तुमच्याही पिरेड्सच्या तारखा मागे- पुढे होतात का? मग पिरेड्सच्या दिवसात फ्लो कमी जास्त होण्याचा त्रास तुम्हालाही होतो असेल नाही का? तुमचा फ्लो सुरळीत करण्यासाठी तुम्ही असे काही घरगुती उपाय करु शकता त्याचा फायदा तुम्हाला फ्लो सुरळीत करण्यासाठी होऊ शकतो. हे उपाय इतके सोपे आणि सुरक्षित आहेत की, तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही सांगितलेले हे उपाय तुमच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असतील. मग करायची सुरुवात?
कोरा चहा
अजूनही गावात कोरा चहा पिण्याची सवय अनेकांना असते. अशा प्रकारचा चहा तुम्हाला पिरेड्ससाठी खूप चांगला आहे. जर तुम्हाला फ्लो अडकल्यासारखा वाटत असेल तर तुम्ही एक कप गरम कोरा चहा प्याल तर तुम्हाला अगदी काहीच वेळात फरक जाणवेल. तुमचा फ्लो अगदी सुरळीत होईल
*कसा कराल कोरा चहा?
आता या चहाची काही वेगळी रेसिपी नाही. तुम्ही नेहमी करता तसाच चहा तुम्हाला करायचा आहे. फक्त तुम्हाला त्यात दूध घालायचे नाही इतकेच. शिवाय तुम्हाला दिवसातून फक्त कपच हा चहा प्यायचा आहे.
म्हणून महिलांनी वापरायला हवे पँटीलायनर
आल्याचा चहा
जर तुम्हाला कोरा चहा प्यायची इच्छा नसेल तर तुम्ही मस्त आलं घातलेला चहा पिऊ शकता. काही जणांच्या घरी नेहमीच आल्याचा चहा केला जातो. तर काहींना आले चहामध्ये अजिबात आवडत नाही. पण जर तुमचा फ्लो नीट होत नसेल तर तुम्ही नक्कीच आल्याचा चहा प्यायला हवा. आलं हे गरम असल्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करेल. त्यामुळे तुम्ही छान आल्याचा चहा बनवून प्या.
पिरेड्सच्या दिवसामध्ये दुखंत पोट, जाणवतो थकवा… मग नक्की वाचा
सूप
गरमा गरम सूप हा देखील पिरेड्सवरील चांगला उपाय आहे. तुमचा फ्लो सुरळीत होत नसेल तर तुम्ही गरमा गरम सूप पिऊ शकता. तुम्ही अगदी कोणत्याही स्वरुपातील सूप यावेळी पिऊ शकता. पण सूप जितके गरम असेल तितके तुमच्या अडकलेल्या फ्लोसाठी चांगले. तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात सूप प्याल तर उत्तम.
तुम्ही तुमच्या पिरेड्स येण्याच्या आधीही सूप पिऊ शकता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पिरेड्स येईल त्यावेळी तुमचा फ्लो सुरळीत होईल.
पेज
गरमा गरम पेजही तुमचा अडकलेला फ्लो सुरळीत करु शकते. उकड्या तांदळाची पेज चवीला तर चांगली लागतेच. शिवाय तुमची या दिवसातील पोटदुखीही दूर करते. त्यामुळे तुम्ही पेज प्यायला काहीच हरकत नाही. तांदळ्याच्या पेजे व्यतिरिक्त तुम्ही साबुदाण्याची पेजही पिऊ शकता. जिरे घातलेली साबुदाण्याची गरम पेजही तुमचा फ्लो चांगला करु शकते.
उन्हाळ्यात तुम्हालाही नको होतात पिरेड्स मग नक्की वाचा
मेथीचा लाडू
मेथी गरम असते. मेथीमुळेही तुमचा फ्लो चांगला सुरळीत होण्यास मदत होऊ शकतो. मेथीचा लाडू यावर चांगला इलाज आहे. तुम्हाला मेथीचा लाडू आवडत असेल तर चांगली गोष्ट. नसेल आवडत तरी तुम्ही मेथीचा लाडू खाऊन पाहा या दिवसात तुमचा फ्लो सुरळीत करायला हा एक चांगला उपाय आहे. दिवसातून एकच लाडू खा आणि त्यावर भरपूर पाणी प्या.तुम्हाला तुमच्या फ्लोमध्ये झालेला बदल लगेचच जाणवेल.
(सौजन्य- Shutterstock)
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:
पीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय