हेल्दी लाईफस्टाईल आणि वेटलॉससाठी वापरा हे 'नॅचरल स्वीटनर्स' (Healthy Sweetner For Weighloss In Marathi)

हेल्दी लाईफस्टाईल आणि वेटलॉससाठी वापरा हे 'नॅचरल स्वीटनर्स' (Healthy Sweetner For Weighloss In Marathi)

जगभरात भारत हा पक्वान्न आणि त्यांच्या खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण एक वास्तव हेही आहे की, साखरेच्या जास्त सेवनाने कॅलरीज वाढणे आणि इतरही घातक आजारांना आपोआपच आमंत्रण मिळते. गोडं पदार्थांना टाळून कठीण डाएट प्लॅन फॉलो करणं हे जरा कठीणच जातं. वारंवार आपल्याला ते कडक डाएट सोडायचीही ईच्छा होते पण बळजबरी आणि वजन कमी करण्याच्या हव्यासापोटी आपण ते कसंबसं फॉलो करतो. पण हे सगळं टाळता येईल. प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आणि न्यूट्रीशनिस्ट इरम जैदी यांचं असं मानणं आहे की, निसर्गाने आपल्याला काही असे नॅचरल स्वीटनर्स दिले आहेत जे आपल्या आयुष्यात कॅलरीशिवाय गोडवा वाढवू शकतात. हे चार प्रमुख स्वीटनर्स आपल्या आहारात सामील करून तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल मिळवू शकता. ज्याने वेटलॉसही होईल आणि तुम्ही फिटसुद्धा राहाल.


मध – एक स्वादिष्ट स्वीटनर आणि उत्तम प्राकृतिक अँटी बायोटीक


ऊसाचा रस – प्राकृतिक एनर्जी ड्रींक, सुपरफूड आणि गुणकारी स्वीटनर


कोकोनट शुगर – कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर न्यूट्रीशनल व्हॅल्यू


स्टीविया किंवा गोड तुळस - प्राकृतिक, झिरो कॅलरीज आणि वापरायला सोपं (Stevia Or Sweet Basil)


1. Healthy Sweetner In Marathi


गोड तुळस ही जगभरात खूप वेगाने नॅचरल स्वीटनर म्हणून प्रचलित होत आहे. काही दशकांआधी याच्या चवीबाबत फार शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. प्युअर सर्कलसारख्या काही कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हायली प्युअर गोड तुळशीची स्वीटनर्स विकसित करून याच्या दैनंदिन वापरावरील साऱ्या शंका दूर केल्या आहेत. विना ब्लड शुगर किंवा इन्शुलिनच्या मात्रेला प्रभावित केल्याशिवाय हे स्वीटनर कॅलरीज घटवण्याच्या शर्यतीत खूपच प्रभावी ठरत आहे.  


मध – एक स्वादिष्ट स्वीटनर आणि उत्तम प्राकृतिक अँटी बायोटीक (Honey As A Natural Antibiotic)


2. Healthy Sweetner In Marathi


प्राकृतिक मध अनेक शतकांपासून घरगुती वापरातील प्रमुख घटक राहिला आहे. यामध्ये प्रोटीन मिनरल आणि व्हिटॅमीनचे प्रमाण भरपूर असते. मधामध्ये प्राकृतिकरित्या आढळणाऱ्या एंजाईम एमाईलेज स्टार्च हा पचण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तसंच शरीरातील आवश्यक अँटी ऑक्सीडंटचा स्तरही वाढवतं. एक चमचा मधात फक्त 20  कॅलरीज असतात.


ऊसाचा रस – प्राकृतिक एनर्जी ड्रींक, सुपरफूड आणि गुणकारी स्वीटनर (Sugarcane Juice As Natural Energy Drink)


3. Healthy Sweetner In Marathi


एक छान एनर्जी ड्रींक, बॉडी क्लिंजर तसंच अनेक औषधी आणि पोषक गुणांनी युक्त असा ऊसाचा रस हा एक नॅचरल स्वीटनर आहे. पण हळूहळू ऊसाच्या रसाची गुऱ्हाळ दुर्मिळ होऊ लागली आहेत. कारण आजकालच्या फास्टफूडच्या जमान्यात ऊसाचा रस पिणं हे एकतर कमी लेखलं जातं आणि दुसरं म्हणजे रसाच्या गुऱ्हाळांमधील अस्वच्छता. पण यालाही पर्याय आहे तो म्हणजे बाजारात उपलब्ध असलेला काही कोल्ड प्रेस्ड आणि ब्रँडेड बाटलीबंद ऊसाच्या रसाचा. जे पौष्टीक आणि फ्रेश ऊसाच्या रसांनी युक्त असतो. जो पिऊन तुम्हीही हेल्दी आयुष्याच्या दिशेने सुरूवात करू शकता.


कोकोनट शुगर – कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर न्यूट्रीशनल व्हॅल्यू (Cocunut Sugar Has Plenty Of Nutritional Value)


4. Healthy Sweetner In Marathi


कोकनट शुगरला कोकोनट पाम शुगर या नावानेही ओळखले जाते. यामध्ये भरपूर खनिजं म्हणजे आर्यन, झिंक, कॅल्शियम आणि पोटॅशिअमसोबतच काही फॅटी एसिड, पॉलीफिनॉल आणि अँटीऑक्सीडंटयुक्त आहे. नारळ शुगर आणि नारळ नेक्टरमध्ये इन्यूलीन नावाचं फायबर असतं जे ग्लुकोज रक्तामध्ये हळूहळू मिसळण्यास मदत करतं. खासकरून डायबेटीसने पीडित लोकांसाठी हे खूपच लाभदायक आहे.


परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदलया चार नॅचरल स्वीटनर्सच्या मदतीने तुम्ही गोड पदार्थांबाबत तडजोड न करताही आरामात हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करू शकता आणि फिटही राहू शकता. नॅचरल स्वीटनर्सच्या चांगली सवय ही जाडेपणा, डायबिटीस आणि इतर आजारांपासूनही दूर राहण्यासाठी एक चांगलं वरदान आहे.


हेही वाचा -


वेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं (Weightloss Guide)


जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक


बेलीफॅट कमी करण्यासाठी सोप्या टीप्स

Subscribe to POPxoTV