1 एप्रिल 2019 चं राशीफळ, मीन राशीला आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

1 एप्रिल 2019 चं राशीफळ, मीन राशीला आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

मेष : गोंधळ उडेल


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस गोंधळ उडविणारा असेल. त्यामुळे त्यांनी आज सावध राहून आपले नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. वडीलांकडून आपल्या कामाचे आज कौतुक होणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल.


कुंभ : जोड व्यवसायाचा विचार


व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यासाठी आज तुम्ही जोड व्यवसायाचा विचार करणार आहात. मात्र ते करीत असतांना हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये, हे लक्षात घ्या. पती-पत्नीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून एकमेकांना समजून उमजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही तर गैरसमज होऊन तणाव वाढू शकतो.


मीन : खर्चावर नियंत्रण


आपले उत्पन्न व खर्च यांचा योग्य तो ताळमेळ बसवून खर्चावर आज आपल्या नियंत्रण ठेवावे लागेल. त्यासाठी अनावश्यक खर्चाला कात्री लावा. घरात वातावरण आनंदाचे राहणार आहे. मात्र आर्थिक ओढताण तुम्हाला संकटात टाकू शकते. दात आहेत तर चणे नाहीत आणि चने आहेत तर दात नाहीत अशी अवस्था होऊ शकते.     


वृषभ : प्रॉपर्टीतून लाभ


प्रॉपर्टीशी संबंधीत जर आपले काही विषय प्रलंबित असतील तर आज ते मार्गी लागू शकतात व त्यातून आपल्याला लाभही होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. आज गुरुंच्या सानिध्यात जाऊन त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न नक्की करा. नवीन ओळखीही आज होऊ शकतात.


मिथुन : अनुकूल दिवस


आजचा दिवस स्थावर मालमत्तेशी संबंधित सर्व लोकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज मोठी संधी प्राप्त होऊ शकते. जागृत राहून तिला ओळखण्याचा व लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आज आपल्याला आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. छोटे दुखणेही त्रासदायक ठरु शकते. शाळेतील मित्र-मैत्रीणीची आठवण येईल.


कर्क : अनुकूल ग्रहमान


आज छोट्या व्यावसायिकांना मोठे यश मिळणार आहे. कारण आपल्यासाठी आज अनुकूल ग्रहमान असून भाग्याची साथ मिळू शकते. आहाराविषयी कुठले पथ्य पाळत असाल तर आज कंटाळा करु नका. कारण अन्नबाधा होण्याचा त्रास आहे. कुटुंबवत्सल लोकांसाठी आज दिवस आनंददायी ठरु शकतो. आपल्याला आज अर्थलाभ होऊ शकतो.


सिंह : वसुली होईल


उधारीने दिलेले पैसे जर कुणाकडे अडकलेले असतील ते वस्तुल करण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे आज प्रयत्न करुन बघा. आरोग्य नरम-गरम राहू शकतं. शरीरात थोडी कणकण जाणवेल. म्हणून आपण आरोग्याची काळजी घ्यायला हवी. दुखणे वाढायला नको. वैवाहिक आयुष्यातील विविध रंग आज आपल्याला अनुभवायला मिळतील.


कन्या : अडथळे येतील


आज विशेषत: व्यापा-यांसाठी दिवस परिक्षेचा जाणार आहे. कामात प्रचंड अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आज धैर्याच्या होणा-या परिक्षेसाठी तयार राहा. आज आपण स्वत:चीही काळजी घेतली पाहिजे. कारण आज हाता-पायांना इजा होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी थोरा-मोठ्यांचा सल्ला घ्यायला विसरु नका.


तूळ : वृद्धीकडे लक्ष द्या


व्यापा-यांनी आज आपल्या व्यापाराच्या वृद्धीकडे लक्ष द्यायला हवे. आज संधीही प्राप्त होऊ शकतात. तिला लाभ घेण्यात कमी पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. छोटी दुखणीही त्रासदायक ठरुन कामातून लक्ष विचलित करु शकतात. लहान भावडांची काळजी घ्या. त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. त्यांना आज दुखापत होण्याची शक्यता आहे.


वृश्चिक : अनुकूल वातावरण


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. कारण आज आपल्या व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण राहणार आहे. दैव संधी उपलब्ध करुन देणार आहे. मुलांकडून तुम्हाला आज सुर्वाता समजतील. त्यांना आज खेळामध्ये यश मिळणार आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका. वडीलांशी आज मतभेद होण्याची शक्यता आहे.


धनु : अनुकूल वातावरण


बांधकाम व्यावसायिक व स्थावर मालमत्तेशी संबंधित सर्वांसाठी आज फार महत्त्वपूर्ण दिवस आहे. आपल्या व्यवसायात संधी मिळून अनुकूल वातावणर तयार होणार आहे. त्याचा फायदा घ्या. मुलांमुळे आज तुमची संध्याकाळ प्रसन्न होणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. मात्र सासरच्या मंडळींशी आज वाद होण्याची शक्यता आहे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असे करु नका.


मकर : आर्थिक अस्थिरता


आर्थिक नियोजन कोलमंडल्यामुळे आज आर्थिक अस्थिरता जाणवणार आहे. त्यामुळे अनावश्यक व अतिरीक्त खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरात जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करुन तडजोडीचे धोरण स्विकारा. स्त्री पक्षाकडून आज तुम्हाला सहयोग प्राप्त होऊ शकतो.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद