून पेस्ट बनवा. नंतर केसांना ती पेस्ट 40 मिनिटं ती पेस्ट लावून ठेवा. या दरम्यान केसांना बोटांनी आणि मोठ्या दाताच्या कंगव्याच्या मदतीने सरळ ठेवायचा प्रयत्न करा. जेव्हा पेस्ट सुकेल तेव्हा केस साध्या पाण्याने धूवून टाका. चांगल्या परिणामांसाठी ही पेस्ट लावणाच्या आदल्या रात्री केसांना तेल लावा. असं तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता. काही महिन्यातच तुम्हाला चांगला रिझल्ट दिसून येईल.

5. केळं हे फक्त खाण्यासाठीच पौष्टीक असतं असं नाही. तर त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतं. याशिवाय तुमचे केस स्ट्रेट करण्यातही मदत करतं. दोन पिकलेली केळी चांगली मॅश करून घ्या आणि त्यात दोन मोठे चमचे मध, दही आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुमच्या केसांना अर्धा तास लावून ठेवा. नंतर केस धूवून टाका.

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय तुम्ही पाहिले. आता पाहा काही ट्रीटमेंट्स. 

ADVERTISEMENT

Also Read How To Make Hair Color Last Longer In Marathi

स्ट्रेटनिंग आर्यन (Hair Straightening Iron)

Hair-Straightening-At-Home-In-Marathi

असं अनेक वेळा होतं जेव्हा तुम्ही बाहेर जायचं असतं तेव्हा ना तुमच्याकडे केसांना शँपू करण्यासाठी वेळ असतो ना काही घरगुती उपाय करण्यासाठी. अशावेळी उपयोगी पडतं ते स्ट्रेटनिंग आर्यन. सुरूवातीला जी स्ट्रेटनिंग आर्यन बाजारात मिळत असत, त्यांनी केसांचं फार नुकसान होत असे. पण बदलत्या काळात टेक्नोलॉजी बदलली आणि स्ट्रेटनिंग आर्यनची क्वालीटीही पहिल्यापेक्षा सुधारली. आधीच्या तुलनेत आता आर्यनने केसांना कमी नुकसान होतं आणि केसही स्मूथ होतात. पण कोणतीही गोष्ट अती केली की वाईट असते. त्याचप्रमाणे स्ट्रेटनिंग आर्यनचंही आहे. जास्त प्रमाणात याचा वापर केल्यास केसांचं नुकसान होऊ शकतं. हे केसांना हीट देऊन सरळ करतं त्यामुळे याचा वापर कधीतरी केला तरच चांगला असतो.  

परमनंट हेअर स्ट्रेटनिंग / रिबॉन्डिंग (Permanent Hair Straightening / Rebonding)

Hair-Straightening-At-Home-In-Marathi

ADVERTISEMENT

परमनंट हेअर स्ट्रेटनिंग / रिबॉन्डिंगमध्ये केस स्ट्रेट आणि स्मूथ करण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. ही पद्धत केसांना परमनंटली स्ट्रेट करण्याचा दावा करते. पण वास्तविक हे केसांना तोपर्यंत सेमी-परमनंच ठेवतं, जोपर्यंत केसांची ग्रोथ होत नाही. या पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे तुमचे केस कमकुवत होतात. ज्यामुळे ते तूटतात आणि गळतात. जर परमनंट स्ट्रेटनिंगनंतर तुम्ही केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाहीतर तुमच्या केसांची नैसर्गिक चमक जाऊन ते निस्तेज होऊ शकतात.

फायदा (Pros)

  • जर तुमचे केस स्ट्रेट केले तर त्यावर कोणतीही स्टाईल करण्याची गरज भासत नाही.
  • फ्रिजी केसांपासून सुटका

नुकसान (Cons)

  • तुमचे केस स्ट्रेट दिसतील पण पाहताच कळेल की तुम्ही स्ट्रेटनिंग केलं आहे. म्हणजेच ते नैसर्गिकरित्या स्ट्रेट होणार नाहीत.
  • तुम्हाला तुमच्या केसांची अति काळजी घ्यावी लागेल.
  • स्ट्रेटनिंग करण्यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार तब्बल 4 ते 6 तास इतका वेळ लागू शकतो.

काय असतं हेअर स्मूदनिंग ? (What Is Hair Smoothening)

Hair-Straightening-At-Home-In-Marathi

ADVERTISEMENT

हेअर स्मूदनिंग तुमच्या केसांना नैसर्गिक लुक तर देतंच पण त्यासोबतच सिल्की आणि स्मूथ बनवतं. याशिवाय स्मूदनिंग केल्यावर तुम्हाला तुमचे केस मॅनेज करणंही सोपं होतं. हे केसांना फ्रिजी, डल आणि स्प्लीट एंड होऊ देत नाही. खरंतर या पद्धतीतही केमिकल्सचा वापर होतोच पण तरीही रिबॉन्डींगपेक्षा खूप चांगलं आहे. केसांना स्मूथ केल्यानंतर ते चांगले राहण्यावरही अवलंबून असतं. कारण आपण केस वारंवार धूत असतो. पण तरीही 6 ते 8 महीन्यापर्यंत हेअर स्मूदनिंग आपल्या केसांवर टीकतं.

कॅरटीन ट्रीटमेंट (Keratin Treatment)

Hair-Straightening-At-Home-In-Marathi

कॅरटीन एक प्रकारचं प्रोटीन असतं जे नैसर्गिकरित्या केस, नख आणि दातांमध्ये असतं आणि त्यांना मजबूत करतं. पण केस जेव्हा बाहेरील प्रदूषण, धूळ-माती, ऊन आणि हवेच्या संपर्कात येतात. तेव्हा हळूहळू त्यातील कॅरटीनची मात्रा कमी होऊ लागते आणि केस निर्जीव आणि फ्रिजी होतात. कॅरटीन ट्रीटमेंटमध्ये केसांची गेलेली चमक परत येते. ज्यामुळे केस मुलायम, चमकदार आणि सुंदर होतात. ही ट्रीटमेंट फक्त तुमच्या केसांना स्ट्रेट लुक देत नाही पण केसांकडे बघितल्यावर असं वाटेल की, जसं आत्ताच पार्लरमध्ये जाऊन ब्लो ड्राय केलंय. पण याचा प्रभाव फार कमी राहतो. जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत याचा प्रभाव टीकतो आणि प्रत्येक वेळ केस धुतल्यावर याचा प्रभाव कमी होत जातो. कॅरटीन ट्रीटमेंट केल्यावर तुम्हाला पार्लरमधून सुचवण्यात आलेले वेगळे हेअर प्रोडक्ट्स जसं शँपू आणि कंडीशनर यांचा वापर करावा लागेल. ही ट्रीटमेंट तुमच्या केसांची गळती थांबवत.     

फायदे (Pros)

ADVERTISEMENT
  • हे फ्रिजी केसांना स्मूथ बनवतं.
  • केसांची आरामात कोणतीही हेअरस्टाईल करू शकता.
  • हे प्रत्येक प्रकारच्या केसांसाठी सुरक्षित आहे.
  • रिबॉडींगला सर्वेात्तम पर्याय आहे.
  • जे तुमच्या केसांना अधिक नैसर्गिकरित्या स्ट्रेट लुक देतात.

नुकसान (Cons)

  • हे ट्रीटमेंट करताना केमिकल्सचा वापर केला जातो. ज्यामुळे तुमच्या स्कीनला अॅलर्जी आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते.
  • ही ट्रीटमेंट महाग असते आणि या ट्रीटमेंटनंतर देण्यात येणारे शँपू आणि कंडीशनरही स्वस्त नसतात.

ब्राझीलियन हेअर ट्रीटमेंट (Brazilian Hair Treatment)

ब्राझीलियन हेअर ट्रीटमेंट खासकरून ड्राय आणि वेव्ही केसांवर केलं जातं. या ट्रीटमेंटमध्ये कोणत्याही हार्श केमिकल्सचा वापर केला जात नाही. ज्याचा केसांवर वाईट परिणाम होत नाही. याची पूर्ण प्रोसेस नैसर्गिक घटक म्हणजेच प्राकृतिक सामग्री, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सीडंट्सचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांचं टेक्श्चर सुधारण्यास मदत होते.

फायदा (Pros)

  • हे केसांना सिल्की व स्मूथ बनवतं.
  • यामध्ये हार्श केमिकल्सचा वापर केला जात नाही.
  • हे केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचं पोषण करून त्यांना मॉईश्चराईज करतं.

नुकसान (Cons)

ADVERTISEMENT
  • ही ट्रीटमेंट केसांवर फक्त 12 ते 14 आठवड्यांपर्यंतच टीकते.
  • ब्राझीलियन हेअर ट्रीटमेंट खूपच महाग असते.

फोटो सौजन्य –  Instagram

हेही वाचा –

घरी केस कर्ल करण्याआधी या ‘8’ टीप्स अवश्य वाचा

#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

ADVERTISEMENT

केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

केस गळणे थांबवण्यासाठी 5 योगासनं (Yoga for Hair Fall)

23 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT