जाणून घ्या पिस्ता खाण्याचे फायदे (Pista Benefits In Marathi)

Pista Benefits In Marathi

ड्रायफ्रुटसमधील महागडा असा प्रकार म्हणजे पिस्ता (pistachio). हिरव्या रंगाचा पिस्ता क्रिम कलरच्या टणक आवरणात असतो. ते टणक आवरण फोडून पिस्त्याचा गर खाल्ला जातो. पिस्ता आवडतो म्हणून तुम्ही खाता खरा पण तुम्हाला पिस्त्याचे विविध फायदे माहीत आहेत का? काय नाही? आज आम्ही तुम्हाला पिस्त्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत. जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. शिवाय या सोबत आम्ही तुमच्यासोबत पिस्त्याच्या रेसिपी शेअर करणार आहोत ज्या तुम्ही कधीही करु शकता आणि पिस्ता खाण्याचे फायदे (pista benefits in marathi) मिळवू शकता. मग करायची सुरुवात?


पिस्त्याचे (Pista) आरोग्यदायी फायदे


पिस्त्याच्या रेसिपी


FAQs


पिस्त्यामध्ये काय असते (Nutrition In Pistachio)


पिस्ता शरीरासाठी चांगला आहे म्हणजे पिस्त्यामध्ये असे आहे तरी काय? असा तुम्हाला प्रस्न पडला असेल तर पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E), व्हिटॅमिन बी 3(VitaminB3), प्रोटिन (protein),फायबर(Fiber), अँटिऑक्सिडंट(Antioxidants) आणि पोटॅशिअम (Potassium) असते. हे घटन आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात. त्यामुळे पिस्त्याचे सेवन अत्यंत महत्वाचे असते. आता या घटकांनुसार पिस्त्याचे (Pista) फायदे नेमके कोणते ते देखील पाहूया.


Nutrition In Pistachio


पिस्त्याचे आरोग्यदायी फायदे (Benefits Of Pista In Marathi For Health)


आता आपण जाणून घेऊया पिस्त्याचे आरोग्यदायी फायदे. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही आजपासूनच तुम्ही पिस्त्याचे सेवन सुरु कराल.


ह्रदयविकारापासून सुटका


तुमच्या आरोग्यासाठी घातक असते ते म्हणजे कोलेस्ट्रॉल. अरबटचरबट घाण्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याचा परिणाम तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणजे ह्रदयविकारांची शक्यता वाढू शकते. तुमच्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म पिस्त्यामध्ये असतात. पिस्त्यामुळे तुमच्या शरीराला नको असलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. हे अनेक अभ्यासांमधूनही समोर आले आहे.


डाएबिटीस ठेवते नियंत्रणात


पिस्ता डाएबिटीसाठीही चांगले असते. जर तुम्हाला डाएबिटीसचा त्रास असेस तर तुम्ही पिस्त्याचे हमखास सेवन करायला हवे. पिस्ता तुमच्या रक्तातील अतिरिक्त साखर कमी करण्याचे काम करते. त्यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहते आणि तुमचे डाएबिटीस कंट्रोलमध्ये राहते. याशिवाय पिस्त्यामध्ये असलेले फायबर डाएबिटीसच्या रुग्णांसाठी लाभदायक असतात. मधुमेह घरगुती उपाय यामध्ये पिस्ता खाण्याचा सल्ला दिला जातो.


त्वचा करते मुलायम


त्वचा करते मुलायम


पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन E असते. जे तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असलेले फॅट तुम्हाला पुरवते. त्यामुळे तुमची त्वचा तजेलदार राहते. तुमच्या त्वचेच्या तक्रारीदेखील कमी होतात. याशिवाय पिस्ताच्या त्वचेसाठीचा फायदा सांगायचा झाला तर सूर्यांच्या अतिनील किरणांपासून वाचवण्याचे काम पिस्ता करते. या शिवाय त्वचेच्या कॅन्सरपासूनही पिस्ता संरक्षण करते


वाचा - जायफळ चे फायद्यांबद्दल देखील


प्रतिकारशक्ती वाढवते


कोणत्याही आजारांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे असते. पिस्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन B6 हे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. पिस्त्यामध्ये मुबलक प्रमाणात हे व्हिटॅमिन असते. त्यामुळे तुमच्या नित्यसेवनात पिस्ता असावा.


पचनशक्ती वाढवते


पचनशक्ती वाढवते


तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठीही पिस्ता वरदान आहे. एका अभ्यासानुसार साधारण मुठभर पिस्ता खाल्ल्याने तुम्हाला अपचनासंदर्भात असलेल्या तक्रारी दूर होतात, असे समोर आले आहे. पिस्ता तुमच्या पोटातील अपायकारक बॅक्टेरियाला मारते. त्यामुळेच तुमची पचनशक्ती सुधारते. पिस्तामध्ये असलेले व्हिटॅमिन B6,कॉपर, मॅगनीझ, फॉस्फरस तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असते. पिस्ताच्या नित्यसेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण पिस्तामध्ये असलेले फायबर विष्ठा अगदी सहजपणे शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात.


डोळ्यांचे आरोग्य सुधारते


पिस्त्याचे आणखी एक वैशिष्टय असे की, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.  ल्युटेन (Lutein) आणि झेक्झानथिन (Zeaxanthin) हे दोन मुख्य घटक पिस्त्यामध्ये असततात. जे डोळ्यांना होणाऱ्या विकारापासून दूर ठेवतात. शिवाय वयपरत्वे होणारा दृष्टिदोषाचा त्रासही पिस्त्याच्या सेवनामुळे कमी होतो असे अमेरिकेतील एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


संसर्गापासून संरक्षण


संसर्गापासून संरक्षण कऱण्याचे कामही पिस्ता करत असते. तुमची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे तुम्हाला आजारापासून दूर ठेवण्याचे काम पिस्ता करत असते. या शिवाय जर तुमच्या शरीराला सूज आली असेल तर ते बरे करण्याचे काम देखील करत असते.


वजन नियंत्रण


वजन नियंत्रण


आता ड्रायफ्रुट म्हटले की, त्यात फॅट आले ड्रायफ्रुटच्या सेवनाने वजन कमी झाले असे तुम्ही कधी ऐकले आहे का? नसेल तर पिस्त्याच्या बाबतीत ते अगदी खरे आहे. तुम्ही आवश्यक इतक्या प्रमाणात पिस्त्याचे सेवन केले तर तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. कारण पिस्त्याच्या सेवनामुळे पोट लवकर भरते. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टी खाण्याची इच्छा लवकर होत नाही. वजन वाढण्याचे मुख्य कारण असते नको त्यावेळी नको ते खाणे तेच खाणे कमी करण्याचे काम पिस्ता करु शकते. पण पिस्ता किती खावा याचेही प्रमाण आहे.


शरीरातील उर्जा वाढवते


तुमच्या शरीराला आवश्यक असलेली उर्जा देखील पिस्तामधून मिळते. समजा तुम्ही 100ग्रॅम पिस्त्याचे सेवन केले. तर तुम्हाला साधारण 500 ते 525 कॅलरीज मिळतात. पिस्त्यामध्ये असलेल्या कॅलरीज उर्जा तर देतात. या शिवा त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेटस, फॅट, प्रोटिन,फायबर, कॅल्शिअम, झिंक हे घटक देखील तितकेच उर्जावर्धक असतात. ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर फ्रेश वाटते


वाचा - केशर खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम


रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते


आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते.  हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे मेटालप्रोटिन आहे ज्यामध्ये लोह असते आणि ते शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते. शिवाय तुमच्या शरीराचे कार्य अगदी सुरळीत चालते. तुमच्या शरीराला अधिक ऑक्सिजन पुरवण्याचे काम व्हिटॅमिन B6 करते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन B6चे प्रमाण अधिक आहे. पिस्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजन वाढते शिवाय त्याची मदत हिमोग्लोबिन वाढायला होते.


*तर हे आहेत पिस्त्याचे काही फायदे. जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. आता तुम्हाला पिस्त्याची चव आवडत नसेल किंवा पिस्ता वेगवेगळ्या रेसिपीमध्ये खायची इच्छा असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या काही रेसिपीही ट्राय करु शकता.


पिस्त्याच्या रेसिपी (Pistachios Recipe In Marathi)


आता पिस्त्याचा नेमका उपयोग करा करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्यापासून तुम्ही काही रेसिपीसुद्धा बनवू शकता. या रेसिपीच्या माध्यमातून बघुया पिस्त्याच्या रेसिपी


मसाला दूध


मसाला दूध


 • साहित्य - 4 ते 5 काजू,बदाम, पिस्ता, काही केशराच्या काड्या, साखर आणि वेलची पूड

 • कृती - वर दिलेले प्रमाण एक ते दोन ग्लासाचे आहे. तुम्हाला सगळे ड्रायफ्रुट थोडेसे कुटून घ्यायचे आहेत.

 • एका भांड्यात १ मोठा ग्लास दूध गरम करुन त्यात आवडीनुसार साखर घालायची आहे.

 • साखऱ विरघळल्यानंतर त्यात तुम्हाला जाडसर कुटलेले ड्रायफ्रुट घालायचे आहेत. एक उकळी काढून गॅस बंद करुन त्यात केशराच्या काड्या आणि चवीपुरती वेलची पूड घालायची आहे. मसाला दूध तयार. गरम गरम दूध प्या. तुम्ही मसाला दूध रोज देखील पिऊ शकता. शिवाय ज्यांना नुसते दूध आवडत नसेल त्यांच्यासाठी मसाले दूध हा उत्तम पर्याय आहे.


पिस्ता न्युट्री बार


 जर तुम्ही जीमला जाणारे असाल तर जीमच्या आधी तुम्हाला एनर्जी मिळण्यासाठी तुम्ही पिस्ता न्युट्री बार बनवू शकता.


 • साहित्य- एक वाटी बदाम, पिस्ता, अक्रोड, ओट्स आणि मध

 • कृती-  ड्रायफ्रुटचे पातळ काप करुन घ्या. एका भांड्यात ड्रायफ्रुट आणि ओट्स एकत्र करा. थोडे तव्यावर परतून घ्या. थंड झाल्यावर त्यात मध घाला. साधारण मिश्रणाचा गोळा होऊ शकेल इतके मध त्यात घाला.

 • एका खोलगट भांड्यात मिश्रण पसरवून घ्या.शक्य असल्यास १० मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्या. तुमचे हेल्दी न्युट्री बार तयार


पिस्ता क्रिम स्प्रेड


पिस्ता क्रिम स्प्रेड


अनेकांना पावाला वेगवेगळ्या प्रकारचे बटर, चीझ लावून खायला आवडत असते. अशांसाठी ही रेसिपी आहे. पिस्त्यापासून तुम्ही स्प्रेड बनवू शकता.यालाच आपण पिस्ता स्प्रेड असे देखील म्हणू शकतो. ते कसे बनवायचे यासाठी रेसिपी वाचा


 • साहित्य- भाजलेले पिस्ता, मीठ, मध

 • कृती- एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले पिस्ता, मीठ आणि मध घ्या. अगदी कमीत कमी स्पीडवर हे मिश्रण एकजीव करुन घ्या. साधारण एका मिनिटांनी पुन्हा एकदा हायस्पीडवर मिक्सी चालवून क्रिमी मिश्रण तयार करुन घ्या. तयार मिश्रण तुम्ही पावाला लावून देखील खाऊ शकता.  फ्रिजमध्ये साधारण १५ दिवस हे स्प्रेड राहू शकते. तुम्ही डाएटचा फार विचार करणारे असाल तर तुम्हाला यातून प्रोटिन, व्हिटॅमिन मिळू शकते.


ओट्स पिस्ता कुकीज


ओट्स पिस्ता कुकीज


जर तुम्हाला कुकीज आणि कॉफी असे कॉम्बिनेशन आवडत असेल तर तुम्ही या कुकीज बनवू शकता.


 • साहित्य- ओट्स, मैदा, बटर, साखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, व्हेनिला इसेन्स. पिस्त्याचे काप

 • कृती- ओट्स, मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे सुके पदार्थ एकत्र करा.

 • ओव्हन 350 डिग्रीवर प्रीहिट करा.

 • एका मिक्सीच्या भांड्यात बटर, साखऱ, व्हेनिला इसेन्स अगदी छान हलके होईपर्यंत फिरवून घ्या. सुक्या मिश्रणात ते हलकेच ओता.

 • कट अँड फोल्डचा वापर करुन मिश्रण एकजीव करा. त्यात पिस्त्याचे काप घाला. कुकी डो तयार झाल्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये लहान लहान गोळे तयार करुन ओव्हनमध्ये 5 ते 7 मिनिटे ठेवा. गरमा गरम कुकीज तयार. या कुकीज तुम्ही दुधासोबतही खाऊ शकता. म्हणजे तुमचा दिवस अगदी छान जाईल आणि तुम्हाला चांगले प्रोटिन आणि कॅल्शिअमही मिळेल.


पिस्ता चॉकलेट


पिस्ता चॉकलेट


जर तुम्हाला नुसता पिस्ता खायचा नसेल तर तुम्ही पिस्ता चॉकलेट तयार करु शकता. रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचे डार्क, मिल्क किंवा व्हाईट चॉकलेट मेल्ट करुन घ्यायचे आहेत. त्यात तुम्हाला रोस्टेड पिस्ता बुडवायचा आहे. चॉकलेट वाळवण्यासाठी तुम्हाला पिस्ता फ्रिजमध्ये ठेऊन द्यायचा आहे. पिस्ता चॉकलेट रुपातही चांगला लागतो


पिस्त्याबाबत लोकांना पडणारे प्रश्न (FAQ's)


1. दिवसातून साधारण किती पिस्ता खायला हवेत?


कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. पिस्त्याच्या बाबतीतही तसेच आहे. तुम्ही दिवसभरातून एक मूठभर पिस्ता खाऊ शकता. पण त्यापेक्षा अधिक पिस्ता तुमच्या शरीरातील मेद वाढवून तुम्हाला जाड करु शकतो. याशिवाय कोणताही सुका मेवा रात्री खाऊ नये कारण तो पचण्यास जड जातो. साधारण जीमच्या आधी, संध्याकाळच्या भुकेला सुकामेवा खावा. जर तुम्ही वेळेवर आणि योग्य प्रमाणात पिस्ता खाल्ला तर तुम्हाला त्याचा काही त्रासही होणार नाही.


2. पिस्ता कच्चा खावा की भाजून ?


एखाद्या पदार्थांमधील गुणधर्म हे शिजवल्यानंतर कमी होतात असे म्हणतात. पण पिस्त्याच्या बाबतीत असे काही नाही. तुम्ही कच्चा, भाजलेला, खारवलेला पिस्ता खाऊ शकता. पण खारवलेल्या पिस्त्यापेक्षा भाजलेला पिस्ता अधिक चांगला. खारवलेल्या पिस्तामुळे जीभ फाटण्याची शक्यता अधिक असते. शिवाय अति मीठ शरीरास चांगले नाही.


3. पिस्ता किती दिवस चांगला राहू शकतो?


पिस्ता किती दिवस चांगला राहतो हे सांगणे तसे कठीण आहे. जर तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये पिस्ता ठेवत असाल तर तो ६ महिने चांगला राहू शकतो. पण जर तुम्हाला पिस्त्याची चव खवट लागली तर तुम्ही तो पिस्ता खाता कामा नये. तो कितीही महाग असला तरी तो खाऊ नका टाकून द्या.


4. पिस्त्याचे तोटे काय?


पिस्ता योग्य प्रमाणात खाल्ला तर त्याचे शरीराला फायदेच फायदे आहेत पण जर तुम्ही अतिप्रमाणात पिस्ता खाल्लात तर तुमच्या शरीरातील मेद वाढू शकते आणि ज्या आजारांवर पिस्ता गुणकारी आहे. त्यावरच पिस्ता त्रासदायक ठरु शकतो.


देखील वाचा - 


अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे


जाणून घ्या कलौंजीचे आरोग्यदायी फायदे


Pista Benefits In Hindi


फोटो सौजन्य- Shuttersock